Lok Sabha Elections Results 2024 Live : PM मोदी आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा, एनडीएच्या बैठकीनंतर घेणार राष्ट्रपतींची भेट; राजकीय घडामोडींची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Lok Sabha Elections Results 2024 Live : मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची बाजी? देशात सत्ता कोणाची, मतमोजणीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jun 2024 05:06 PM
PM Modi NDA : नवी दिल्लीत एनडीए आघाडीची बैठक सुरू, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूदेखील उपस्थित

PM Modi NDA  :  नवी दिल्लीत एनडीए आघाडीची बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. या बैठकीत  जेडीयूचे नितीश कुमार आणि  टीडीपीचे चंद्राबाबू नायडूदेखील उपस्थित आहेत. 

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल, पंतप्रधानपदाचा देणार राजीनामा

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले असून ते पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सायंकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. 

PM Modi : पंतप्रधान मोदी आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा, एनडीएच्या बैठकीनंतर घेणार राष्ट्रपतींची भेट

Lok Sabha Election PM Modi :  पंतप्रधान मोदी आजच सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार असल्याची माहिती आहे. आज सायंकाळी होणाऱ्या एनडीए आघाडीच्या बैठकीनंतर पाठिंब्याचे पत्र घेऊन पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. 

PM Modi Lok Sabha Election Result Live Update : भाजपच्या जागाच नाही तर PM मोदींच्या मताधिक्यतही घट; अवघ्या दीड लाखांनी विजय

PM Modi Lok Sabha Election Result Live Update :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघात (Varanasi Election Result) तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय (Ajay Rai) यांचा दीड लाख मतांनी पराभव केला आहे. गेल्या दोन निवडणुकांतील विजयाची तुलना केली तर यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या मताधिक्यात घट झाली आहे.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 




 



Lok Sabha Election Result Live Update :  निवडणूक निकालानंतर आज दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक

Lok Sabha Election Result Live Update :  निवडणूक निकालानंतर आज दिल्लीत राजकीय हालचालींना वेग येणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार आहे. त्याशिवाय एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. 

Lok Sabha Election Result Live Update :  निवडणूक निकालानंतर आज दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, एनडीए आणि इंडिया आघाडीची बै

Lok Sabha Election Result Live Update :  निवडणूक निकालानंतर आज दिल्लीत राजकीय हालचालींना वेग येणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार आहे. त्याशिवाय एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. 

Lok Sabha Election : रायगड - सुनील तटकरे 82 हजार 784 च्या मताधिक्याने विजय 

रायगड - सुनील तटकरे 82 हजार 784 च्या मताधिक्याने विजय 


सुनील तटकरे यांना पडलेली एकूण मते 5 लाख 8 हजार 352 


प्रतिस्पर्धी अंनत गिते यांना मिळाली मते 4 लाख 25 हजार 568.


वंचितसह  11 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त...


रायगड मध्ये नोटाला पडली 27,  हजार 270 मते..

Lok Sabha Election Result Live Update : मणिपूरमधील दोन्ही जागांवर काँग्रेसची आघाडी

Lok Sabha Election Result Live Update :  वांशिक हिंसाचारात होरपळत असलेल्या  मणिपूरमधील दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. द

Lok Sabha Election Result Live Update : निवडणूक निकालानंतर काँग्रेसची पत्रकार परिषद

Lok Sabha Election Result Live Update : निवडणूक निकालानंतर काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू

Prashant Padole : भंडारा गोंदियात काँग्रेसचे प्रशांत पडोळे आघाडीवर 

मतदारसंघ – भंडारा - गोंदिया
------------------------------------------
उमेदवार (महायुती) सुनील मेंढे : 307741
उमेदवार (महाविकास आघाडी) – डॉ प्रशांत पडोळे : 317079
---------------------------------------------
मतांची आघाडी – 
नाव : पडोळे
आकडा : 9348

Lok Sabha Election Result Live Update : राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्याला दिले अलिंगन, विजयाचा आनंद साजरा करत होता कार्यकर्ता

Lok Sabha Election Result Live Update :  राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्याला दिले अलिंगन,  विजयाचा आनंद साजरा करत होता कार्यकर्ता





Lok Sabha Election 2024 Result Live : ओदिशामध्ये बिजू जनता दलाची दाणादाण, भाजपचा 19 जागांवर विजय

Lok Sabha Election 2024 Result Live : ओदिशामध्ये बिजू जनता दलाची दाणादाण उडाली आहे. भाजपचा 19 जागांवर विजय झाला असून बिजू जनता दलाचा एका जागेवर विजय झाला आहे. काँग्रेसला एका जागेवर यश मिळाले. 

Lok Sabha Election 2024 Result Live : उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक लाख 32 हजार मतांनी आघाडीवर

Lok Sabha Election 2024 Result Live : उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक लाख 32 हजार मतांनी पुढे, काँग्रेसचे अजय राय पिछाडीवर

Lok Sabha Election 2024 Result Live : पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत फोनवरून चर्चा

 Lok Sabha Election 2024 Result Live : लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होत असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत फोनवरून चर्चा 

Lok Sabha Election 2024 Result Live : इंदूरमध्ये नोटाला भरभरुन मतदान, दीड लाखांहून अधिक मतदारांनी निवडला पर्याय

Lok Sabha Election 2024 Result Live :  इंदूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारा अक्षय कांती बाम यांनी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर या मतदारसंघात झालेल्या मतदानात भाजप उमेदवाराने आघाडी घेतली असली तरी दुसऱ्या क्रमांकावर 'नोटा' पर्याय आहे. 

Gadchiroli Lok Sabha Election Result : गडचिरोलीत काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर

मतदारसंघ- गडचिरोली-चिमूर 


उमेदवार- अशोक नेते भाजप 184679


उमेदवार- नामदेव किरसान- काँग्रेस - 224361
 
मतांची आघाडी- 39682
नाव- नामदेव किरसान काँग्रेस

Lok Sabha Election 2024 Result Live : आतापर्यंत भाजपला किती जागांवर आघाडीवर? काँग्रेस आणि मित्रपक्षांची स्थिती काय?

Lok Sabha Election 2024 Result Live :  दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजप 242 जागांवर आघाडीवर आहे. तर, काँग्रेसने 95 जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पक्ष 36, तृणमूल काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर आहे. 



Lok Sabha Election 2024 Result Live : पंजाबमध्ये काँग्रेसची मुसंडी, भाजप-शिरोमणी अकाली दल पिछाडीवर, 'आप' च्या किती जागांवर आघाडीवर?

Lok Sabha Election 2024 Result Live : पंजाबमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे.  भाजप आणि शिरोमणी अकाली दल पिछाडीवर आहेत.  काँग्रेस 7, आम आदमी पक्ष 3,  शिरोमणी अकाली दल एका जागेवर आघाडीवर आहे. भाजप एकाही जागेवर आघाडीवर नाही.

Kangana Ranaut Mandi Lok Sabha Election 2024 Result : कंगना रनौतचा मंडीत जलवा, 36 हजार मतांनी पुढे

Lok Sabha Election 2024 Result Live :  बॉलिवूडची 'पंगाक्वीन' अर्थात कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने भाजपकडून (BJP) हिमाचल प्रदेशातील मंडी (Himachal Pradesh Mandi) लोकसभा मतदार संघातून आघाडीवर आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Lok Sabha Election 2024 Result Live :  सातपैकी सहा जागांवर भाजपा आघाडीवर, एका जागेवर काँग्रेसला आघाडी

Lok Sabha Election 2024 Result Live :  सातपैकी सहा जागांवर भाजपा आघाडीवर, एका जागेवर काँग्रेसला आघाडी


चांदणी चौक मतदार संघात काँग्रेसचे जे पी अग्रवाल 4 हजार आघाडीवर 


ईशान्य दिल्ली मनोज तिवारी 25 हजार मतांनी आघाडीवर, कन्हैया कुमार पिछाडीवर 


पूर्व दिल्ली भाजप हर्ष मल्होत्रा 8000 मतांनी आघाडीवर 


नवी दिल्ली बासुरी स्वराज 5000 मतांनी आघाडीवर 


उत्तर पश्चिम मधून भाजपचे योगेंद्र चांडोली या 27000 मतांनी आघाडीवर 


दक्षिण दिल्ली मधून भाजपचे रामबिदोरी 11000 मतांनी आघाडीवर 


पश्चिम दिल्ली कमलजीत शेरावत 22000 मतांनी आघाडीवर

Lok Sabha Election 2024 Result Live : अमेठीमध्ये मोठा उलटफेर, स्मृती इराणी पिछाडीवर, काँग्रेसने उमेदवार किशोरी लाल आघाडीवर

Lok Sabha Election 2024 Result Live : अमेठीमध्ये मोठा उलटफेर, स्मृती इराणी 17 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसने उमेदवार किशोरी लाल यांनी आघाडी   घेतली आहे. 

Dlehi Lok Sabha Election Result 2024 : दिल्लीत सातपैकी सहा जागांवर भाजपा आघाडीवर 

नवी दिल्ली : सातपैकी सहा जागांवर भाजपा आघाडीवर 


चांदणी चौक मतदारसंघात काँग्रेसचे जे पी अग्रवाल 4 हजारांनी आघाडीवर 


ईशान्य दिल्लीत मनोज तिवारी 25 हजार मतांनी आघाडीवर, कन्हैया कुमार पिछाडीवर 


पूर्व दिल्लीत भाजप हर्ष मल्होत्रा 8000 मतांनी आघाडीवर 


नवी दिल्लीत बासुरी स्वराज 5000 मतांनी आघाडीवर 


उत्तर पश्चिममधून भाजपचे योगेंद्र चांडोली या 27000 मतांनी आघाडीवर 


दक्षिण दिल्लीमधून भाजपचे रामबिदोरी 11000 मतांनी आघाडीवर 


पश्चिम दिल्लीत कमलजीत शेरावत 22000 मतांनी आघाडीवर

Lok Sabha Election 2024 Result Live : हैदराबादमधून एमआयएम पक्षाचे असदद्दीन ओवैसी पिछाडीवर

Lok Sabha Election 2024 Result Live : हैदराबादमधून एमआयएम पक्षाचे असदद्दीन ओवैसी पिछाडीवर आहेत. या मतदारसंघावर लोकांचे लक्ष लागले आहे. 

Lok Sabha Election 2024 Result Live : पंतप्रधान मोदी हे लवकरच माजी पंतप्रधान होणार असल्याचे द्योतक: काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे प्रतिपादन

Lok Sabha Election 2024 Result Live : सध्याचा कल हा विद्यमान पंतप्रधान माजी पंतप्रधान होत असल्याचे निर्दशक आहे. पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मतदारसंघात मतमोजणीत पिछाडीवर असणे हा त्यांचा नैतिक, राजकीय पराभव असल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले. 

Lok Sabha Election 2024 Result Live : राजस्थानमध्ये भाजप-एनडीए आणि काँग्रेस-इंडियामध्ये जोरदार चुरस; एनडीए 13 जागांवर आणि इंडिया 10 जागांवर आघाडीवर आहे.

Lok Sabha Election 2024 Result Live : राजस्थानमध्ये भाजप-एनडीए आणि काँग्रेस-इंडियामध्ये जोरदार चुरस सुरू आहे. एनडीए 13 जागांवर आणि इंडिया 10 जागांवर आघाडीवर आहे. 

Lok Sabha Election 2024 Result Live : राजस्थानमध्ये भाजप-एनडीए आणि काँग्रेस-इंडियामध्ये जोरदार चुरस; एनडीए 13 जागांवर आणि इंडिया 10 जागांवर आघाडीवर आहे.

Lok Sabha Election 2024 Result Live : राजस्थानमध्ये भाजप-एनडीए आणि काँग्रेस-इंडियामध्ये जोरदार चुरस सुरू आहे. एनडीए 13 जागांवर आणि इंडिया 10 जागांवर आघाडीवर आहे. 

Lok Sabha Election 2024 Result Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून 236 मतांनी आघाडीवर

Lok Sabha Election 2024 Result Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून 236 मतांनी आघाडीवर आहेत. मागील फेरीतील पिछाडी त्यांनी भरून काढली. 

Lok Sabha Election 2024 Result Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून 236 मतांनी आघाडीवर

Lok Sabha Election 2024 Result Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून 236 मतांनी आघाडीवर आहेत. मागील फेरीतील पिछाडी त्यांनी भरून काढली. 

Lok Sabha Election 2024 Result Live : मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासांमध्ये इंडिया आघाडीने एनडीएला मागे टाकले

Lok Sabha Election 2024 Result Live : मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासांमध्ये इंडिया आघाडीने एनडीएला मागे टाकले. इंडिया आघाडी 261 जागांवर आणि एनडीए 259 जागांवर आघाडीवर आहे. 

Lok Sabha Election 2024 Result Live :वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा हजार मतांनी पिछाडीवर

Lok Sabha Election 2024 Result Live : उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या फेरी अखेर सहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत. 

Lok Sabha Election Result Live Update : निवडणूक आयोगाच्या कलानुसार उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडीवर 37 जागांवर आघाडीवर

Lok Sabha Election Result Live Update :  निवडणूक आयोगाच्या कलानुसार उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडीवर 37 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 37 जागांवर आघाडीवर  आहे.

Lok Sabha Election Result Live Update : मेरठमधून अरुण गोविल 6000 मतांनी पिछाडीवर, मंडीतून कंगना रणौत 6669 मतांनी आघाडीवर

Lok Sabha Election Result Live Update :  अभिनेते अरुण गोविल हे 6000 मतांनी पिछाडीवर असून कंगना रणौत 6669 मतांनी आघाडीवर आहे. 

Lok Sabha Election Result Live Update : बिहारमधील सारण लोकसभा मतदारसंघामधून लालूप्रसाद यादव यांची कन्या रागिनी आचार्य पिछाडीवर

Lok Sabha Election Result Live Update : बिहारमधील  सारण लोकसभा मतदारसंघामधून लालूप्रसाद यादव यांची कन्या रागिनी आचार्य पिछाडीवर आहे. 

Lok Sabha Election Result Live Update : मंडीतून कंगना रणौत आणि मथुरामधून हेमा मालिनी आघाडीवर

Lok Sabha Election Result Live Update :  हिमाचल प्रदेशातील मंडीतून कंगना रणौत आणि उत्तर प्रदेशातील मथुरामधून हेमा मालिनी आघाडीवर आहेत.

Lok Sabha Election Result Live Update : मंडीतून कंगना रणौत आणि मथुरामधून हेमा मालिनी आघाडीवर

Lok Sabha Election Result Live Update :  हिमाचल प्रदेशातील मंडीतून कंगना रणौत आणि उत्तर प्रदेशातील मथुरामधून हेमा मालिनी आघाडीवर आहेत.

Lok Sabha Election Result Live Update : मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपने पार केला 300 जागांचा टप्पा

Lok Sabha Election Result Live Update :  मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपने 300 जागांचा टप्पा पार केला आहे.  एनडीएने 336 जागांवर आघाडी घेतली आहे. 

Lok Sabha Election Result Update : भाजप 225 जागांवर आघाडीवर, इंडिया आघाडी 135 जागांवर पुढे

Lok Sabha Election Result 2024 Update : सध्या देशभरातील मतमोजणी केंद्रांवर मतांची मोजणी केली जात आहे. गुजरातमधील गांधीनगर या मतदारसंघात अमित शाह हे 35 हजार मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत 371  जागांवरील कल समोर आले आहेत. यातील 225 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर 135 जागांवर इंडिया आघाडी पुढे आहे.  

Lok Sabha Election Result Live Update : सुरुवातीच्या मतमोजणीत भाजप-एनडीएने गाठला बहुमताचा आकडा

Lok Sabha Election Result Live Update :  गुजरातमधील गांधीनगरमधून भाजपचे अमित शहा 35 हजार मतांनी पुढे आहेत. बिहारमधील गया मतदारसंघातून जीतन राम मांझी पुढे आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून कंगना राणौत आघाडीवर आहे. पंजाबमधील जालंधर मतदारसंघातून काँग्रेसचे चरणजीत सिंह चन्नी पुढे आहेत. पटना साहिबमधून रविशंकर प्रसाद पुढे आहेत. 

Madhya Pradesh lok Sabha Election Vote Counting : गुना मतदारसंघात ज्योतिरादित्य शिंदे आघाडीवर

Madhya Pradesh lok Sabha Election Result 2024 : पंजाब राज्यातील अमृतसर या जागेवरून भाजपचे उमेदवर तरनजीत संधू आघाडीवर आहेत. तर तमिळनाडूतील तुतीकोरीन या जागेवर डीएमकेचे कनिमोझी हे आघाडीवर आहे. मध्ये प्रदेशमधील गुना या जागेवर ज्योतिरादित्य शिंदे आघाडीवर आहेत. 

Lok Sabha Election Result Live Update : सुरुवातीच्या कलात इंडिया आघाडीने पार केला 100 जागांचा आकडा, एनडीए बहुमताजवळ

Lok Sabha Election Result Live Update : सुरुवातीच्या कलात इंडिया आघाडीने 100 जागांचा आकडा पार केला आहे.  एनडीए बहुमताच्या आकड्याजवळ आहे. 

Rahul Gandhi Raebareli Seat : राहुल गांधी आघाडीवर, शशी थरुर पिछाडीवर

Lok Sabha Election Result Rahul Gandhi Raebareli Seat : केरळमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. येथे मतमोजणीचे पहिले कल समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तिरुअनंतपूरम या जागेवर शशी थरूर पिछाडीवर आहेत. तर रायबरेली या जागेवरून राहुल गांधी हे आघाडीवर आहेत. 

Lok Sabha Election Result Live Update : उत्तर प्रदेशमधील अमेठीमधून स्मृती इराणी आणि रायबरेलीतून राहुल गांधी आघाडीवर

Lok Sabha Election Result Live Update : सुरुवातीच्या कलानुसार उत्तर प्रदेशमधील अमेठीमधून स्मृती इराणी आणि रायबरेलीतून राहुल गांधी आघाडीवर आहेत. 

Lok Sabha Election Result Live Update : उत्तर प्रदेशमध्ये भाजप-एनडीए 15 जागांवर, तर इंडिया आघाडी 8 जागांवर आघाडीवर

Lok Sabha Election Result Live Update : उत्तर प्रदेशमध्ये भाजप-एनडीए 15 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी 8 जागांवर आघाडीवर आहे. 

Lok Sabha Election Result Live Update : पोस्टल मतदानानंतर देशात एनडीए 183 जागा, इंडिया आघाडी किती जागांवर आघाडीवर?

Lok Sabha Election Result Live Update : पोस्टल मतदानानंतर देशात एनडीए 183 जागा, इंडिया 69 आणि इतर 19 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. 

Lok Sabha Election Result Live Update : पोस्टल मतदानात दिल्लीतील सातही जागांवर भाजपची आघाडी

Lok Sabha Election Result Live Update : पोस्टल मतदानात दिल्लीतील सातही जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. 

Lok Sabha Election Result Live Update : वाराणसीमधून पंतप्रधान मोदी आघाडीवर, काँग्रेसचे अजय राय पिछाडीवर

Lok Sabha Election Result Live Update :  वाराणसीमधून पंतप्रधान मोदी आघाडीवर आहेत.  तर,  काँग्रेसचे अजय राय पिछाडीवर आहेत

Lok Sabha Election Result Live Update : मतमोजणीच्या पहिल्या कलामध्ये भाजपची 100 जागांवर आघाडी, काँग्रेस 26 जागांवर आघाडीवर

Lok Sabha Election Result Live Update :  मतमोजणीच्या पहिल्या कलामध्ये भाजपने 100 जागांवर आघाडी घेतली. तर, काँग्रेस 26 जागांवर आघाडीवर आहे. 

Lok Sabha Election Result Live Update : मतमोजणीच्या पहिल्या 10 मिनिटात एनडीएची मुसंडी, एनडीए 81 जागांवर इंडिया 29 जागांवर आघाडीवर

Lok Sabha Election Result Live Update :   मतमोजणीच्या पहिल्या 10 मिनिटात एनडीएची मुसंडी, एनडीए 81 जागांवर इंडिया 29 जागांवर आघाडीवर 

Lok Sabha Election Result Live Update : देशभरात पोस्टल मतमोजणीस सुरुवात, पहिल्या ट्रेंडमध्ये एनडीए आघाडीवर

Lok Sabha Election Result Live Update :  देशभरात पोस्टल मतमोजणीस सुरुवात, पहिल्या ट्रेंडमध्ये एनडीए आघाडीवर आहे. एनडीए 18 जागांवर आणि इंडिया आघाडी 8 जागांवर आघाडीवर आहे.

Lok Sabha Election Result Live Update : उत्तर प्रदेशातील तीन जागांवर भाजपची आघाडी...

Lok Sabha Election Result Live Update :  उत्तर प्रदेशातील तीन जागांवर भाजपने आघाडीने घेतली आहे. 

Gujrat Lok Sabha Election 2024 Result Update : गुजरातमध्ये 26 जागांसाठी मतदान, कोण ठरणार सरस

Gujrat Lok Sabha Election Result : गुजरातमध्ये एकूण 26 जागांसाठी मतदान झाले. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या लोकसभा निवडणुकीतही येथे भाजप बाजी मारण्याची शक्यता आहे. येथील सर्व जागांवर भाजपचा विजय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Lok Sabha Election Result Live Update :  देशात 1,224 मतमोजणी केंद्रांत होणार मतमोजणी, सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी

Lok Sabha Election Result Live Update :  देशातील 542 जागांचे निकाल आज जाहीर होणार आहे. देशात 1,224 मतमोजणी केंद्रांत मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी 11वाजल्यापासून निकालाचा स्पष्ट कल येण्यास सुरुवात होईल.

Lok Sabha Election Result Live Update :  देशात 1,224 मतमोजणी केंद्रांत होणार मतमोजणी, सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी

Lok Sabha Election Result Live Update :  देशातील 542 जागांचे निकाल आज जाहीर होणार आहे. देशात 1,224 मतमोजणी केंद्रांत मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी 11वाजल्यापासून निकालाचा स्पष्ट कल येण्यास सुरुवात होईल.

Karnataka Lok Sabha Election Result : कर्नाटकमध्ये एकूण 28 जागांसाठी मतदान, काही क्षणांत मतममोजणीला सुरुवात

Karnataka Lok Sabha Election 2024 Result : कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. 26 एप्रिल आणि 7 मे रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते. 26 एप्रिल रोजी दक्षिण कर्नाटकमध्ये 14 जागांसाठी तर 7 मे रोजी उर्वरित 14 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. 

Lok Sabha Elections Result West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि एनडीएमध्ये तगडी फाईट

Lok Sabha Elections Result West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये तगडी फाईट पाहायला मिळाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या राज्यात मोठं यश मिळू शकतं. भाजपला 23 ते 27 जागा मिळू शकतात, तर ममता बॅनर्जींना 13 ते 17 जागांवर विजय मिळू शकतो, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिणेतील एका महत्वाच्या राज्यात भाजप मुसंडी मारताना दिसतोय.  

Lok Sabha Election Surat Result : भाजपचा पहिला विजय, सुरत जिंकलं

Lok Sabha Election Result Live Update : प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच भाजपने आपलं खातं खोललं आहे. सुरतच्या जागेवर भाजपचा विजय झाला आहे. या जागेवरील सर्व विरोधी उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्यामुळे आता भाजपने आपलं खातं खोललं आहे. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लीक करा

Lok Sabha Election Surat Result : भाजपचा पहिला विजय, सुरत जिंकलं

Lok Sabha Election Result Live Update : प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच भाजपने आपलं खातं खोललं आहे. सुरतच्या जागेवर भाजपचा विजय झाला आहे. या जागेवरील सर्व विरोधी उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्यामुळे आता भाजपने आपलं खातं खोललं आहे. 

Lok Sabha Election 2024 Result Live : गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध, मतमोजणीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Lok Sabha Election 2024 Result Live :  गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले. 

Lok Sabha Election 2024 Result Live : पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीची उत्सुकता, पहिल्या तासातच लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल समोर येणार...

Lok Sabha Election 2024 Result Live :  थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वप्रथम टपाली मतांची (पोस्टल) मोजणी केली जाईल. त्यावरुन प्राथमिक कल लक्षात येतील.  पोस्टल बॅलेट म्हणजे टपालाद्वारे पाठवलेली मते असतात. पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे बॅलेट पेपरवर मतदान होत असे,तीच पद्धत पोस्टल बॅलेटसाठी वापरली जाते. जे मतदार त्यांच्या नोकरीमुळे आपल्या मतदारसंघात जाऊ शकत नाहीत, ते मतदार पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करतात. निवडणूक आयोग अगोदरच अशा मतदारांची संख्या निश्चित करुन त्यांना पोस्टल बॅलेट पाठवते. त्यानंतर मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करुन पोस्टल बॅलेट पोस्टाने किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने  निवडणूक अधिकाऱ्याकडे परत पाठवतो.

Hyderabad Lok Sabha Election Live Update : आम्ही हैदराबाद जिंकणार, माधवी लता यांनी व्यक्त केला विश्वास

Hyderabad Lok Sabha Election Result Live Update: लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत हैदराबादच्या जागेवर कोण बाजी मारणार हे अवघ्या काही तासांत समजणार आहे. त्याआधी या जागेवरील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी प्रतिक्रिया दिलीय. आम्ही हैदराबादच्या निकालाची वाहतोय. आम्ही या जागेवर जिंकून हैदराबादला न्याय देऊ.आम्ही हैदराबाद जिंकू. देशआत सकारात्मकतेचे वादळ निर्माण होणार आहे, असे माधवी लता म्हणाल्या.

Lok Sabha Election 2024 Result Live : स्मृती इराणी अमेठी राखणार का? मतमोजणीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Lok Sabha Election 2024 Result Live :  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या उत्तर प्रदेशातील अमेठी राखणार का? याचे उत्तर आज मिळणार आहे.  देशाचे लक्ष लागलेला हा प्रमुख मतदारसंघापैकी एक आहे.  

Lok Sabha Election Result : भाजप मुख्यालयात सेलिब्रेशनची तयारी चालू

INDIA Vs NDA Lok Sabha Election Result Live Update : या निवडणुकीत आमचाच विजय होणार, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात सेलिब्रेशनची तयारी चालू झाली आहे. येथे गोड पदार्थ, पुरी तसेच अन्य खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत. 


 





Lok Sabha Election 2024 Result Live : हरियाणामधील लोकसभेच्या 10 जागांवर चुरशीची लढत, भाजप-एनडीएला काँग्रेस-इंडिया धक्का देणार?

Lok Sabha Election 2024 Result Live :  हरियाणामधील लोकसभेच्या 10 जागांवर चुरशीची लढत होणार आहे.  भाजप-एनडीएला काँग्रेस-इंडिया धक्का देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Lok Sabha Election 2024 Result Live : पंजाबमध्ये काँग्रेसचा पंजा की भाजपचे कमळ? आपचा 'झाडू' चालणार? पंजाबमधील 13 जागांचा निकाल थोड्याच वेळात...

Lok Sabha Election 2024 Result Live : पंजाबमध्ये काँग्रेसचा पंजा की भाजपचे कमळ? आपचा 'झाडू' चालणार? पंजाबमधील 13 जागांवरील मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. 

Lok Sabha Election 2024 Result Live : दिल्ली कोणाची? दिल्लीतील सातही जागा भाजप राखणार की काँग्रेस-आप धक्का देणार?

Lok Sabha Election 2024 Result Live :  दिल्ली कोणाची? दिल्लीतील सातही जागा भाजप राखणार की काँग्रेस-आप धक्का देणार?  हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. दिल्लीत लोकसभा निवडणूक ही  दोन्ही आघाड्यांंसाठी महत्त्वाची आहे. 

Lok Sabha Election 2024 Result Live : राजस्थानमध्ये कोणाचे वर्चस्व? 25 जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस

Lok Sabha Election 2024 Result Live :   राजस्थानमध्ये कोणाचे वर्चस्व? असणार हे आज स्पष्ट होणार आहे. राज्यातील 25 जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे. बहुतांशी सर्वच जागांवर एनडीए आणि इंडिया आघाडीत थेट लढत आहे.

Lok Sabha Election 2024 Result Live : राजस्थानमध्ये कोणाचे वर्चस्व? 25 जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस

Lok Sabha Election 2024 Result Live :   राजस्थानमध्ये कोणाचे वर्चस्व? असणार हे आज स्पष्ट होणार आहे. राज्यातील 25 जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे. बहुतांशी सर्वच जागांवर एनडीए आणि इंडिया आघाडीत थेट लढत आहे.

Lok Sabha Election 2024 Result Live : उत्तर प्रदेशातील जनतेचा कौल कोणाला? भाजप-एनडीए आणि सपा-काँग्रेस इंडियात चुरस

Lok Sabha Election 2024 Result Live : उत्तर प्रदेशातील जनतेचा कौल कोणाला? हे आज स्पष्ट होणार आहे. भाजप-एनडीए आणि सपा-काँग्रेस इंडिया आघाडी आणि बसपा यांच्यात 80 जागांवर लढत आहे. 

Lok Sabha Election Result : कंगना, मनोज तिवारी ते अरुण गोविल, अभिनयातील सुपटस्टार राजकारणात तरणार का? सेलिब्रेटींचा आज महानिकाल

Lok Sabha Election Result : उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये कलाकार देखील या निवडणुकांच्या मैदानात उतरले. त्यामुळे कलाकार म्हणून ऐरवी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही मंडळी निवडणुकीच्या रिंगणात जनतेच्या पसंतीस उतरणार का हे आज स्पष्ट होईल. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Lok Sabha Election 2024 Result Live : काऊंटडाऊन चालू! भाजपचं मिशन 400 पार यशस्वी ठरणार?

Lok Sabha Election Result : या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष समोर ठेवले होते. त्या दृष्टीनेच भाजपने संपूर्ण देशात प्रचार केला. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मात्र भाजपला 350 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काय होणार? भाजप यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.    

Lok Sabha Election 2024 Live Updates : अवघ्या काही क्षणात मतमोजणीला सुरुवात

Lok Sabha Election 2024 Result Live Updates : लोकसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. अवघ्या काही तासांत आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर कोण बाजी मारणार आणि कोणाला धक्का बसणार, हे स्पष्ट होईल. 

पार्श्वभूमी

Lok Sabha Elections Results 2024 Live : अवघ्या काही तासांत लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) निकाल लागणार आहे. त्याआधी देशात एकूण सात टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानाची ही प्रक्रिया 1 जून रोजी संपली. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. देशभरातील 542 लोकसभा मतदारसंघासाठीची निवडणूक पार पाडली. गुजरातमधील सूरत येथील निवडणूक बिनविरोध झाली. या जागेवरून भाजप उमेदवार विजयी झाला.  आता 542 जागांवरील निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. 


यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पाडली. या निवडणुकीत 64.2 कोटी मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत एकूण 31.2 कोटी महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाची पुढची दिशा 2024 ची निवडणूक ठरवणार आहे..या निवडणूकीचे निकाल स्पष्ट करतील कुणासोबत सहानुभूती आहे तर कुणासोबत जनमत. कोण गाठणार मॅजिक फिगर तर कुणाच्या हाती जाणार सत्तेचा ट्रिगर. मोदींची जादू पुन्हा चालणार? की जनता नवा पर्याय निवडणार.  राम मंदिर, आर्टिकल ३७०, ट्रिपल तलाक, आरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी कोणता मुद्दा गेमचेंजर ठरणार..? निकालाआधी जनतेचा कल समजल्या जाणाऱ्या एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी भाजपच्या पारड्यात मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. 


2024 एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळतील ? कुणाचं सरकार स्थापन होईल ?













































































एक्झिट पोल एजन्सीएनडीएयूपीएअन्य
1. News18 Mega Exit Poll355-370125-140 42-52
2.Jan Ki Baat 363-392 141-161  10-20 
3. CNX.371-401109-139  28-38 
4. ABP News-CVoter
231-275122-16102-10
5. Republic-Matrize353-368118-13343-48
6. INDIA TODAY - AXIS MY INDIA161-18079-1003-11
7.  DAINIK BHASKAR281-350145-20133-49
8.  INDIA TV371-401109-13928-38
9. TV9 पोलस्ट्राट 21613421
10. Republic TV PMARQ35915430
11. News Nattion 342-378153-15921-23

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.