एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अहमदाबादमध्ये मतदान, मतदानानंतर मोदी म्हणतात...

मतदान कुणाला करायचं हे भारतातील मतदारांना समजतं. 21 व्या शतकात जन्मलेल्या आणि पहिल्यांदाच लोकसभेला मतदान करणाऱ्या सर्व युवा मतदारांना या लोकशाहीच्या पर्वात देशातील निर्णायक सरकार बनविण्यासाठीच्या सहकार्यासासाठी शुभेच्छा देतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये केले मतदान केले. यावेळी त्यांची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  मतदानाआधी त्यांनी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली. मतदान केल्यानंतर त्यांनी आपल्या वाहनामधून पत्रकारांशी संवाद केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपअध्याक्ष अमित शाह देखील उपस्थित होते. यावेळी मोदी म्हणाले की, देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. माझे भाग्य आहे की मला आज माझे कर्तव्य निभावण्याची सौभाग्य प्राप्त झाले. मी माझ्या मतदारसंघात मतदान करून या लोकशाहीच्या पर्वात सहभाग घेतला आहे. सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केलं. मतदान केल्यानंतर कुंभच्या मेळ्यात स्नान केल्यानंतर जे भाग्य लाभतं ते भाग्य आज मला लाभलं, असे ते म्हणाले. मतदान केल्याने मला पवित्रता लाभते. लोकशाहीच्या या पर्वात उत्साहात सहभागी व्हा, असे मोदी म्हणाले. मतदान कुणाला करायचं हे भारतातील मतदारांना समजतं. 21 व्या शतकात जन्मलेल्या आणि पहिल्यांदाच लोकसभेला मतदान करणाऱ्या सर्व युवा मतदारांना या लोकशाहीच्या पर्वात देशातील निर्णायक सरकार बनविण्यासाठीच्या सहकार्यासासाठी शुभेच्छा देतो, असेही मोदी यावेळी म्हणाले. जगात भारतीय लोकशाहीची वेगळी ताकद आहे. एकीकडे आयईडी हे दहशतवाद्यांचे हत्यार असते. दुसरीकडे लोकशाहीची ताकत ही वोटर आयडी असते. त्यामुळे या वोटर आयडीचे महत्व कळू द्या, असेही मोदी म्हणाले. तिसऱ्या टप्प्यात महत्वाच्या लढती तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, ओदिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ही तेरा राज्य आणि दादरा नगर हवेली, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील 116 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. गुरुवार 23 मे 2019 रोजी निकाल जाहीर होणार आहे. तिसरा टप्पा - (115) आसाम - 4 बिहार - 5 छत्तीसगड - 7 गुजरात - 26 गोवा - 2 जम्मू काश्मिर - 1 कर्नाटक- 14 केरळ - 20 महाराष्ट्र - 14 ओदिशा - 6 त्रिपुरा - 1 उत्तर प्रदेश- 10 पश्चिम बंगाल - 5 दादरा नगर  - 1 दमण - दीव - 1 भाजपाध्यक्ष अमित शाह हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले असून गांधीनगरमधून त्यांचा फैसला होईल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पहिल्यांदाच वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय मुलायम सिंह यादव, पप्पू यादव, संबित पात्रा यासारख्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget