एक्स्प्लोर

Lok Sabha Elections 2024: 2019 नंतर 'या' राज्यांमध्ये भाजपचा पराभव; आगामी लोकसभा निवडणुकीवेळी काय असेल परिस्थिती? पाहा आकडेवारी

Lok Sabha Elections 2024 Date: पुढील वर्षी 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.

Lok Sabha Elections: पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या संभाव्य लोकसभा निवडणुका 2024 (Lok Sabha Election 2024) बाबत भाजपसमोर मोठं आव्हान आहे. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता आगामी लोकसभा निवडणुकीत याच राज्यांमध्ये भाजपच्या विजयाची किती शक्यता आहे? हे जाणून घेण्यासाठी INDIA TV-CNX नं नुकतंच एक सर्वेक्षण केलं आहे.  सर्वेक्षणातून काय निष्कर्ष समोर आलाय? हे सविस्तर जाणून घेऊयात... 

2019 नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. पश्चिम बंगालचे निकाल तर सर्वात धक्कादायक होते. येथे पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढूनही त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

NDA ला यंदाच्या लोकसभेत किती जागा मिळण्याची शक्यता?

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश या पाच राज्यांतील खराब कामगिरीनंतरही 2024 च्या लोकसभेत भाजप आघाडीला (NDA) पराभव पत्करावा लागल्याचं दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात पुढील सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएला एकूण 48 पैकी 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, विरोधकांच्या INDIA ला देखील समान 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

गेल्या 2019 च्या निवडणुकीत भाजपनं एकहाती 23 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, झारखंडबद्दल बोलायचं झालं तर, या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 14 पैकी 13 जागा मिळू शकतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपनं 11 जागा जिंकल्या होत्या.

दिल्ली, पंजाबमध्ये बदल पाहायला मिळू शकतो

सर्वेक्षणानुसार, आगामी निवडणुकीतही दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची परिस्थिती फारशी चांगली दिसत नाही. 2024 च्या निवडणुकीत भाजपला दिल्लीत 5 जागा मिळत आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला जोरदार धक्का बसणार आहे. 2024 च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 42 जागांपैकी भाजपला केवळ 12 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

येथे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडी इंडियाला मोठा फायदा होत आहे. येथे इंडियाला 30 जागा मिळतील असं दिसतंय. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपनं एकहाती 18 जागा जिंकल्या आहेत. दिल्लीत दमदार कामगिरी करताना लोकसभेच्या सातही जागा जिंकून त्यांनी विरोधकांचं कंबरडं मोडलं होतं.

हिमाचलमध्येही भाजपला झटका बसणार

नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाच्या निकालांवर विश्वास ठेवला तर हिमाचल प्रदेशातही भाजपला धक्का बसू शकतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. आणि इंडियाला 1 जागा मिळणं अपेक्षित आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 2019 मध्ये भाजपनं लोकसभेच्या चारही जागा काबीज केल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतही भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपनं 25 तर काँग्रेसनं 40 जागा जिंकल्या होत्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

India Tv CNX Survey: भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार? विरोधकांच्या INDIA ला किती जागा मिळणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
Baramati Vidhansabha Bypoll: बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...
बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...
Baramati and Rahuri By Election: शरद पवार निवडणूक लढणार नाहीत, पण...; बारामती, राहुरीच्या पोटनिवडणुकीवर संजय राऊतांचं मोठं विधान
शरद पवार निवडणूक लढणार नाहीत, पण...; बारामती, राहुरीच्या पोटनिवडणुकीवर संजय राऊतांचं मोठं विधान
मोठी बातमी: बारामती आणि राहुरीच्या रिंगणात काँग्रेसची एन्ट्री! पोटनिवडणूक लढवण्यास पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील, मित्रपक्षांसोबत चर्चेनंतर नावांची घोषणा
बारामती आणि राहुरीच्या रिंगणात काँग्रेसची एन्ट्री! पोटनिवडणूक लढवण्यास पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील, मित्रपक्षांसोबत चर्चेनंतर नावांची घोषणा

व्हिडीओ

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Strait of Hormuz: गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
Sunetra Pawar: 'पटेल न पटेल' पण पक्षातंर्गत 'तट'बंदी मोडून काढत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम! प्रफुल पटेलांचा 'समकक्ष' ताबाही निकालात
'पटेल न पटेल' पण पक्षातंर्गत 'तट'बंदी मोडून काढत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम! प्रफुल पटेलांचा 'समकक्ष' ताबाही निकालात
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
सातारा झेडपीत 'खाकी'च्या धाकात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडल्यानंतर सभापती निवडीतही वादाचा अध्याय; भाजपची पुन्हा फोडाफोडी, राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा बहिष्कार, पालकमंत्री म्हणाले, 'आगे आगे देखो होता है क्या'
सातारा झेडपीत 'खाकी'च्या धाकात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडल्यानंतर सभापती निवडीतही वादाचा अध्याय; भाजपची पुन्हा फोडाफोडी, राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा बहिष्कार, पालकमंत्री म्हणाले, 'आगे आगे देखो होता है क्या'
संतापजनक... पिंपरीत 7 वर्षीय चिमुकलीवर दोनवेळा अत्याचार, आईने खिडकीतून बघितल्याने उलगडलं, नराधमास अटक
संतापजनक... पिंपरीत 7 वर्षीय चिमुकलीवर दोनवेळा अत्याचार, आईने खिडकीतून बघितल्याने उलगडलं, नराधमास अटक
Embed widget