एक्स्प्लोर
Advertisement
राज ठाकरे राज्यात 8 ते 9 प्रचारसभा घेणार : सूत्र
लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मात्र मोदींविरोधात प्रचार करणार असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे साहजिकच याचा फायदा महाआघाडीला होणार आहे.
मुंबई : मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात आठ ते नऊ प्रचार सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मंचावरुन नाही तर मनसेच्या स्वतंत्र मंचावर सभा घेणार असल्याचं कळतं.
लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मात्र मोदींविरोधात प्रचार करणार असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे सहाजिकच याचा फायदा महाआघाडीला होणार आहे. महाआघाडीच्या महत्त्वाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात जाऊन राज ठाकरे मोदीविरोधी प्रचार करणार आहेत.
VIDEO | टार्गेट ठरलं... मोदी-शाह, मनसैनिकांना भाजपविरोधात प्रचाराचे आदेश
राज ठाकरे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर, अशोक चव्हाण यांच्या नांदेड, राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मावळ, सुप्रिया सुळे यांच्या बारामती, उदयनराजे यांच्या सातारा मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत. याशिवाय काँग्रेसची उमेदवार उर्मिला मातोंडकरच्या उत्तर मुंबई, प्रिया दत्त यांच्या उत्तर-मध्य मुंबई, राष्ट्रवादीचे उमेदवार संजयदीना पाटील यांच्या ईशान्य मुंबई आणि समीर भुजबळ यांच्या नाशिक या मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेणार असल्याचं कळतं.
मात्र राज ठाकरे या सभा किती तारखेला याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही.
VIDEO | मुंबईतील राज ठाकरेंचं गाजलेलं भाषण
राज ठाकरे या ठिकाणी सभा घेण्याची शक्यता
सोलापूर - सुशीलकुमार शिंदे
नांदेड - अशोक चव्हाण
सातारा - उदयन राजे
ईशान्य मुंबई - संजयदीना पाटील
उत्तर मुंबई - उर्मिला मातोंडकर
उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त
बारामती - सुप्रिया सुळे
मावळ - पार्थ पवार
नाशिक - समीर भुजबळ
संबंधित बातम्या
एकदा तरी राज ठाकरेंना आघाडीच्या व्यासपीठावर बोलवून दाखवा : विनोद तावडे
मनसेचं इंजिन यार्डात, लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पक्षाचे स्पष्टीकरण, पाठिंब्याबाबत गुपित कायम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement