पंढरपूर : भाजपकडून आज माढा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र या जागेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव मागे पडलं असून, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विजयसिंह मोहिते यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली तर माढ्यात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय शिंदे यांचं आव्हान असेल.




माढा मतदारसंघासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं. त्यामुळे माढामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे आणि भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार असं म्हटलं जात होतं.

विजयसिंह मोहिते-पाटलांच्या आशीर्वादने रणजितसिंह भाजपमध्ये, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याचं चित्र पाहून रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र चंद्रकांत पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचं सांगितलं. आता सर्वेक्षणात पुन्हा विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं समोर आल्याने, उमेदवारीसाठी त्यांचीच चर्चा आहे.

माढ्यातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर फायनल, संजय शिंदेंशी मुकाबला होणार

कोण आहेत विजयसिंह मोहिते-पाटील?

- राज्याच्या राजकारणात जी काही मातब्बर घराणी आहेत, त्यात मोहिते-पाटील घराण्याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.

- सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ राजकारणी आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री

- 1980 ते 2009 दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार

- विजयसिंह मोहिते पाटील हे माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. याच मतदारसंघात 2009 मध्ये शरद पवार खासदार होते.

- विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम अशी खाती सांभाळलेली आहेत.

- त्यांचे पुत्र रणजितसिंह राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार होते. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी

कोण आहेत संजय शिंदे?

- शिवसेना-भाजपच्या मदतीने सध्या सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.

- माढा राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांचे लहान भाऊ आणि मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

- निमगाव 'टेंभुर्णी'च्या सरपंचपदापासून राजकारणाला सुरुवात

- 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव

- जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले.

- पालकमंत्री विजय देशमुख यांच्या मदतीने अध्यक्ष झाले.

- म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन या साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विठ्ठल सूतगिरणीचे अध्यक्ष.

- माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन-जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष

- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद, माढा तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही भूषवलं.

विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी सोडणार नाही, सुनील तटकरेंचा विश्वास

कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर?

- सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष

- अडीच महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी निवड

- खासदार हिंदुराव नाईक निंबाळकरांचे चिरंजीव

- स्वराज उद्योग समुहाची स्थापना

- स्वराज्य उद्योग समुहातून युवकांची फौज

- 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप शिवसेनेच्या युतीकडून हिंदुराव नाईक निंबाळकरांना उमेदवारी

काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपच्या संपर्कात