Anupam Kher : बॉलीवूड व्हाया मंडी करत कंगनाने (Kangana Ranaut) अखेर देशाच्या संसदेत एन्ट्री केलीच. तिच्याच जन्मभूमीतून कंगनाने विजय मिळवला. त्यामुळे बॉलीवूडची ही पंगाक्विन आता देशाच्या संसदेत दिसणार आहे. दरम्यान कंगनाच्या विजयानंतर तिच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचं पाहायला मिळतंय. बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी देखील कंगनाचं अभिनंदन केल्याचं पाहायला मिळालं आहे. 


कंगनाने मंडी या लोकसभा मतदारसंघातून हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या मुलाचा म्हणजेच विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला. विक्रमादित्य सिंह हे काँग्रेसकडून मैदानात होते. दरम्यान मंडी हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जात होता. पण आता या बालेकिल्ल्यावर भाजपचं वर्चस्व राहणार आहे. कंगनाच्या या विजयाचं कौतुक सध्या बॉलीवूडकरही करत असल्याचं पाहायला मिळतंय.  


अनुपम खेर यांनी काय म्हटलं?


अनुपम खेर यांनी एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'प्रिय कंगना तुझ्या या यशासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. तू रॉकस्टार आहेस. तुझा हा प्रवासही खूप प्रेरणादायी होता. हिमाचल प्रदेश आणि मंडीमधील लोकांसाठी आणि तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे. तू वेळोवेळी सिद्ध केलं आहे की, जर एखाद्याने लक्ष केंद्रीत करून कठोर परिश्रम केले तर काहीही होऊ शकत. जय हो.' 






कंगना किती मतांनी विजयी?


दरम्यान कंगना रणौतला 5 लाख 14 हजारांपेक्षा जास्त मतं मिळालीत. त्याचप्रमाणे विक्रमादित्य सिंह यांना 4 लाख 42 हजारांपेक्षा जास्त मतं मिळालीत. त्यामुळे जवळपास 72 हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने कंगनाचा विजय झाला. कंगना रनौत आपला प्रचारादरम्यान काँग्रेसवर निशाणा साधला होता. दरम्यान 'पंगाक्वीन'ने आपल्या विरोधात असलेल्या विक्रमादित्य सिंह यांच्याबद्दल काही वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे अभिनेत्री अडचणीतदेखील आली. कंगना आणि विक्रमादित्य यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे शेवटपर्यंत सुरू होते. कंगना बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असल्याने प्रचारादरम्यान तिला चांगलाच फायदा झाला. 


ही बातमी वाचा : 


Kangana Ranaut : कंगनाची मंडीतून संसदेत ग्रँड एन्ट्री; राजकारणात विजयाचा गुलाल उधळला, आता बॉलिवूडला रामराम करणार?