एक्स्प्लोर

काही ठिकाणी भाजप ऐवजी राष्ट्रवादीला मतदान, ईव्हीएम मुद्द्यावर रामदास आठवलेंचा शरद पवारांना टोला

ईव्हीएम मशीन या कॉंग्रेसच्या काळातील आहेत. त्यामुळे काही मशीन खराब असू शकतात. मात्र सर्वच मशिन खराब असू शकत नाहीत, असं रामदास आठवले म्हणाले.

सोलापूर : शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी मी सहमत आहे, कारण काही ठिकाणी कमळाऐवजी (भाजप) राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान झालं आहे, असा मिश्कील टोला रामदास आठवले यांनी शरद पवारांना लगावला.

ईव्हीएम मशीन या कॉंग्रेसच्या काळातील आहेत. त्यामुळे काही मशीन खराब असू शकतात. मात्र सर्वच मशीन खराब असू शकत नाहीत, असं रामदास आठवले म्हणाले. फडणवीस सरकार अनुभवी नसल्याच्या शरद पवार यांच्या वक्यव्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, फडणवीस सरकार अनुभवी नसेल तर त्यांना आणखी पाच वर्षे द्यायला हवीत. रामदास आठवले सोलापूरच्या दुष्काळ दौऱ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दुष्काळाला काँग्रेस-राष्ट्रवादीच जबाबदार

शरद पवार हे अनुभवी आहेत, त्यांच्या सरकारने खूप कामे केली, मग तरीही महाराष्ट्र कोरडा कसा? असा सवाल रामदास आठवलेंनी विचारला. त्यामुळे दुष्काळाला कॉंग्रेस-राष्ट्रवादीच जबाबदार आहे, असा घणाघात ही आठवलेंनी केला.

वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणा नाही

रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवरही टीका केली. प्रकाश आंबेडकरांशिवाय वंचित आघाडीच्या एकाही उमेदवाराला लाखभर मते मिळणार नाहीत. वंचित आघाडीचे बहुतांश नेते ही सत्तेसाठी वंचित आघाडीत गेले आहेत. सत्ता मिळाली नाही तर ते सगळे माझ्याजवळ परततील. प्रकाश आंबेडकर यांनी दोन जागी निवडणूक न लढता एका जागी निवडणूक लढवायला हवी होती, असं मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता येणार नाही, असंही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला महाराष्ट्रात 37 ते 38 जागा मिळतील. सोलापूरची जागा महायुतीकडेच राहणार आहे. देशात युपीएच्या काही जागा वाढतील, काही कमी होतील. मात्र भाजप 260 पेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget