Nandurbar Lok Sabha Election Result 2024 : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पहिला विजय जवळपास निश्चित झाला आहे. नंदुरबारमधून गोवाल पाडवी (Goval Padvi) हे विजयी आघाडी घेतली आहे. 


नंदुरबारमध्ये भाजपच्या उमेदवार हीना गावित (Heena Gavit) या पिछाडीवर आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी हे 22 व्या फेऱ्यात 1 लाख 64 हजार मतांनी आघाडीवर आहेत. आता गोवाल पाडवी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.


नंदुरबार काँग्रेस काबीज करणार 


हिना गावित यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. तर गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी सभा घेतली होती. नंदुरबार हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मधल्या काळात भाजपाने येथे बस्तान बसवले होते. मात्र आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेस काबीज करणार असे दिसून येत आहे. 


आणखी वाचा 


Maharashtra Lok Sabha Election Result LIVE : दक्षिण मुंबईत ठाकरेंचाच बोलबाला; अरविंद सावंत 20 हजार 42 मतांनी आघाडीवर, शिंदे गटाच्या यामिनी जाधव पिछाडीवर