एक्स्प्लोर

प्रचारादराम्यान अनुपम खेर यांची फजिती, दुकानदाराच्या प्रश्नावर हात जोडून निघाले!

किरण खेर चंदीगडमध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. यंदाही किरण खेर आणि पवन कुमार बंसल आमनेसामने आहेत. चंडीगड लोकसभा मतदारसंघासाठी सातव्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान होणार आहे.

चंदीगड : पत्नी आणि भाजप उमेदवार किरण खेर यांच्या प्रचारादरम्यान अभिनेते अनुपम खेर यांची चांगलीच फजिती झाली. चंदीगडमध्ये प्रचारादरम्यान एका दुकानदाराने भाजपचा 2014 चा जाहीरनामा दाखवत अनुपम खेर यांना मागील आश्वासनांबद्दल विचारलं. मात्र अनुपम खेर काहीही न बोलता हात जोडून तिथून निघून गेले. किरण खेर चंदीगडमध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर सध्या मोठ्या जोशामध्ये त्यांचा प्रचार करत आहेत. चंदीगडमध्ये प्रचारासाठी काही कार्यकर्त्यांसह अनुपम खेर एका दुकानात पोहोचले. पण दुकानदाराच्या प्रतिक्रियेमुळे अनुपम खेर काहीसे गोंधळले. दुकानदाराच्या हातात भाजपचा मागील लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा होता. जाहीरनामा दाखवत त्याने विचारलं की, "मागील निवडणुकीत तुम्ही काही आश्वासनं दिली होती, यापैकी तुम्ही काय केलं आहे?" मात्र यावेळी अनुपम खेर यांना कोणतंही उत्तर देता आलं नाही आणि ते तिथून हात जोडून निघून गेले. अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या कमेंट्स करुन हा व्हिडीओ शेअर करत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनुपम खेर यांनीही आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिलं की, "काल किरण खेर यांच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी दोन जणांना एका दुकानात ठेवलं होतं, मला भाजपच्या 2014 मधील जाहीरनाम्यावर प्रश्न विचारण्यासाठी. मागे उभा असलेला माणूस व्हिडीओ बनवत असल्याचं पाहून मी तिथून निघालो. आज त्यांनी व्हिडीओ जारी केला. दाढीवाल्याचं कृत्य पाहा." अनुपम खेर यांची फजिती होण्याची ही पहिली घटना नाही. याआधी सोमवारी (6 मे) अनुपम खेर एका सभेला संबोधित करणार होते. पण गर्दी नसल्याने त्यांनी सभा रद्द केली आणि दुसऱ्या सभेत गेले. स्थानिक वृत्तपत्रांनी याचे फोटो शेअर केले होते. यानंतर खेर यांनी मंगळवारी (7 मे) काही वृत्तपत्रांची कात्रणं पोस्ट करुन वृत्तपत्रांच्या दाव्यावर टीका केली. त्यांनी लिहिलं आहे की, "पहिला फोटो अगदी खरा आहे. मी सभास्थळी वेळेच्या आधी पोहोचलो होतो आणि तिथे कोणीही नव्हतं. त्यामुळे मी दुसऱ्या ठिकाणी गेलो. पण दुसऱ्या सभेचा फोटो सत्य सांगत आहे. संबंधित वृत्तपत्र उद्याच्या अंकात हा फोटो शेअर करणार का?" किरण खेर चंदीगडमध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. 2014 मध्येही 1,91,362 मतं मिळाली होती. तर काँग्रेस उमेदवार पवन कुमार बंसल यांनी 1,27,720 मतं मिळवली होती. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आम आदमी पक्षाच्या उमेदवार अभिनेत्री गुल पनाग होती. जागेवर विजय मिळवला होता. आता दुसऱ्यांदा त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यंदाही किरण खेर आणि पवन कुमार बंसल आमनेसामने आहेत. चंडीगड लोकसभा मतदारसंघासाठी सातव्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान होणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP : महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली, सांगता सभेला एकाच मंचावर येणार का? म्हणाले...
सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली, सांगता सभेला एकाच मंचावर येणार का? म्हणाले...
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन, ठाण्यातील हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन, ठाण्यातील हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानियांचा आरोप
संतापजनक... पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
संतापजनक... पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
Taxi And Rickshaw Licenses: मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स होणार रद्द; राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा विरोध
मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स होणार रद्द; राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा तीव्र विरोध
Supriya Sule son in Law: सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा आणखी एक करार, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक
सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा आणखी एक करार, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक
Jalgaon Crime News : 600 बनावट शिक्षकांची भरती अन् कोट्यवधींचा पगार लाटला; शालार्थ घोटाळ्यात 48 अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस
600 बनावट शिक्षकांची भरती अन् कोट्यवधींचा पगार लाटला; शालार्थ घोटाळ्यात 48 अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस
Sahar Shaikh Mumbra AIMIM: कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?
कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?
Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडगिरी उफाळली, टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखासह सात जणांवर गुन्हा दाखल
बीडमध्ये पुन्हा गुंडगिरी उफाळली, टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखासह सात जणांवर गुन्हा दाखल
Embed widget