एक्स्प्लोर

औरंगाबाद लोकसभेच्या तिकीटावरुन काँग्रेसमध्ये जुंपली, आमदार अब्दुल सत्तारांनी बंड पुकारलं, अपक्ष लढणार

काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारलं आहे. सुभाष झांबड यांना पक्षाने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत स्वतः अपक्ष लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा तिकीट वाटपावरुन काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारलं आहे. सुभाष झांबड यांना पक्षाने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत स्वतः अपक्ष लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोडत असल्याचंही म्हटलं आहे. यापूर्वीच मी अशोक चव्हाणांकडे माझा राजीनामाही दिला आहे. तीस वर्ष पक्षाची सेवा केल्यानंतर पक्ष लोकसभेचे तिकीट देईल असं वाटत होतं मात्र तसं काही झालं नाही.  त्यामुळे मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेत असल्याचे सत्तार यांनी सांगितले आहे.  तर दुसरीकडे सत्तार हे आमचे नेते आहेत त्यांची नाराजी दूर होईल, असं लोकसभेचे तिकीट मिळालेल्या सुभाष झांबड यांनी म्हटलं आहे. माझं पक्षात कुणीही ऐकत नाही, अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत?
तर दुसरीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याच्या संदर्भात त्यांचीच एक ऑडीओ  क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे आमचे काम आहे, मी क्लिप ऐकलेली नाही, असे चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.
चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या एका कार्यकर्त्यासोबतच्या फोनवरील संभाषणाची ऑडीओ  क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यामध्ये चंद्रपूरच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरु असताना अशोक चव्हाण हे मी स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे, असे बोलल्याचा संवाद आहे.
WATCH VIDEO | नवीनचंद्र बांदिवडेकरच काँग्रेसचे उमेदवार, काँग्रेसकडून पाठराखण | एबीपी माझा
या विषयवार बोलताना अशोक चव्हाण म्हटले की, खाजगी संभाषण पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही. हे अंतर्गत  विषय आहेत. चंद्रपूरमध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत, कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे माझे काम आहे.  मी क्लिप ऐकलेली नाही, चंद्रपूर संदर्भात वादाचे विषय आहेत. कार्यकर्ते नाराज आहेत, असेही ते म्हणाले.
चंद्रपूर लोकसभेतून  विनायक बांगडे  यांना हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूरमधील अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
बांदिवडेकर यांच्याबाबतचं वादळ शमलं, उमेदवारी कायम : अशोक चव्हाण
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी कायम असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. बांदिवडेकरांचा 'सनातन संस्थे'शी संबंध असल्याचा आरोप झाल्याने त्यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षातून करण्यात येत होती. मात्र ही उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. "आम्ही बांदिवडेकरांबाबत सखोल चौकशी केलेली असून त्यांचा देखील खुलासा प्राप्त झाला आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेलं वादळ शमलेलं आहे. त्यांची उमेदवारी कायम आहे", अशी माहिती चव्हाण यांनी 'एबीपी माझा' सोबत बोलताना दिली आहे. बांदिवडेकर यांच्यावर वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपारा येथील स्थानिक नागरिकांनी काढलेल्या रॅलीत सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर सनातन ही जातीयवाद संस्था आहे, मात्र मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने कोणत्याही एका जातीसाठी करत नाही. माझा सनातन संस्थेशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण बांदिवडेकर यांनी दिलं होतं.
राज्यात अशा असतील थेट लढती 1.    सोलापूर- सुशीलकुमार शिंदे (CONG) विरुद्ध  जयसिध्देश्वराय स्वामी (BJP) 2.    बारामती- सुप्रिया सुळे (NCP) विरुद्ध  कांचन कुल ( BJP) 3.    दिंडोरी-  धनराज महाले (NCP) विरुद्ध  डॉ.भारती पवार ( BJP) 4.    चंद्रपूर- विनायक बांगडे  ( CONG) विरुद्ध  हंसराज अहिर (BJP) 5.    भिवंडी-  सुरेश तावरे ( CONG) विरुद्ध  कपिल पाटील (BJP) 6.    औरंगाबाद- सुभाष झांबड (CONG) विरुद्ध  चंद्रकांत खैरे ( SENA) 7.    जालना- विलास औताडे ( CONG) विरुद्ध  रावसाहेब दानवे (BJP) 8.    लातूर-  मच्छिंद्र कामंत ( CONG) विरुद्ध  डॉ. सुधाकर शृंगारे (BJP) 9.    नाशिक- समिर भुजबळ(NCP) विरुद्ध  हेमंत गोडसे (SENA) 10.    बुलडाणा-  राजेंद्र शिंगणे( NCP) विरुद्ध  प्रतापराव जाधव (SENA) 11.    यवतमाळ- माणिकराव ठाकरे (CONG) विरुद्ध  भावना गवळी ( SENA) 12.    रायगड-  सुनिल तटकरे(NCP)  विरुद्ध  अनंत गिते (SENA) 13.    कल्याण- बाबाजी पाटील(NCP) विरुद्ध  श्रीकांत शिंदे (SENA) 14.    ठाणे- आनंद परांजपे(NCP) विरुद्ध  राजन विचारे (SENA) 15.    मुंबई दक्षिण मध्य-  एकनाथ गायकवाड (CONG) विरुद्ध  राहुल शेवाळे (SENA) 16.    मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा (CONG) विरुद्ध  अरविंद सावंत (SENA) 17.    मावळ- पार्थ पवार(NCP) विरुद्ध  श्रीरंग बारणे( SENA) 18.    शिरुर- अमोल कोल्हे(NCP) विरुद्ध  शिवाजीराव आढळराव (SENA) 19.    शिर्डी- भाऊसाहेब कांबळे (CONG) विरुद्ध  सदाशिव लोखंडे (SENA) 20.    कोल्हापूर- धनंजय महाडिक(NCP) विरुद्ध  संजय मंडलिक (SENA) 21.    हातकणंगले- राजू शेट्टी ( स्वाशेसं)  विरुद्ध  धर्यशील माने (SENA) 22.    परभणी- राजेश विटेकर (NCP) विरुद्ध  संजय जाधव (SENA) 23.    नंदुरबार ( एसटी)-  के. सी पाडवी (CONG) विरुद्ध  हिना गावित (BJP)- 24.    धुळे-  कुणाल पाटील (CONG) विरुद्ध  डॉ. सुभाष भामरे (BJP) – 25.    वर्धा- चारुलता टोकस (CONG) विरुद्ध  रामदास तडस (BJP) – 26.    नागपूर-  नाना पटोले (CONG) विरुद्ध  नितीन गडकरी (BJP) – 27.    गडचिरोली-  डॉ. नामदेव उसेंडी( CONG)  विरुद्ध  अशोक  नेते 28.    मुंबई- उत्तर-मध्य-  प्रिया दत्त (CONG) विरुद्ध  पूनम महाजन (BJP) 29.    अहमदनगर-  संग्राम जगताप (NCP) विरुद्ध  डॉ. सुजय विखे पाटील (BJP) 30.    बीड-   डॉ. प्रीतम मुंडे (BJP) विरुद्ध  बजरंग सोनवणे(NCP) संबंधित बातम्या लोकसभा निवडणूक : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा
लोकसभा निवडणूक : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट
लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी, महाराष्ट्रातील 21 उमेदवार जाहीर
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा
काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, माणिकरावांसह एकनाथ गायकवाडांना उमेदवारी
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर
लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार  

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Embed widget