Akola Lok Sabha Electio Result Update: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतांची मोजणी केली जात आहे. पुढच्या काही तासांत कोणत्या जागेवरून कोणाचा विजय झाला, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अकोला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष होते. या जागेवरही आता मतमोजणी चालू असून येथे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे 500 मतांनी पुढे आहेत.


अकोला या जागेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण या जागेवरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे उभे राहिलेले आहेत. दुसरीकडे याच जागेवरून काँग्रेचे अभय पाटील हे मैदानात आहेत. तर दुसरीकडे भाजपनेही अनुप धोत्रे यांच्या रुपात आपला उमेदवार उभा केलेला आहे. सध्या या जागेसाठी मतमोजमई केली जात आहे. सध्या येथे प्रकाश आंबेडकर हे 500 मतांनी आघाडीवर आहेत. अजूनही येथे मजमोजणी चालूच आहे. त्यामुळे आंबेडकरांची ही आघाडी कायम राहणार की भाजप, काँग्रेसचे उमेदवार आंबेडकरांना मागे टाकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


अकोल्यात कोणामध्ये होणार प्रमुख लढत


अभय पाटील  - काँग्रेस 
अनुप धोत्रे      - भाजप
प्रकाश आंबेडकर - अकोला 


हेही  वाचा :


मोठी बातमी! मतमोजणीदरम्यान संभाजीनगरात गोंधळ, पोलिसांचा हस्तक्षेप; नेमकं कारण काय?


Maharashtra Lok Sabha Election Result LIVE : मुंबईत अरविंद सावंत, अमोल कीर्तिकर आघाडी टिकवून, तर अमरावतीत नवनीत राणा पिछाडीवर


मोठी बातमी! मतमोजणीआधीच हिंगोलीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड