पणजी : गोव्यात मध्यरात्री घडलेल्या राजकीय घडामोडीत महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात फूट पडली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पत्र दिलं आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे भाजपात विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.


गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर



पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार भाजपात आल्याने गोव्यातील भाजपा सरकार आता स्थिर झालं आहे. गोवा विधानसभेत 36 सदस्यांपैकी आता भाजपाचे 14 सदस्य आहेत.

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री, रात्री दोन वाजता शपथविधी