एक्स्प्लोर

सांगलीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बदलला!

प्रकाश शेंडगे यांची ओळख ही धनगर समाज आणि ओबीसी नेते म्हणून आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीत आणखी चुरस वाढणार आहे.

सांगली : सांगली लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बदलला जाणार आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आणि जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना वंचित आघाडीकडूज उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश शेंडगचे चुलत बंधू जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. सर्वात प्रथम वंचित आघाडीनेच उमेदवार जाहीर केला होता, मात्र आघाडीच्या उमेदवार देण्यावरुन असलेला तिढा आणि बदलती रजकीय परिस्थिती पाहून अधिक सक्षम उमेदवार वंचित आघाडीकडून देण्याचा प्रयत्न आहे. सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक आज पार पडली आणि या बैठकीत उमेदवारी बदलण्याच्या विषयवार चर्चा झाली. त्यात प्रकाश शेंडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून आज याची अधिकृत घोषणा होऊ शकते. सांगली लोकसभा मतदारसंघात जवळपास चार लाखांच्या घरात धनगर समाजाचं मतदान होतं. प्रकाश शेंडगे यांची ओळख ही धनगर समाज आणि ओबीसी नेते म्हणून आहे. शिवाय जयसिंग शेंडगेंपेक्षा ते जास्त सक्रीय आहेत. त्यामुळे प्रकाश शेंडगे जर वंचित आघाडीचे उमेदवार जाहीर झाले तर सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे. सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर झाला आहे. मात्र भाजप उमेदवार संजय पाटील यांच्याविरोधात कोण याचा अजून घोळ अजूनही सुरु आहे. आधी सांगलीची जागा काँग्रेसला की स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा तिढा होता. अखेर ही जागा स्वाभिमानीच्या वाट्याला जागा गेली. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने उमेदवारांच्या बाबतीत चाचपणी सुरु आहे. भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर, वसंतदादा घराण्यातील विशाल पाटील की अन्य कोण? यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खल सुरु आहे. प्रकाश शेंडगे हे जयसिंग शेंडगे यांचे चुलत बंधू आहेत. धनगर आरक्षण लढ्याच्या माध्यमातून प्रकाश शेंडगे यांच्या कामामुळे त्यांची उमेदवारी फायनल करण्यात येणार असून शनिवारी याची अधिकृत घोषणा होणार आहे. "धनगर समाजाला राज्याच्या एकाही पक्षाने या निवडणुकीमध्ये संधी दिली नाही. वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून संधी मिळाल्यास या सरकारविरोधात लढण्यास तयार आहोत," असं प्रकाश शेंडगे यांनी जाहीर केलं आहे. आता प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीत आणखी चुरस वाढणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget