एक्स्प्लोर

आधी लगीन लोकशाहीचं : यवतमाळमध्ये नवरीनं तर वर्धा, गोंदिया-भंडाऱ्यात नवरदेवानं लग्नाआधी मतदानाचं कर्तव्य बजावलं

नागरिक मोठ्या संख्येने अगदी उन्हाच्या तडाख्यात देखील आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत. दरम्यान यवतमाळ येथे एका नवरीने तर दुसरीकडे भंडारा येथे नवरदेवाने आपल्या लग्नाच्या आधी आपला मतदानाचा अधिकार बजावला.

यवतमाळ / भंडारा : लोकसभा निवडणुकीचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान सुरु आहे. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने अगदी उन्हाच्या तडाख्यात देखील आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत. दरम्यान यवतमाळ येथे एका नवरीने तर दुसरीकडे भंडारा येथे नवरदेवाने आपल्या लग्नाच्या आधी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील पायल डहाके या मुलीचा आज आर्णी तालुक्यातील दाभडी येथे विवाह आहे. यावेळी नवरी असलेल्या पायलने लग्नघटिकेच्या आधी मतदान केले. पायल मतदान करून लग्नाच्या मंडपात आली. मतदान करने आवश्यक आहे त्यामुळे पहिले मतदान आणि नंतर संसाराला सुरुवात करत असल्याचे पायल हिने एबीपी माझाशी बोलताना सांगितले. दुसरीकडे, भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील इंदौरा येथील नवरदेवाने देखील लग्नापूर्वी मतदान केंद्रावर येऊन आधी मतदानाचा हक्क बजवला. लाखांदूर तालुक्यातील इंदौरा येथील नवरदेव पितांबर जेंगठे यांचा विवाह गडचिरोली येथील सावंगी गावात आहे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदान करने आवश्यक असल्याचे सांगत पितांबरने आपली वरात सुरुवातीला इंदौरा येथील मतदान केंद्रवर वळविली.  मतदान केंद्र गाठत त्याने आधी मतदान केले आणि नंतर तो आपल्या लग्नस्थळी निघाला. यावेळी वाजतगाजत नवरदेव मतदान करण्यासाठी केंद्राकडे येत असल्याने त्याला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तर वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या सावल येथे राहणाऱ्या किशोर तुकाराम मानमोडे यांचंही आज लग्न होतं. नागपूर जिल्ह्यातील जुनापाणी चौकी येथे हा लग्नसोहळा  होता. त्यापूर्वी सकाळी सावल येथे वरात निघाल्यानंतर नवरदेव किशोर मानमोडे यांनी विवाहापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. गोंदियाच्या कांरजा गावात राहणाऱ्या देवीदास उराडे या नवरदेवाने देखील थेट मतदान केंद्रावर आपली फिरती वरात घेऊन जात मतदान केले. विदर्भातील मतदान टक्केवारी : दुपारी एक वाजेपर्यंत  ▶️वर्धा 30.22 टक्के ▶️रामटेक - 23.29 टक्के ▶️नागपूर - 27.47 टक्के ▶️भंडारा-गोंदिया - 32.02 ▶️चंद्रपूर - 30.5 टक्के ▶️गडचिरोली-चिमुर 42 टक्के ▶️यवतमाळ-वाशिम - 26.9 टक्के राज्यातील पहिल्या टप्प्यातील प्रमुख लढती (07) नागपूर - नितीन गडकरी (भाजप) VS नाना पटोले (काँग्रेस) वर्धा - रामदास तडस (भाजप) VS चारुलता टोकस (काँग्रेस) VS अॅड. धनंजय वंजारी (वंचित बहुजन आघाडी) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (शिवसेना) VS माणिकराव ठाकरे (काँग्रेस) गडचिरोली-चिमुर अशोक नेते (भाजप) VS नामदेव उसेंडी (काँग्रेस) चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप) VS बाळू धानोरकर (काँग्रेस)  रामटेक - कृपाल तुमाणे (शिवसेना) VS किशोर गजभिये (काँग्रेस)  भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे (भाजप) VS नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget