एक्स्प्लोर

मोदी इतरवेळी ठिक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं : शरद पवार

मोदी साहेब आमचं घर भरलेलं घर आहे, ज्यांच्या घरात कोण आहे की नाही हेच दुसऱ्याला माहित नाही त्यांनी इतरांच्या घराबद्दल बोलू नये, असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदींनी लगावला.

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी इतरांच्या घरात डोकावतात मात्र मोदींच्या घरात कुणी आहे की नाही, हेच देशाला माहित नाही. मोदी इतरवेळी ठीकठाक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं अशी टीका शरद पवारांनी मोदींवर केली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी साहेब आमचं घर भरलेलं आहे. ज्यांच्या घरात कोण आहे की नाही हेच देशाला माहित नाही, त्यांनी इतरांच्या घराबद्दल बोलू नये, असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदींनी लगावला.

कार्यकर्त्यांची संवाद साधताना, व्यक्तिगत टीका करू नका कारण व्यक्तिगत टीका करण्याची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतलेली आहे. येत्या 10 तारखेला पंतप्रधान हे बारामतीत येणार आहेत, त्यावेळी ते टीका करतील. वर्ध्यात त्यांनी माझ्यावर टीका केली आहे, त्यामुळे टीका करण्याचं काम त्यांच्याकडे दिलं, असल्याची टीका पवारांनी मोदींवर केली.

मोदी यावेळी पंतप्रधान नाही झाले तर कदाचित खासदार होतील

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि माझे चांगले संबंध आहेत. मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही, हे त्यांनाही माहित आहे. मोदी हे सभेत पवारांवर व्यक्तिगत टीका करत आहेत. त्यामुळे यावेळी मोदी पंतप्रधान नाही झाले तर कदाचित खासदार तरी होतील. भेटल्यावर मी त्यांना आमच्या कुटुंबाबद्दल नक्कीच माहिती देईन, असं शरद पवारांनी कार्यकर्त्यांसमोर सांगितलं.

निवडणुका आल्या की मोदींच्या अंगात येतं

नरेंद्र मोदी यांनी दिल्ली, बारामती आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये जी भाषणे केली, त्यात त्यांनी पवारांवर स्तुतीसुमनं उधळली होती. याचीच आठवण करुन देत शरद पवार म्हणाले की, मोदी इतरवेळी ठिकठाक असतात. मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं, अशी मिश्कील टीका शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर केली.

महत्त्वाच्या बातम्या

Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget