Maharashtra Lok Sabha Election Result LIVE : लोकसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी

Lok Sabha Election Results 2024 Live Updates Maharashtra: लोकसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागांवर यश मिळवत महायुतील धक्का दिला.

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 07 Jun 2024 09:09 AM
देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची भेट

नवी दिल्ली :  देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट झाली. सरकारमधून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्याशिवाय राज्यातील पराभवाच्या कारणांवर सविस्तर चर्चा झाली. फडणवीसांनी रचनात्मक काम करण्याची इच्छा अमित शाह यांना बोलून दाखवल्याचं समोर आलेय. राजीनाम्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 

अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा

सांगलीचे नवनिर्वाचित अपक्ष खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम हे सोनिया गांधी यांची भेट घेण्याकरिता दिल्लीतील त्यांच्या 10 जनपथ या बंगल्यावर दाखल झाले आहेत. अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं पत्र दिल आहे. 

वर्षा बंगल्यावर CM एकनाथ शिंदे आणि नवीन खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक

वर्षा बंगल्यावर CM एकनाथ शिंदे आणि नवीन खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक... 


इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्यासंदर्भात खासदारांना सूचना


शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्री पदाच्या संदर्भात ही झाली महत्त्वपूर्ण चर्चा


बैठकीत नरेंद्र मोदी आणि एनडीए च्या सत्ता स्थापने संदर्भात महत्त्वाची चर्चा 


नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पाठिंबा बाबत झाली चर्चा 


आज रात्री सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीला रवाना होणार

लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये राडा, निलेश लंकेंच्या समर्थकाची गाडी फोडली

लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये राडा...खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला... पारनेर शहरात आठ ते नऊ जणांनी  हल्ला केल्याची माहिती. या हल्ल्यात राहुल झावरे यांची गाडी फोडून केली मारहाण...मारहाणीत झावरे जखमी, उपचारासाठी केले दाखल.... पारनेर शहरात तणावपूर्ण शांतता...अद्याप गुन्हा दाखल नाही...

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात,शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना अभिवादन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी 1 वाजता नागपुरात दाखल झाले... विमानतळावरून ते थेट शिवाजीनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करायाला पोहोचले...


स्थानिक नागरिकांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवाजीनगर मधील शिवाजी उद्यानात कार्यक्रम आयोजित केले होते...  


छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत फडणवीस यांनी माल्यार्पण केले... त्यानंतर स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू १२ तारखेला घेणार शपथ

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू १२ तारखेला घेणार शपथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित

Vinod Tawade : विनोद तावडे जे पी नड्डा आता यांच्या घरी दाखल

विनोद तावडे जे पी नड्डा आता यांच्या घरी दाखल, तिथे बैठक सुरू आहे सकाळपासून त्यात शाह आहेत. थोड्या वेळापूर्वी मनसुख मंडविय तिथेच गेले. 
ते शपथविधी कार्यक्रमाची तयारी करण्याच्या दृष्टीनं भेटायला गेले आहेत

Ajit Pawar NCP meeting : अजित पवारांच्या बैठकीत विधानसभानिहाय मतदानाबाबत चर्चा, घटलेल्या मतदानावरुन चिंता

अजित पवार यांच्या बंगल्यावर नेत्यांमधील बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय नेत्यांनी झालेलेल्या मतदानाबाबत चिंता व्यक्त केली. 


संविधान बदलणार असा बागुलबुवा करणे, जातीय समीकरण यांचा फटका बसल्याचा सूर काही नेत्यांनी बोलून दाखवला 


काही मतदार संघात युती असून मतांमध्ये रूपांतर नाही 


काही विधानसभेत युतीचे नेते एकत्र पण स्थानिक पातळींवर  मतं मिळाली नाहीत आणि इतर पराभवाच्या कारणांवर नेत्यांमध्ये चर्चा 


 आगामी निवडणूक आणि पुढील पक्षाची रणनीती यासंदर्भात देखील नेत्यांमध्ये चर्चा


 आमदारांच्या मतदारसंघांमध्ये खदखद आहे, आमदारांचे प्रश्न  सोडवले जावेत या संदर्भात देखील नेत्यांमध्ये चर्चा

Sanjay Raut on Vishal Patil : विशाल पाटील महाविकास आघाडीसोबत राहतील, आम्हाला विश्वास : संजय राऊत

संजय राऊत काय म्हणाले? 


तृणमूल काँग्रेसचे शिष्टमंडळ आज उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी मातोश्रीवर भेट घेईल. पुढील आमची काय रणनीती असेल याबाबत ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतील. राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार का याबाबत काँग्रेस पूर्णपणे निर्णय घेईल मात्र इंडिया कडेतील काँग्रेसची संख्या पाहता विरोधी पक्षनेते पद हे काँग्रेसकडे राहील. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. कुणाला विरोधी पक्षनेते करायचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेलं बालनाट्य आता बंद करावं.


विशाल पाटील महाविकास आघाडी सोबत राहतील याचा आम्हाला विश्वास आहे

Rahul Gandhi LOP : विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. लवकरच काँग्रेस कडून अधिकृत घोषणा केली जाणार सूत्रांची माहिती. 
येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक होणार. बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार . इंडिया आघाडीच्या वतीने एकत्रितपणे राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते पद दिले जाणार

Lok Sabha Election Result 2024: लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Lok Sabha Election Result 2024: लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता


लवकरच काँग्रेस कडून अधिकृत घोषणा केली जाणार सूत्रांची माहिती 


येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक होणार


 बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार 


इंडिया आघाडीच्या वतीने एकत्रितपणे राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते पद दिले जाणार

BJP Meeting : जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू असून त्यात गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहेत


 मित्रपक्षांशी चर्चेसाठी स्थापन करण्यात आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या समितीत हे दोन्ही नेते आहेत.  मित्रपक्षांशी चर्चेचा अजेंडा काय असावा, त्यांना कोणत्या प्रमाणात मंत्रिमंडळात स्थान द्यायचे, अपक्ष खासदारांना कसे स्थान द्यायचे, यावर महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन

काल देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला संघटनेसाठी मुक्त करा, अशी विनंती पत्रपरिषदेत केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून चर्चा केली.


एकूण भावना जाणून घेतल्यानंतर प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.


उद्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्याने त्यावेळी भेट होण्याची शक्यता.

Ajit Pawar NCP Meeting : अजित पवारांच्या बैठकीला कोण कोण उपस्थित?

लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाची देवगिरीवर महत्त्वाच्या नेत्यांची आणि मंत्र्यांचे महत्त्वपूर्ण बैठक.  या बैठकीला आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ , दिलीप वळसे पाटील , अनिल पाटील आदिती तटकरे,संजय बनसोडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे, रामराजे निंबाळकर हे देवगिरीवर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.  या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाची कारणे, आगामी पक्षाची रणनीती, सायंकाळी आमदारांची होणारी बैठक, आमदारांची असणारी खदखद आणि केंद्रातून पक्षाला मिळणार मंत्रिपद याबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती.

अजित पवारांच्या आमदारांमध्ये धाकधूक, दादांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला कोण कोण दांडी मारणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश पाहता अजित पवारांच्या आमदारांमध्ये धाकधुक. अजित पवार यांच्या आमदारांनी महायुतीचं काम करा असं कार्यकर्त्यांना सांगून देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने आमदारांमध्ये संभ्रमाची भावना.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाढतं महत्त्व पाहता अजित पवारांच्या आमदारांकडून पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघातील जनमताचा कौल घेतला जाणार. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आलेल्या अडचणींचा पाढा आज अजित पवार यांच्यासमोर आमदार वाचण्याची शक्यता. जनतेमध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, संविधान बदलणार या बाबी अधिक प्रमाणत रूचल्यामुळे जनतेशी कनेक्ट होण्यात अडचणी येत असल्याची आमदारांची भावना

तुम्ही मर्द आहात आशिषजी शब्दाला जागा आणि राजकारण सोडा, किर्तीकुमार शिंदे यांचं आशिष शेलार यांना पत्र

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कीर्तीकुमार शिंदे यांचे भाजप नेते आशिष शेलार यांना पत्र... तुम्ही मर्द आहात आशिषजी शब्दाला जागा आणि राजकारण सोडा... लोकसभा निवडणुकीपूर्वी आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला १८ जागा मिळाल्यास राजकारण सोडणार असे वक्तव्य केले होते त्यामुळे आता आशिष शेलार यांनी शब्दाला जागत राजकारण सोडावे... ठाकरे गटाकडून आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा समाचार आणि टीका...

Varsha Gaikwad - नवनियुक्त खासदार वर्षा गायकवाड उद्धव ठाकरेंची भेट घेणार

मुंबई काँगेस अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदासंघांच्या नवनियुक्त खासदार प्रा वर्षाताई गायकवाड या दुपारी बारा वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत.


 

MP LIST : नवनिर्वाचित खासदारांची यादी आज निवडणूक आयोग राष्ट्रपतींना सादर करणार 

नवी दिल्ली - नवनिर्वाचित खासदारांची यादी आज निवडणूक आयोग राष्ट्रपतींना सादर करणार 


मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार


भेट घेत नवनिर्वाचित खासदारांची यादी राष्ट्रपतींना सुपूर्द करणार


त्यानंतर राष्ट्रपती सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतील

Sanjay Raut : जनादेश इंडिया आघाडीकडे, त्यानुसार योग्य वेळी पाऊलं उचलू

INDIA Alliance Meeting : संजय राऊतांनी म्हटलं आहे की, कालच निकाल लागला आहे. निकाल उत्तम लागले आहेत. हा जनादेश इंडिया आघाडीकडे आहे. हा जनादेश झुगारून ते सरकार बनवत आहेत. लोकांच्या मनात इच्छा आहे आहे, त्यानुसार योग्य वेळी आम्ही पाऊल उचलू, असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.

PM Modi Oath : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 8 जूनला शपथविधी पार पडणार 

Narendra Modi Oath Taking Ceremony: 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 8 जूनला शपथविधी पार पडणार 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्र्यांचा देखील त्याच दिवशी शपथविधी पार पडणार 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता 


7 आणि 8 तारखेला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार


एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती

Nitish Kumar and Chandrababu Letter to NDA : नितीश आणि चंद्रबाबू नायडू यांनी एनडीएनला समर्थन पत्र दिलं 

Lok Sabha Election Results 2024 : एनडीएनला नितीश आणि चंद्रबाबू नायडू यांनी समर्थन पत्र दिलं आहे. एकनाथ शिंदे आणि प्रफुल पटेलही आपल्या पक्षाचं समर्थन पत्र देणार असल्याची माहिती समोर येत आहे. आजच एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे. सर्वाचं समर्थन आणि सह्या घेण्याचं काम सुरु असल्याची माहिती आहे.

Rohit Pawar : अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार विधानसभेला उतरवणार का? रोहित पवारांचं रोखठोक उत्तर

Lok Sabha Election 2024 Results : अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार विधानसभेला उतरवणार का, यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिकीट कोणाला कसे द्यायचे, हे साहेब ठरवतात. साहेबांना याबाबत विचारावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रातील मोठे नेते पश्चिम महाराष्ट्रातील योग्य निर्णय घेतील. येणाऱ्या काळात 200 च्या पुढे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतील, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

मित्र पक्षांसमवेत समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत; महायुतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान, 'चर्चा तर होणार'

मुंबई : राज्यातील महायुतीच्या व भाजपच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, असे म्हणत उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लोकसभा निवडणुकांच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच, महाविकास आघाडी व महायुतीमधील दोघांच्या मतांमधील फरकाची आकडेवारी सांगत, आम्हाला मोठ्या प्रमाणात मतं मिळाल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबईतील 6 जागांपैकी 2 जागांवर आम्हाला विजय मिळाला, पण 6 जागांवरही आम्हाल भरगोस मतं मिळाल्याचं  फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, निवडणूक प्रचारात काही नेरेटीव्ह तयार करण्यात आला, संविधान बदलणार आहेत, असा अपप्रचार केला, त्याचा फटका महायुतीच्या (Mahayuti) बसल्याचंही फडणवीस यांनी मान्य केलं. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Devendra Fadnavis: खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर दिला, प्रदेशाध्यक्षांची पाठराखण केली अन् उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची भाषा; देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेने खळबळ

Devendra Fadnavis: मुंबई: राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या. तर गेल्या निवडणुकीत 23 खासदार निवडून आणणाऱ्या भाजपची 9 जागांपर्यंत घसरण झाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत थेट उपमुख्यमंत्रीपद सोडून भाजप (BJP) पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

मोठी बातमी : मला उपमुख्यमंत्रिपदावरुन मुक्त करा, देवेंद्र फडणवीसांची भाजप नेतृत्त्वाला विनंती

Devendra Fadnavis News : आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, मला सरकारमधून मोकळं करावे (Deputy Chief Minister of Maharashtra) अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी (Vidhansabha Election ) पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते मुंबईमध्ये बोलत होते.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Lok Sabha Election Result 2024: जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल

Lok Sabha Election Result 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर आले आहेत. 


नाशिकचे नव निर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल

Nashik Lok Sabha Result: नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे विजयी, शुभेच्छा देणारे होर्डिंग्स चर्चेत

Nashik Lok Sabha Election Result 2024: नाशिक :  नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर जिल्ह्यात ठीक ठिकाणी त्यांचे अभिनंदनचे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. त्यातील नाशिकच्या मुंबई नाका परिसरात लावण्यात आलेले होर्डिंग सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. वाजे यांना शुभेछ्या देणारे होर्डिंग हे खासदार चार होर्डिंगवर मिळून खा-स-दा-र असा शब्द टाकण्यात आला आहे. त्यामुळे हे होर्डिंग सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

जालना-अंतरवली सराटीमध्ये महादेव जानकर यांना लीड, मविआच्या संजय जाधवांना 531 मतं, तर महादेव जानकरांना 629 मतं

Jalna Lok Sabha Election Result 2024 : जालना : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत आरक्षण आंदोलनाचा प्रभाव असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, परभणी लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे संजय जाधव हा सामना झाला होता, या  सामन्यात मराठा आरक्षणाचा केंद्र असलेल्या अंतरवाली सराटीमध्ये महादेव जानकर यांना लीड असल्याचे समोर आलंय, कालच्या मतमोजणीत जानकर यांना अंतरवालीसरटीत 98 मतांची लीड आहे, अंतरवाली सराटी मध्ये एकूण 1160 एवढं मतदान झालं होतं, यापैकी विद्यमान खासदार संजय जाधव यांना 531 एवढी मत मिळाली तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना 629 एवढी मतं मिळाली, त्यामुळे जरांगेंच्या आंदोलन स्थळी ओबीसी उमेदवाराला 98 मतांची आघाडी मिळालीय.

Lok Sabha Election 2024 Result: देशातील वारं बदललं, NDA सरकार स्थापनेपूर्वी राजकारणात मोठा ट्विस्ट येणार? नितीश कुमार-तेजस्वी यादव एका विमानाने दिल्लीला

Nitish Kumar, Tejashwi Yadav : नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. आता दिल्लीत (Delhi News) नवं सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आज दिल्लीत एनडीएची बैठक (NDA Meeting) होत असतानाच विरोधी पक्ष इंडिया आघाडीचीही (India Alliance) महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत दाखल होणार आहे. तेजस्वी यादव हे देखील इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

Ajit Pawar: अजित पवार आजचा दिल्ली येथील एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत

Delhi NDA Meeting: अजित पवार आज दिल्ली येथील एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. आज एनडीएच्या बैठकीला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत. 

North West Mumbai Lok Sabha Constituency: उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार
North West Mumbai Lok Sabha Constituency: उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार असल्याची सूत्रांची माहिती

 

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे  उमेदवार अमोल कीर्तीकर हे अखेरच्या निकालात  आघाडीवर असताना फेर मतमोजणी घेण्यात आली आणि यामध्ये कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला 

 

या निकालामध्ये गडबड झाल्याचा शिवसेना ठाकरे गटाला संशय आहे, त्यामुळे या निकालाला  शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार असून पक्षाकडून यासंबंधी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. या सगळ्या संदर्भात शिवसेना ठाकरे गट राष्ट्रपतींनासुद्धा पत्र पाठवणार असल्याची माहिती आहे. 
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency Result 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील विभागनिहाय आकडेवारी

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency Result 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ 


1. सावंतवाडी


 विनायक राऊत : 53593 मतं 

 नारायण राणे : 85312 मतं 

 

2. कुडाळ 

 

विनायक राऊत : 53277 मतं 

नारायण राणे : 79513 मतं 

 

3. कणकवली 


विनायक राऊत : 50424 मतं 

 नारायण राणे : 92419 मतं 

 

4. राजापूर 


विनायक राऊत : 74856 मतं 

 नारायण राणे : 53385 मतं 

 

5. रत्नागिरी 


विनायक राऊत : 74718 मतं 

 नारायण राणे : 84755 मतं 

 

6. चिपळूण 


विनायक राऊत : 76619 मतं 

नारायण राणे : 59992 मतं 

 




Bhiwandi Lok Sabha Result: भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पराभवाचा धक्का; सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा ठरले जायंट किलर

Bhiwandi Lok Sabha Result 2024: भिवंडी: भिवंडीत भाजपा उमेदवार केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना पराभवाचा धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी जायंट किलर ठरत कपिल पाटलांचा पराभव केला आहे. सुरेश म्हात्रे यांनी 4 लाख 98 हजार 199 मते मिळवीत कपिल पाटील यांचा 66292 मतांनी पराभव केला. कपिल पाटील यांना 4 लाख 31 हजार 907 मते मिळाली.तर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना 2 लाख 30 हजार 254 मतं मिळाली आहेत.


निवडणुकीच्या सुरवातीपासून भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्या पासून सुरेश म्हात्रे हेच त्यांना तगडे आव्हान देऊ शकतात. यासाठी एक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी आग्रह धरला होता. तर महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे,काँग्रेस,समाजवादी पार्टी,आर पी आय सेक्युलर आणि विविध सामाजिक संघटनांनी प्रचारात सुरवातीपासून आघाडी घेत वातावरण निर्मिती केली होती. त्यातून हा विजय मिळवणे शक्य झाले आहे. 
Nashik Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभा 2024 मतदारसंघाची आकडेवारी

Nashik Lok Sabha Election Result 2024: नाशिक लोकसभा अंतर्गत विधानसभा मतदार संघ निहाय उमेदवारांना मिळालेली मतं



सिन्नर विधानसभा

 

राजभाऊ वाजे :  1 लाख 59 हजार 492 मतं

हेंमत गोडसें : 31 हजार 254 मतं

 

देवळाली विधानसभा

 

राजभाऊ वाजे : 81 हजार 200 मतं

हेंमत गोडसे : 54 हजार 64 मतं 

 

नाशिक पूर्व

 

राजभाऊ वाजे : 89 हजार911

हेंमत गोडसे : 1 लाख 311

 

नाशिक मध्य

 

राजभाऊ वाजे :  88 हजार 712 मतं

हेंमत गोडसे : 84 हजार 906 मतं

 

नाशिक पश्चिम

 

राजभाऊ वाजे:-  93 हजार 617

हेमंत गोडसें:- 1 लाख 24 हजार 827

 

इगतपुरी

 

राजभाऊ वाजे : 1 लाख 1 हजार 585 मतं

हेंमत गोडसे : 58 हजार 52 मतं 

 

एकूण मतदान

 

राजाभाऊ वाजे : 6 लाख 14 हजार 517 मतं

हेंमत गोडसे : 4 लाख 53 हजार 414 मतं

 

सिन्नर हे राजभाऊ वाजे यांचे होमपीच आहे, या मतदार संघात राजभाऊ वाजे यांना 1 लाख 28 हजार 238 मतांची निर्णयाक आघाडी मिळाली. अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे इथले आमदार आहेत. 

 

सिन्नरचा लीड वाढत असतानाच हेंमत गोडसे यांच्या समोर इगतपुरी मतदार संघातील लीड तोडण्याचं आव्हान उभं राहिले इगतपुरी मतदारसंघात 43 हजारांची आघाडी उभी राहिली. काँग्रेसचे हिरामण खोसकर इथले आमदार आहेत. सिन्नरला लागून असणाऱ्या देवळाली मतदारसंघातही  हेंमत गोडसेना पीछेहाट बघायला मिळाली. 27 हजार 136 मतांची आघाडी राजभाऊ वाजेंना मिळाली. अजित पवार गटाच्या सरोज अहिरे इथल्या आमदार आहेत

 

ग्रामीण भागातील राजभाऊ वाजेचा लीड नाशिक शहरातील भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या नाहीक पूर्व मतदार संघात तोडण्याचा प्रयत्न महायुतीनं केला.

हेंमत गोडसेंना नाशिक पूर्व मतदार संघात 10 हजार 400 मतांची आघाडी मिळाली. 

 

नाशिक पूर्वनंतर नाशिक पश्चिम मतदार संघात हेंमत गोडसेंना  31 हजार 210 मतांची आघाडी मिळाली. मात्र, या दोन्ही मतदार संघातील आघाडी सिन्नर, इगतपुरीचा लीड तोडू शकली नाही. भाजपच्या सीमा हिरे नाशिक पश्चिमच्या आमदार आहेत. 

 

शहरातील या दोन्ही मतदारसंघात हेंमत गोडसेंना आघाडी मिळाली. मात्र, भाजपाच्या देवयानी फरांदे आमदार असणाऱ्या नाशिकमध्य मतदार संघात चुरशीची लढाई झाली. अल्पसंख्याक मतांच्या जोरावर राजभाऊ वाजे यांचं पारडे पुन्हा जड झालं 3 हजार 806 मतांची पुन्हा आघाडी गोडसेंना मिळाली.

 

भाजपच्या तिन्ही आमदाराच्या मतदार संघात हेंमत गोडसेंना बऱ्यापैकी मतं मिळाली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगेसच्या ताब्यात असणाऱ्या मतदार संघात हेंमत गोडसेंना फटका बसला आणि सरतेशेवटी त्यांना पराभवाला समोरं जावं लागलं.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: पवार-ठाकरेंनी महाराष्ट्रात, तर राहुल-अखिलेशनं उत्तर प्रदेशात NDA चा विजयरथ रोखला; काय सांगतात निकालाचे आकडे?

Lok Sabha Election Result 2024 LIVE: नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) निकाल लागले आहेत. सध्याची परिस्थिती पाहिली तर एनडीएनं (NDA) बहुमताचा आकडा ओलांडला आहे, पण भाजप (BJP) स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल, असं दिसत नाही. निवडणूक निकालांनुसार, एनडीए 291 जागांसह आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडीला (India Alliance) आतापर्यंत 234 जागा मिळाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत एकीकडे भाजप 400 चा आकडा पार करण्याचा दावा करत होतं, याउलट इंडिया आघाडी मोठ्या राज्यांमध्ये आपला प्रभाव पाडताना दिसलं. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Mumbai North West Lok Sabha Result : उत्तर पश्चिम मुंबईच्या निकालावर ठाकरे गटाचा आक्षेप; शिवसेना ठाकरे गट आज राष्ट्रपतींना पत्र लिहिणार

Mumbai North West Lok Sabha Constituency Result 2024: उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गट आक्षेप घेणार असल्याची माहिती मिळतेय. ठाकरे गटाच्या वतीने आज राष्ट्रपतींना पत्र लिहिण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत आक्षेप घेत राष्ट्रपतींकडे तक्रार करणार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर लढत झाली. निवडणूक आयोगाकडून सुरुवातीला अमोल कीर्तिकर विजयी असल्याची घोषणा झाली मात्र रिकाऊंटिंगमध्ये पुन्हा रवींद्र वायकर विजयी असल्याचं घोषित करण्यात आलं. राष्ट्रपतींना पत्र दिल्यानंतर उद्धव ठाकरे दुपारी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

PM Modi on Lok Sabha Elections 2024: सबका साथ, सबका विकास या मंत्राचा विजय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Modi on Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील जनता आणि भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी भावूक झाले. मोदींनी भाषणावेळी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सबका साथ, सबका विकास या मंत्राचा विजय आहे. 140 कोटी भारतीयांचा हा विजय आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

LS Election Results 2024: एनडीएनं गाठला बहुमताचा आकडा, एनडीएला 294 जागा; तर इंडिया आघाडीचा 232 जागांवर विजय

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: देशात एनडीएची बहुमताला गवसणी, 239 जागांवर कमळ. एनडीएला 294 जागा तर इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्या आहेत. सत्तेच्या सिंहासनावर एनडीए बसणार की  इंडिया? गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजपप्रणित एनडी सरकारला हादरे बसले आहेत. 

Maharashtra Election Results 2024 LIVE: महाराष्ट्रात मविआचा महायुतीला धोबीपछाड; महायुतीला 17 तर मविआला 30 जागा

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: महाराष्ट्रातला निकालही धक्कादायक लागला आहे. आतापर्यंत मतमोजणीतून आलेल्या निकालानुसार अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसताना दिसतोय. विशेष म्हणजे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला मोठा दणका बसलाय. महाराष्ट्रात मविआनं महायुतीला धोबीपछाड केलाय. महाराष्ट्रात मविआला 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर यश मिळालंय तर सांगलीत अपक्ष विशाल पाटलांचा विजय झालाय. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाच्या जनतेने मतदानातून सडेतोड उत्तर दिल्याचं बघायला मिळतंय. 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. यंदा राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी केलीय. 

Raigad Lok Sabha Election 2024: रायगड-सुनील तटकरे 82 हजार 784 च्या मताधिक्यानं विजय 

Raigad Lok Sabha Election 2024: रायगड-सुनील तटकरे 82 हजार 784 च्या मताधिक्यानं विजय 


सुनील तटकरे यांना पडलेली मते 5 लाख 8 हजार 352 


प्रतिस्पर्धी अंनत गीते यांना मिळाली 4 लाख 25 हजार 568.


वंचितसह  11 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त 


रायगड मध्ये नोटाला पडली 27,  हजार 270 मतं 

Maharashtra Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे : अजित पवार

Maharashtra Lok Sabha Election 2024: 4 जून - राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावे व राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केले जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ट्वीट करत व्यक्त केला आहे.


लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे अजितदादा पवार यांनी आभार मानले आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’ने बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचे अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे.


दरम्यान ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्याने परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनींना अजितदादा पवार यांनी धन्यवाद दिले आहेत


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांचे अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे. याशिवाय अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचेही अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे. 


देशात लवकरच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारे ‘एनडीए’चे सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, अशी खात्रीही अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.

Maharashtra Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे : अजित पवार

Maharashtra Lok Sabha Election 2024: 4 जून - राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावे व राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केले जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ट्वीट करत व्यक्त केला आहे.


लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे अजितदादा पवार यांनी आभार मानले आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’ने बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचे अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे.


दरम्यान ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्याने परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनींना अजितदादा पवार यांनी धन्यवाद दिले आहेत


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांचे अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे. याशिवाय अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचेही अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे. 


देशात लवकरच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारे ‘एनडीए’चे सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, अशी खात्रीही अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.

Bhiwandi Lok Sabha Election Result 2024 : भिवंडीत शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा 66 हजार 292 मतांनी विजयी

Bhiwandi Lok Sabha Election Result 2024 : शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा 66 हजार 292 मतांनी विजयी झाले आहेत... 

बाळ्यामामा एकूण मतं
4 लाख 98 हजार 199


कपिल पाटील एकूण मतं
4 लाख 31 हजार 907

निलेश सांबरे एकूण मतं
2 लाख 30 हजार 254

Mumbai Lok Sabha Election: उत्तर पश्चिममध्ये मोठा फेरबदल; फेर मतमोजणीमध्ये रवींद्र वायकर 75 मतांनी आघाडीवर 

Mumbai Lok Sabha Election: उत्तर पश्चिम मध्ये मोठा फेरबदल 


फेर मतमोजणीमध्ये रवींद्र वायकर आघाडीवर 


वायकर 75 मतांनी आघाडीवर 


अमोल कीर्तिकरांनी पुन्हा फेर मतमोजणीची करण्याची केली मागणी 


मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये कीर्तिकर आणि वायकर यांचे कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत असल्याची माहिती 

Lok Sabha Election Result: कुणाचा पराभव, कुणाची सरशी? मुख्यमंत्री शिंदेंच्या उमेदवारांचा निकाल काय?

Lok Sabha Election Result 2024 Updates  : मुंबई : लोकसभा निवडणुकांचा निकाल (Lok Sabha Election 2024) अवघा काही तासांवर आला आहे. अवघ्या देशाचं लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. देशाचा पंतप्रधान कोण? याचा फैसला उद्याच्या निकालानंतर होणार आहे. लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha Election 2024) 48 मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान झालं आहे. 20 मे रोजी मुंबईसह एकूण 13 मतदारसंघातील मतदानानंतर (Voting) राज्यातील निवडणुकांची सांगता झाली. यंदाची राज्याची लोकसभा निवडणूक फार वेगळी ठरली, ती महाराष्ट्रातील राजकीय भूकंपांमुळे. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) पडलेल्या अंतर्गत बंडाळीमुळे. शिवसेनेतील प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून थेट पक्षावर दावा ठोकला आणि भाजपच्या साथीनं राज्यात सत्ता स्थापन करुन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील यंदाची लोकसभा निवडणूक ही शिंदे विरुद्ध ठाकरे झाली, अशाच चर्चा राजकीय वर्तुळासोबतच सर्वसामान्यांमध्येही होत्या. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Lok sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील 10 हायव्होल्टेज मतदारसंघाचा निकाल काय लागला, कोणाचा विजय अन् कोणाचा पराभव?

Lok sabha Election Result 2024 LIVE: मुंबई: देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. राष्ट्रीय पातळीवर कोणाचीही सत्ता आली तरी अनेकांचे लक्ष हे महाराष्ट्रात (Maharashtra Lok Sabha Election 2024) नक्की काय घडणार, याकडे लागले आहे. गेल्या बराच काळापासून महाराष्ट्रातील राजकारण अस्थिर राहिले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बहाल केले असले तरी या पक्षांचा मूळ मतदार नक्की कोणाच्या पाठीशी आहे, याचा फैसला लोकसभा निकालाच्यानिमित्ताने (Election Result 2024) होणार आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Hatkanangle Lok Sabha Constituency: हातकणंगले धैर्यशील माने विजयी; 14 हजार मतांनी विजयी

Hatkanangle Lok Sabha Constituency: हातकणंगले मतदारसंघातून शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले असून 14 हजार मतांनी विजयी  झाले आहेत. 

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: प्रणिती शिंदेना पाठिंबा देणाऱ्या माजी आमदार नरसाय्या आडम यांचा जल्लोष

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: प्रणिती शिंदेना पाठिंबा देणाऱ्या माजी आमदार नरसाय्या आडम यांचा जल्लोष


लोकसभा निवडणुकीत माकप आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र, हे प्रणिती शिंदे यांचे पारंपरिक विरोधी होते. 

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळेंच्या विजयाची खात्री होताच इंदापुरातील सुनेत्रा पवार यांचे बॅनर उतरवले
Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर शहरात काही अति उत्साही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाच्या ही कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळे यांचा देखील बॅनर विजयी झालेल्या शुभेच्छा पर बॅनर लावण्यात आले होते. यातील सुनेत्रा पवार यांचे बॅनर उतरवण्यात आले. सुप्रिया सुळे यांच्या विजयाची खात्री होताच अखेर इंदापुरातील अति उत्साही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावले होते ते उतरवण्यात आले आहेत.
Bhandara Lok Sabha Election 2024: भंडाऱ्यात महाविकास आघाडीचा डंका

Bhandara Lok Sabha Election 2024: भंडारा : भंडाऱ्यात महाविकास आघाडीचा डंका पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे 4 लाख 55 हजार 846 मतांनी आघाडी घेतली आहे. 



  • सुनील मेंढे (महायुती) : 428225 मतं

  • डॉ. प्रशांत पडोळे (महाविकास आघाडी) : 455846 मतं


Wardha Lok Sabha Result 2024 Live : वर्ध्यात अमर काळे ठरले जाएंट किलर; रामदास तडस यांना पराभवाचा धक्का

Wardha Lok Sabha Result 2024 Live : वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अमरावती आणि वर्धा (Wardha) जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार अमर काळे (Amar Kale), भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) अशी सरळ लढत या मतदारसंघात राहिली आहे. या लढतीत मिळालेल्या निकालानुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे उमेदवार यांचा विजय झाला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

South Mumbai Lok Sabha Result 2024 : मुंबादेवीचा आशीर्वाद ठाकरेंनाच; दक्षिण मुंबईचा गड अरविंद सावंतांनी राखला; यामिनी जाधवांचा दारुण पराभव!

Mumbai South Lok Sabha Election Result 2024 : मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीची गणितं ज्या मतदारसंघावर अवलंबून आहेत, ज्या मतदारसंघावर अवलंबून आहे, तो दक्षिण मुंबई मतदारसंघ ठाकरेंना स्वतःकडे राखण्यात यश मिळालं आहे. दक्षिण मुंबईतून ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंत (Arvind Sawant) विजयी झाले आहेत. विद्यमान आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांचा सावंतांनी दारुण पराभव केला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: भाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीस जबाबदार : अनिल देशमुख

Lok Sabha Election 2024 LIVE: वर्ध्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे हे आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत, तब्बल 80 हजाराची लीड असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. वर्ध्यात शरद पवार यांच्यासाठी विदर्भातील ही एकमेव जागा प्रतिष्ठेची होती, येथे शरद पवार गटाचा विजय निश्चित झालाय, प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातून काँग्रेस संपल्याचा दावा केला आणि हा दावाच त्यांच्यावर उलटला आहे. भारतीय जनता पार्टीच्या पराभवात सर्वात जास्त कुणाचा हात असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे.

Amravati Lok Sabha Result 2024 LIVE: अमरावती लोकसभा मतदार संघातून बळवंत वानखडे विजयी, नवनीत राणांचा दारुण पराभव

Amravati Lok Sabha Result 2024: अमरावती लोकसभा मतदार संघातून बळवंत वानखडे विजयी, नवनीत राणांचा दारुण पराभव

अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जवळपास पूर्ण, केवळ औपचारिक घोषणा बाकी

निकाल घोषित केल्यानंतर नवनीत राणा यांचे कार्यकर्ते पुर्न मतदान मोजणीची मागणी करण्याची शक्यता

Akola Lok Sabha Election 2024: अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे विजयी

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे विजयी. काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांचा केला पराभव. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा केला पराभव. चाळीशीतील  अनुप धोत्रे ठरलेत जायंट किलर.पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा केला दारूण पराभव. वडील संजय धोत्रे याआधी सलग चारदा होते अकोल्याचे खासदार. संजय धोत्रे आजारी असल्याने अनुप धोत्रेंना भाजपनं उतरवलं मैदानात.

Shirur Lok Sabha Result 2024 : शिरुर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजली, अमोल कोल्हेंनी अजितदादा गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना पराभवाची धूळ चारली

Shirur Lok Sabha Result 2024 : शिरुर: राज्यातील हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी अजितदादा गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली होती. एकदाही शिवाजीराव आढळराव पाटील यांना एकाही फेरीत आघाडी घेता आली नाहीत. अखेर अमोल कोल्हे यांनी तब्बल 70 हजारांच्या मताधिक्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी 

Mumbai Lok Sabha Elections 2024 Results: दक्षिण मध्य मुंबईची मत मोजणी प्रक्रिया पूर्ण, अनिल देसाईंची 53 हजार 384 मतांनी विजयी आघाडी

Mumbai Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण मध्य मुंबईची मत मोजणी प्रक्रिया पूर्ण


निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अनिल यशवंत देसाई उमेदवार हे 53 हजार 384 मतांनी निवडणून आले आहेत


अनिल देसाई यांच्या समोर शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे उमेदवार होते


ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई हे 53,384 मतांनी विजयी झाले

Baramati Lok Sabha: शरद पवारांनी स्वाभिमानाची तुतारी फुंकली, बारामतीत सु्प्रिया सुळेंचा दणदणीत विजय

Baramati Lok Sabha Election Result 2024 :  महाराष्ट्रातील सर्वात  प्रतिष्ठेची लढाई  ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली आहे. कारण गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेल्या  पवार कुटुंबातील दोन व्यक्ती निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरल्या आहेत.  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad pawar, NCP)पक्षाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर अजित पवार (Ajit PAwar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)मैदानात उतरल्या आहेत. नणंद-भावजयच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेय. बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार साहेबांसोबत इमोशनली कनेक्टेड आहे तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे . प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता.   सुप्रिया सुळेंनी  16 व्या फेरी अखेर मोठी मुंसडी मारली आहे. सुप्रिया सुळेंना 1 लाख आठ हजार 490 चा लीड मिळाला आहे.


Mumbai Lok Sabha Election 2024: ठाकरेंच्या पारड्यात आणखी एक विजय; अमोल कीर्तिकर 2 हजार मतांनी विजयी

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: ठाकरेंच्या आणखी एका शिलेदारानं विजयी पताका फडकावली आहे. शिंदेंच्या रवींद्र वायकरांचा 2 हजार मतांनी पराभव करून अमोल कीर्तिकरांनी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. तब्बल 2 हजार मतांनी अमोल कीर्तिकरांचा विजय झाला आहे. 

Dindori Lok Sabha Election Result 2024 : केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांची जागा धोक्यात, भास्कर भगरे ठरणार जायंट किलर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 18 व्या फेरीनंतरही भास्कर भगरे यांची आघाडी कायम आहे. भास्कर भगरे यांना 4 लाख 47 हजार 813 मते मिळाली आहे. तर भारती पवार यांना 3 लाख 75 हजार 557 मते मिळाली आहे. भास्कर भगरे 77 हजार 256 मतांनी आघाडीवर आहेत.  

Sangli Lok Sabha Result: सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: लोकसभा निवडणुकांच्या घोषणेपासूनच सांगली मतदारसंघ चर्चेत होता. सांगलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस रंगली होती. ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांची घोषणा करण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीत वितुष्ठ आलं होतं. त्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटलांनी सांगली लोकसभा निवडणुकीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सांगलीतून विशाल पाटलांनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला आहे. 


सांगली लोकसभा निवडणुकीत एकोणविसाव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 85 हजार 502 अधिकृत मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. 


 


 

Baramati Lok Sabha Result: बारामतीत थोरल्या पवारांचीच 'पॉवर'; सुप्रिया सुळे 66 हजार 466 मतांनी आघाडीवर

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: तेराव्या फेरीअखेर सुप्रिया सुळे 66 हजार 466 मतांनी आघाडीवर असून सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुकीची तयारी सुरू केली आहे. 


 

Lok Sabha Election Result 2024: मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे संजय दीना पाटील आघाडीवर

Mumbai Lok Sabha Election 2024: मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात तेराव्या फेरीनंतर संजय दिना पाटील 20 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे मिहीर कोटेचा पिछाडीवर आहेत. 



  • संजय दिना पाटील : 3 लाख 2 हजार 703

  • मिहीर कोटेचा : 2 लाख 82 हजार 833


संजय दिना पाटील 20 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर

Mumbai South Central Lok Sabha Result 2024: दक्षिण मध्य मुंबईत उद्धव ठाकरेंचा भगवा, अनिल देसाई यांचा विजय, राहुल शेवाळे यांचा पराभव

Mumbai South Central Lok Sabha Result 2024: मुंबई : दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे (Mumbai South Central Lok Sabha Election Result 2024 LIVE) सकाळी 11 वाजेपर्यंतचे कल हाती आले असून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी सध्या मोठी आघाडी घेत विजय मिळवला आहे. तर, शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा दारुण पराभव झाला आहे. ठाकरेंचा मुंबईतील हा पहिला विजय आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Palghar Lok Sabha Result 2024 : पालघरमध्ये ठाकरेंच्या उमेदवार भारती कामडी यांचा मोठा पराभव, भाजपचे डॉ. हेमंत सावरा विजयी!

Palghar : शहरी आणि आदिवासी भागाचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ ( Palghar Lok Sabha Constituency) हा आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे. पालघर लोकसभेत बहुरंगी लढत असली तरी महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या तीन प्रमुख पक्षांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळाली. पालघर लोकसभेसाठी मतदान पार पडलं असून 63.91% मतदान झालं आहे. पालघरमध्ये भाजपचे डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत. या लोकसभेसाठी दहा उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडी महायुती आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली. महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सावरा, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. पालघर लोकसभा मतदारसंघाचे सकाळी 11 वाजेपर्यंतचे कल हाती आले असून भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. डॉ. हेमंत सावरा हे 47,634 मतांनी आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर उठाबाच्या भारती कामडी आहेत.  हा कल सकाळी 11 वाजेपर्यंतचा असून अजून अंतिम निकाल हाती येण्यास काही वेळ लागेल.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई विजयी

Mumbai Maharashtra Lok Sabha Election Results 2024:  दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे.

Palghar Lok Sabha Result 2024 : पालघरमध्ये भाजपचे डॉ. हेमंत सावरा विजयी; भारती कामडी यांचा पराभव

Palghar : शहरी आणि आदिवासी भागाचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ ( Palghar Lok Sabha Constituency) हा आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Nandurbar Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्राचा पहिला निकाल हाती, काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी

Nandurbar Lok Sabha Election Result 2024 :  नंदुरबार जिल्हा (Nandurbar Lok Sabha) पहिल्यापासून काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  यंदा हा गड काँग्रेसने राखला असून काँग्रेस के. सी. पाडवी (K C Padvi) यांचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी (Goval Padvi)  यांचा विजय झाला आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

LS Election Results 2024 LIVE: बारामतीत दहाव्या फेरीपर्यंत सुप्रिया सुळे 48 हजार 365 मतांनी आघाडीवर

Baramati Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: बारामतीत दहाव्या फेरीपर्यंत सुप्रिया सुळे 48 हजार 365 मतांनी आघाडीवर आहेत. 

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: दहाव्या फेरी अखेरीस मुरलिधर मोहोळ यांना 60,431 मतांचं लीड

Pune Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: पुणे : दहाव्या फेरी अखेरीस मुरलिधर मोहोळ यांना 60,431 मतांचं लीड

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: चंद्रपुरात काँग्रेसची जोरदार मुसंडी; प्रतिभा धानोरकर 1लाख 6112 हजार मतांनी आघाडीवर

Chandrapur Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: चंद्रपूर : चंद्रपुरात काँग्रेसची जोरदार मुसंडी. दहाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 1लाख 6112 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत. 

Lok Sabha Elections: नागपुरात नितीन गडकरींची आघाडी कायम; 40 हजार 924 मतांचा लीड

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: नागपूर लोकसभा मतदार संघात पहिल्या फेरीपासून नितीन गडकरींनी आघाडी कायम ठेवली आहे. 40 हजार 924 मतांनी नितीन गडकरी आघाडीवर आहेत. तर विकास ठाकरे पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 2 लाख 13 हजार 386 मतांनी विजय मिळवला आहे. 


40 हजार 924 मतांनी नितीन गडकरी आघाडीवर



  • नितीन गडकरी  2,54,310 मतं

  • विकास ठाकरे  2,13,386 मतं 

Mumbai Maharashtra Lok Sabha Result: उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरेंची मशाल; अमोल कीर्तिकर 10 हजार 788 मतांनी आघाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: अमोल कीर्तिकर 10 हजार 788 मतांनी आघाडीवर आले आहेत. वायव्य मुंबईत रविंद्र वायकर पिछाडीवर आहेत. 

South Mumbai Maharashtra Election Results 2024 Live: दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांची मोठी आघाडी; 60 हजार 756 मतांनी यामिनी जाधव पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 Live: दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांनी मोठी आघाडी घेतली आहे. तब्बल 60 हजार 756 मतांनी यामिनी जाधव पिछाडीवर गेल्या आहेत.  

Mumbai Maharashtra Lok Sabha Result: उत्तर पश्चिम मतदारसंघात चुरस कायम; अमोल कीर्तिकर 3 हजार 500 मतांनी आघाडीवर

Mumbai Maharashtra Lok Sabha Election Results 2024: उत्तर पश्चिम मतदारसंघात चुरस कायम आहे. अमोल कीर्तिकर यांनी 3 हजार 500 मतांनी आघाडी घेतली आहे. 



  • अमोल कीर्तिकर - 2,44,594 मतं 

  • रवींद्र वायकर - 2, 40, 630 मतं 

Mumbai Maharashtra Lok Sabha Election Results 2024: दक्षिण मध्य मुंबईत सतराव्या फेरीअखेर अनिल देसाईंची मोठी मुसंडी; 49 हजार 252 मतांचा लीड

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: दक्षिण मध्य मुंबईत सतराव्या फेरीअखेर अनिल देसाईंची मोठी मुसंडी. अनिल देसाई 49 हजार 252 मतांनी अनिल देसाई आघाडीवर आले आहेत. 



  • अनिल देसाई 361582

  • राहुल शेवाळे 312330


49 हजार 252 मतांनी अनिल देसाई आघाडीवर आहेत. 

Sindhudurg Lok Sabha Election 2024: सिंधुदुर्गात नारायण राणे आघाडीवर, कार्यकर्त्यांकडून जल्लोष

Ratnagiri - Sindhudurg Lok Sabha Election 2024: सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नारायण राणे आघाडीवर आहेत. सविस्तर निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... 


Ratnagiri - Sindhudurg Lok Sabha Election 2024

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: सोलापुरात काँटे की टक्कर, प्रणिती शिंदे 8 हजार 302 मतांनी आघाडीवर 

Solapur Lok Sabha Election 2024: सोलापुरात काँटे की टक्कर, प्रणिती शिंदे 8 हजार 302 मतांनी आघाडीवर 


नवव्या फेरीतही प्रणिती शिंदेची जोरदार मुसंडी 


नवव्या फेरीनंतर प्रणिती शिंदेना 8 हजार 302 मतांची आघाडी

Dhule Lok Sabha Election Result 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. शोभा बच्छाव आघाडीवर

Dhule Lok Sabha Election Result 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. शोभा बच्छाव आघाडीवर


- धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये 11 व्या फेरीमध्ये काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांची मुसंडी 


- भाजपाचा 12 हजार मतांचा लीड तोडत 12 हजार मतांनी घेतली आघाडी..


- अटीतटीच्या लढाईमध्ये भाजपची धाकधूक वाढली.

Raver Lok Sabha Election Result 2024 : रावेरमध्ये आठव्या फेरी अखेर रक्षा खडसे आघाडीवर

Raver Lok Sabha Election Result 2024 : रावेरमध्ये आठव्या फेरी अखेर रक्षा खडसे आघाडीवर



रक्षा खडसे 2 लाख 94 हजार 035 


श्रीराम पाटील 1, लाख 73 हजार 906

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: अमरावतीत काँटे की टक्कर; नवनीत राणा आघाडीवर, फरक मात्र केवळ 10 हजार 344 मतांचा

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: अमरावतीत काँटे की टक्कर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नवनीत राणा 10 हजार 344 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत 1 लाख 57 हजार 118 मंत मिळाली आहेत. तर बळवंत वानखडेंना 1 लाख 46 हजार 774 मतं मिळाली आहेत. 


नवनीत राणा - 157118
बळवंत वानखडे - 146774


आघाडी - नवनीत राणा 10344 मतांनी आघाडीवर

Amaravati Lok Sabha Election Result : अमरावतीत नवनीत राणा आघाडीवर

नवनीत राणा - 157118
बळवंत वानखडे - 146774


आघाडी - नवनीत राणा 10344 मतांनी आघाडीवर

Kolhapur Lok Sabha Result : कोल्हापुरात शाहू महाराज आघाडीवर, आठव्या फेरी अखेर 54 हजारांचं मताधिक्य

Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराजांना आठव्या फेरी अखेर 54 हजारांचे मताधिक्य


हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सत्यजित आबा पाटील यांना 3683 मतांची आघाडी 

Palghar Lok Sabha Result: पालघरमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांची निर्णायक आघाडी; 81 हजार 234 मतांनी पुढे

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: पालघर लोकसभा : पालघरमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांना 81 हजार 234 अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. 



  • हेमंत सावरा  (भाजप)   289695

  • भारती कामडी(उबाठा)   208461

  • राजेश पाटील (बविआ)   122738


 महायुती भाजपचे डॉ. हेमंत सावरा 81243  मतांनी आघाडीवर असून महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा गटाच्या भारती कामडी पिछाडीवर आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Lok Sabha Elections: जालना लोकसभेत काट्याची लढत; सातव्या फेरी दरम्यान काँग्रेसचे कल्याण काळे आघाडीवर

Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: जालना लोकसभेत काट्याची लढत; सातव्या फेरी दरम्यान काँग्रेसचे कल्याण काळे आघाडीवर, दानवे पिछाडीवर



  • डॉ. कल्याण काळे-129137

  • रावसाहेब दानवे: 127242


 डॉ. कल्याण काळे 1895 मतांनी आघाडीवर

Lok Sabha Elections 2024 Results: वायव्य मुंबईत वायकर कीर्तिकरांमध्ये चुरस; 3499 मतांनी रवींद्र वायकर आघाडीवर

Mumbai Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी  अशी चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच वायव्य मुंबईत मात्र, महायुतीनं आघाडी घेतली आहे. शिंदेंचे रवींद्र वायकर आघाडीवर असून त्यांना 1 लाख 79 हजार 710 मतं मिळाली आहेत. तर, अमोल कीर्तिकर यांना 1 लाख 76 हजार 211 मतं मिळाली आहेत. तब्बल 3499 मतांनी रवींद्र वायकर आघाडीवर आहेत. 

Bhandara Gondia : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रशांत पडोळे आघाडीवर

मतदारसंघ – भंडारा - गोंदिया
------------------------------------------
उमेदवार (महायुती) सुनील मेंढे : 148303
उमेदवार (महाविकास आघाडी) – डॉ प्रशांत पडोळे : 149768


प्रशांत पडोळे 1465 मतांनी आघाडीवर  आहेत. 

Raigad Lok Sabha Election: सुनील तटकरे अकराव्या फेरीनंतर आघाडीवर, 38 हजार 700 मतांनी पुढे

Raigad  Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: रायगड : सुनील तटकरे अकराव्या फेरीनंतर आघाडीवर राहिले आहेत. या फेरीत ते एकूण 38 हजार 700 मतांनी आघाडीवर राहिलेत त्यामुळें रायगड मध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे. 

Lok Sabha Election 2024 LIVE : पंकजा मुंडे 9 हजार मतांनी आघाडीवर; परळीत पंकजा मुंडेंच्या घरासमोर जल्लोष

Beed Lok Sabha Election 2024 : बीड : पंकजा मुंडेंनी एकाच फेरीमध्ये 9000 मतांनी आघाडी घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या घोषणा ऐकत प्रीतम मुंडे यांनी देखील या कार्यकर्त्यांना साद दिली आहे. 

Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: मुंबई उत्तर मतदारसंघातून पियूष गोयल यांची मोठी आघाडी; 94432 मतांनी आघाडीवर

Mumbai  Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: मुंबई उत्तर मुंबईत भाजपनं मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पियूष गोयल 94432 मतांनी आघाडीवर आहे. 



  • पियूष गोयल - 186226 मतं 

  • भूषण पाटील - 91794 मतं


पियूष गोयल 94432 मतांनी आघाडीवर

Lok Sabha Elections 2024 Results: दक्षिण मुंबईत अनिल देसाई आघाडीवर, नवव्या फेरीनंतर 21 हजार 503 मतांनी आघाडीवर

Mumbai Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: मुंबई : नवव्या फेरीनंतर अनिल देसाई 21 हजार 503 मतांनी आघाडीवर आहेत. 



  • अनिल देसाई  1 लाख 90 हजार 05 मतं 

  • राहुल शेवाळे 1लाख 68 हजार 502 मतं 


 

यवतमाळ वाशिममध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख 10 व्या फेरीनंतर आघाडीवर

उमेदवार – संजय देशमुख- 2,18,466


उमेदवार – राजश्री पाटील-1,80,572


मतांची आघाडी – संजय देशमुख -37 हजार 894 लीड

Maharashtra Election Results 2024 Live: शिर्डीत सातव्या फेरीअखेर उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: शिर्डी : सातव्या फेरीअखेर उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर असून त्यांनी 1 लाख 37 हजार 389 मतं घेतली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना एकूण 1 लाख 22 हजार 510 मतं मिळाले आहेत. सातव्या फेरीअखेर UBT चे भाऊसाहेब वाकचौरे 14879 मतांनी आघाडी घेतली आहे. 

Bhandara Lok Sabha Election Result : भंडारा गोंदियात भाजपचे सुनील मेंढे आघाडीवर

मतदारसंघ – भंडारा - गोंदिया
------------------------------------------
उमेदवार (महायुती) सुनील मेंढे : 114462
उमेदवार (महाविकास आघाडी) – डॉ प्रशांत पडोळे : 108278

LS Election Results 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आघाडीवर, 25 हजार 365 मतांनी सुनेत्रा पवार मागे

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. 



  • सुप्रिया सुळे : 32441 मतं 

  • सुनेत्रा पवार : 33170 मतं 


बारामतीतून सातव्या फेरी अखेर सुप्रिया सुळे 25 हजार 365 मतांनी आघाडीवर 

Dharshiv Lok Sabha Election Result 2024 : ओमराजे निंबाळकर आघाडीवर अर्चना पाटील पिछाडीवर

Dharshiv Lok Sabha Election Result : सातव्या फेरीअखेर ओमराजे निंबाळकर आघाडीवर


 सातव्या फेरीअखेर निंबाळकर यांना 88 हजार 504 मतांची आघाडी.

Pune Shirur Lok Sabha Result: शिरुरमध्ये शरद पवारांचीच हवा; डॉ. अमोल कोल्हे 60 हजार मतांनी पुढे

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या निरगुडसर या गावात आघाडी मिळाली. आपल्या गावात प्रतिस्पर्धी उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने मंत्री वळसे पाटील यांना हा मोठा धक्का समजला जातो.


बाराव्या फेरीअखेर डॉ. कोल्हे अंदाजे 60 हजार मतांनी पुढे 

Maval Lok Sabha Result 2024 LIVE: मावल लोकसभेत सातव्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे 44,689 मतांनी आघाडीवर

Maval Lok Sabha Result 2024 LIVE: मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे 44,689 मतांनी आघाडीवर आहेत.



  • श्रीरंग बारणे (महायुती) - 220016

  • संजोग वाघेरे (महाविकास आघाडी) - 175327

    महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 44,689 मतांनी आघाडीवर

Chandrapur Lok Sabha Seat : चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर 63 हजारांनी आघाडीवर

चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 63101 हजार मतांनी आघाडीवर आहेत. सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर पडले आहेत. 

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: शिरुर लोकसभा मतदारसंघातील लेटेस्ट अपडेट्स, अमोल कोल्हेंची 33 हजार मतांची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: शिरुर: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता. गेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे हे आढळराव पाटलांचा (Shivajirao Adhalrao patil) पराभव करत जायंट किलर ठरले होते. यंदाही त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती करता येणार का, हे बघावे लागेल. तर दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील हे गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी इर्ष्येने मैदानात उतरले होते. त्यांच्यामागे महायुतीची अजस्त्र ताकद असल्यामुळे यंदा आढळराव पाटील कोल्हेंना अस्मान दाखवून शिरुर लोकसभेवर पु्न्हा कब्जा करणार का, हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Mumbai Lok Sabha Election 2024 : दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंची मोठी आघाडी; 25 हजार 751 मतांनी आघाडीवर

Mumbai Lok Sabha Election 2024 : मुंबई : दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत ठाकरेंच्या उमेदवारांनी मोठी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिण मध्य मुंबईत अरविंद सावंतांनी आघाडी घेतली आहे. अरविंद सावंत 25 हजार 272 मतांनी आघाडीवर आहेत. तर, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई 21 हजार 210 मतांनी आघाडीवर आहेत. 


दक्षिण मध्य मुंबई


 अनिल देसाई 25 हजार 751 मतांनी आघाडीवर



  • अनिल देसाई 1 लाख 27 हजार 172

  • राहुल शेवाळे 1 लाख 5 हजार 962


दक्षिण मुंबई


अरविंद सावंत 29 हजार 906 मतांनी आघाडीवर



  • अरविंद सावंत 87 हजार 598

  • यामिनी जाधव 57 हजार 692

  • नोटा 2323 

Satara Lok Sabha Election Result: साताऱ्यात शरद पवारांचा दबदबा, शशिकांत शिंदेंची 27000 मतांची आघाडी; उदयनराजे भोसले पिछाडीवर

Satara Lok Sabha Election Result: सातारा: राज्यातील लक्षवेधी लोकसभा लढतींमध्ये समावेश असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha Election)  सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde)   यांनी मोठी आघाडी घेतली आहेत. तर भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle)   मात्र  या रेसमध्ये दिसेनासे झाले आहेत. (Lok Sabha Election Result Counting) 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Shirur: शिरुरच्या लढतीत पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे 9 हजार मतांनी आघाडीवर, तर शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: शिरुर: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता. गेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे हे आढळराव पाटलांचा (Shivajirao Adhalrao patil) पराभव केला होता. यंदाही ते यशाची पुनरावृत्ती करणार असल्याचे चित्र पहिल्याफेरी अखेर दिसत आहे.  हे चित्र सकाळी 9 पर्यंतचे आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Shirur lok Sabha Election Result LIVE: शिरुरमध्ये अमोल कोल्हे आघाडी टिकवून, आंबेगावात कार्यकर्त्यांचा जल्लोष

Shirur lok Sabha Election Result LIVE: शिरूर :  शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदारसंघात मोठं मताधिक्य मिळत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीनं आंबेगाव, शिरूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून मोठा जल्लोष पुणे नगर महामार्गावर केला आहे. 

Ramtek Lok Sabha Election Result: तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 16200 मतांनी आघाडीवर

Ramtek Lok Sabha Election Result: तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 16200 मतांनी आघाडीवर असून शिवसेनेचे राजू पारवे पिछाडीवर आहेत. 


भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात एनडीए आघाडी पिछाडीवर 

Lok Sabha Election Result: दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंची मोठी आघाडी; पाचव्या फेरी अखेर 12248 मतांची आघाडी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 LIVE: दक्षिण मध्य मुंबई पाचव्या फेरी नंतर


अनिल देसाई 12248 मतांनी आघाडीवर



  • अनिल देसाई - 89033 मतं 

  • राहुल शेवाळे - 76785 मतं 

Lok Sabha Elections Results 2024 Live: बारामती आज दुपारी बारापासून, उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत सुप्रिया सुळेंच्या विजयाच्या जल्लोषाचं कार्यकर्त्यांकडून आयोजन

Lok Sabha Elections Results 2024 Live: बारामतीत आज दुपारी बारा वाजल्यापासून, उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जाणार आहे. या दरम्यान फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण, ढोल ताशांचा गजर केला जाणार आहे. 

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: चंद्रपुरात चौथ्या फेरीनंतर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 32468 हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 LIVE: चंद्रपुरात चौथ्या फेरीनंतर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 32 हजार 468 मतांनी आघाडीवर असून सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत. 

Lok Sabha Elections 2024 Results Live Updates: सांगलीत सहाव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: सांगली सहाव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 30 हजार 659 मतांनी आघाडीवर आहेत. 

Shirur lok Sabha Election Result : शिरुरमध्ये पाचव्या फेरी अखेर अमोल कोल्हे आघाडीवर, 25088 मतांची आघाडी

Shirur lok Sabha Election Result LIVE: शिरुर, पुणे : पाचव्या फेरी अखेर शिरुरमधून अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. 


अमोल कोल्हेंची आघाडी कायम 



  • अमोल कोल्हे 25088  मतांनी आघाडीवर 

  • शिवाजी आढळरावपाटील पिछाडीवर

Maval Lok Sabha Election 2024: मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे 20,686 मतांनी आघाडीवर

Maval Lok Sabha Election 2024: मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 20,686 मतांनी आघाडीवर आहेत. 

चौथी फेरी : 

श्रीरंग बारणे (महायुती) - 123711 मतं 

संजोग वाघेरे (महाविकास आघाडी) - 103025 मतं

महावियुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 20,686 मतांनी आघाडीवर

Lok Sabha Elections Results 2024 Live: अकोल्यात काँग्रेस आणि भाजपात काट्याची टक्कर

Lok Sabha Elections Results 2024 Live Updates: अकोल्यात काँग्रेस आणि भाजपात काट्याची टक्कर. काँग्रेसचे डॉ. अभय पाटील 3369 मतांनी आघाडीवर. भाजपचे अनुप धोत्रे दुसर्या क्रमांकावर. वंचितच्या प्रकाश आंबेडकर मोठ्या पिछाडीसह तिसऱ्या क्रमांकावर. 


पाटील : 67721
धोत्रे : 64352
आंबेडकर : 48781

Lok Sabha Elections 2024 Result: कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची धीम्या गतीनं, मतमोजणी मशीन बंद पडल्यात

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अतिशय धिम्या गतीनं सुरू आहे. काही ठिकाणी मतमोजणी मशीन बंद पडल्यात. 

Mumbai Lok Sabha Election Results 2024: दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाईंची मोठी मुसंडी; राहुल शेवाळे 6 हजार 547 मतांनी पिछाडीवर

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाईंनी मोठी मुसंडी मारली आहे. सुरुवातीपासून आघाडी टिकवून असलेले राहुल शेवाळे सध्या पिछाडीवर गेले आहेत. चौथ्या फेरीनंतर अनिल देसाई तब्बल 6 हजार 547 मतांनी आघाडीवर आहेत. 

Baramati Lok Sabha Result 2024: बारामतीतून सुप्रिया सुळेंची जोरदार मुसंडी, 19 हजार मतांची आघाडी

Baramati Lok Sabha Result 2024: बारामतीतून सुप्रिया सुळे चौथ्या फेरी अखेर तब्बल 19 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर, सुनेत्रा पवार पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Wardha Lok Sabha Election Result : वर्ध्यात अमर काळे 5 हजार मतांनी आघाडीवर

वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँघ्रेस पार्टीचे अमर काळे आघाडीवर आहेत. 

Nandurbar Lok Sabha Result : नंदुरबारमध्ये पाचव्या फेरी अखेर 80 हजार मतांनी आघाडीवर

नंदुरबार : पाचव्या फेरी अखेर लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार 80000 हजार मतांनी आघाडीवर

Mumbai Lok Sabha Result : दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई 3 हजार 149 मतांनी आघाडीवर

Mumbai Lok Sabha Result 2024 : दक्षिण मध्य मुंबईत सुरुवातीपासून आघाडीवर असलेले राहुल शेवाळे आता पिछाडीवर गेले आहेत. अनिल देसाईंनी मुसंडी मारली असून अनिल देसाई तब्बल 3 हजार 149 मतांनी आघाडीवर आहेत. 

Mumbai Lok Sabha Result : दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई 3 हजार 149 मतांनी आघाडीवर

Mumbai Lok Sabha Result 2024 : दक्षिण मध्य मुंबईत सुरुवातीपासून आघाडीवर असलेले राहुल शेवाळे आता पिछाडीवर गेले आहेत. अनिल देसाईंनी मुसंडी मारली असून अनिल देसाई तब्बल 3 हजार 149 मतांनी आघाडीवर आहेत. 

Mumbai Lok Sabha: मुंबईत अटीतटीचा सामना; आतापर्यंतच्या कलांनुसार मुंबईतील परिस्थिती काय? 

Mumbai Lok Sabha Election Result 2024: मुंबईत अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार मुंबईतील परिस्थिती काय? 


उत्तर मध्य मुंबई -
उज्ज्वल निकम (भाजप) - 59352
वर्षा गायकवाड (काँग्रेस) - 47423


निकम 11929  मतांनी आघाडीवर


ईशान्य लोकसभा मतदारसंघ 


एकूण मिळालेली मतं


नंदेश उपम -  390 मतं 
मिहीर कोटेचा - 19158 मतं 
संजय दिना पाटील - 24082 मतं 


संजय दिना  12288 मतांनी आघाडीवर


उत्तर मुंबई मतदारसंघ 


पियुष गोयल (भाजप) - 53959
 गोयल  27867 मतांची आघाडी
भूषण पाटील (काँग्रेस) - 26102


मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ 


रवींद्र वायकरांना 5115 मतांची आघाडी


वायकर 33966 मत 


अमोल किर्तीकर 18811 मतं


उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ 


उज्ज्वल निकम (भाजप) - 69375
वर्षा गायकवाड (काँग्रेस) - 53882


निकम  15493 मतांनी आघाडीवर


उत्तर पश्चिम मुंबई


रविंद्र वायकर - 38192
अमोल किर्तीकर - 31691
वायकर 6501 मतांनी आघाडीवर


 

Raigad Lok Sabha Election Result: रायगड- पाचव्या फेरीत सुनील तटकरे 13600 ने आघाडीवर

Raigad Lok Sabha Election Result:  रायगड- पाचव्या फेरीत सुनील तटकरे यांनी 13600 आघाडी घेतली आहे. 

Mumbai Lok Sabha Election Results 2024: दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंची आघाडी, राहुल शेवाळे पिछाडीवर

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 : मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ फेरीनिहाय मिळालेली मते


फेरी - 2


1. अनिल यशवंत देसाई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 40739
2. राहुल रमेश शेवाळे – शिवसेना 39166
3. विद्यासागर भिमराव विद्यागर – बहुजन समाज पार्टी 1165
4. अबुल हसन अली हसन खान – वंचित बहुजन आघाडी 2377
5. डॉ.अर्जुन महादेव मुरूडकर - भारतीय जवान किसान पार्टी 133
6. ईश्वर विलास ताथवडे - राष्ट्रीय महास्वराज भूमि पार्टी 104
7. करम हुसैन किताबुल्लाह खान - पीस पार्टी 168
8. जाहीद अली नासिर अहमद शेख - आजाद समाज पार्टी (कांशी राम) 97
9. दिपक एम. चौगुले - बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी 137
10. महेंद्र तुळशीराम भिंगारदिवे - राईट टु रिकॉल पार्टी 190
11. सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी - सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया 93
12. अश्विनी कुमार पाठक - अपक्ष 170
13. आकाश लक्ष्मण खरटमल – अपक्ष 187
14. विवेक यशवंत पाटील – अपक्ष 73
15. संतोष पुंजीराम सांजकर -  अपक्ष 183
16. नोटा -1456

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: अनिल देसाई आघाडीवर, राहुल शेवाळे पिछाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ फेरीनिहाय मतं मिळाली आहेत. 



  • अनिल यशवंत देसाई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 40739

  • राहुल रमेश शेवाळे : शिवसेना 39166

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: मुंबईत मोठी बातमी! सुरुवातीच्या कलांपासून आघाडीवर असलेले राहुल शेवाळे पिछाडीवर, अनिल देसाई आघाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. दक्षिण मध्य मुंबईत सुरुवातीपासून आघाडीवर असलेले राहुल शेवाळेंना अनिल देसाईंनी अखेर मागे टाकलं असून 100 मतांनी राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत. 

LS Election Results 2024: मुंबईत अटीतटीचा सामना, सध्याची परिस्थिती काय?

Lok Sabha Elections Results 2024 Live: मुंबईतील सहा मतदारसंघांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये अटीतटीचा सामना दिसून येत आहे. अरविंद सावंत सध्या दक्षिण मुंबईतून आघाडीवर आहेत. तर दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई पिछाडीवर असून राहुल शेवाळे आघाडीवर आहेत. 


राहुल शेवाळे 478 मतांनी आघाडीवर


राहुल शेवाळे  43 हजार 121


अनिल देसाई 42 हजार 643


उत्तर मुंबई मतदारसंघात पियुष गोयल 13129 मतांनी आघाडीवर 


पियुष गोयल - 28356


भूषण पाटील - 15227


पियुष गोयल 13129 मतांनी आघाडी


अरविंद सावंत 2822 मतांनी आघाडीवर


अरविंद सावंत 20 हजार 58


यामिनी जाधव 17 हजार 237


ईशान्य मुंबई मतदारसंघात संजय दिना 16189 मतांनी आघाडीवर


संजय दिना पाटील - 42462
मिहीर कोटेचा - 26273


पियुष गोयल (भाजप) - 28356
13129 मतांची आघाडी
भूषण पाटील (काँग्रेस) - 15227


 

LS Election Results 2024: रायबरेलीतून राहुल गांधी 8993 मतांनी आघाडीवर, तर वाराणसीतून मोदी 6 हजार मतांनी मागे

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: रायबरेलीतून राहुल गांधी  8993 मतांनी आघाडीवर आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवली होती. नरेंद्र मोदी वाराणसीतून तब्बल 6 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. 

Nashik Lok Sabha Election Result 2024 : राजाभाऊ वाजे 36 हजार 340 मतांनी आघाडीवर

Nashik Lok Sabha Election Result 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरी अखेरीस महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे 36 हजार 340 मतांनी आघाडीवर आहेत. तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे पिछाडीवर आहेत. 

Maharashtra Election Results 2024 Live: मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतची फेरीनिहाय मतं

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: मुंबई : मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ मिळालेली फेरीनिहाय मतं


1. अरविंद गणपत सावंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 19955 मतं
2. मोहम्मद शुऐब बशीर खतिब – बहुजन समाज पार्टी 196 मतं
3. यामिनी यशवंत जाधव – शिवसेना  22978 मतं
4. अफजल शब्बीर अली दाऊदानी – वंचित बहुजन आघाडी 196 मतं
5. मोहम्मद नईम शेख – एम पॉलिटिकल पार्टी 89 मतं 
6. राहुल फणसवाडीकर – लोकशाही एकता पार्टी 53 मतं
7. सुभाष रमेश चिपळूणकर – राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी 40 मतं
8. अरविंद नारायण सावंत – अपक्ष 163 मतं
9. मनिषा शिवराम गोहिल – अपक्ष 38 मतं
10. प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष 23 मतं
11. मतीन अहमद नियाज अहमद रंगरेज – अपक्ष 12 मतं
12. मोहम्मद महताब अख्तर हुस्सेन शेख – अपक्ष 20 मतं
13. शंकर सोनवणे – अपक्ष 43
14. सबीहा खान – अपक्ष 70
15. नोटा – 00 मतं 

Maharashtra Election Results 2024 Live: ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के आघाडीवर

Lok Sabha Elections Results 2024 Live: ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के आघाडीवर, तर उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे पिछाडीवर, 4072 मतांनी नरेश म्हस्के आघाडीवर



  • नरेश म्हस्के : 26046

  • राजन विचारे : 21974

LS Election Results 2024 LIVE: सकाळी 9.30 पर्यंत कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: सकाळी 9.30 पर्यंतच्या कलांमध्ये कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?



  • सुप्रिया सुळे- 11,532 मतांनी आघाडी

  • राजाभाऊ वाजे- नाशिक ठाकरे गट- 30 हजार 486 मतांनी आघाडीवर

  • भास्कर भगरे - नाशिक 1200 मतांनी आघाडीवर

  • नारायण राणे - भाजप 1300 मतांनी आघाडीवर

  • अमोल कोल्हे- शरद पवार गट- 11,111 आघाडी

  • धैर्यशील मोहिते- मविआ - 8500 

  • रावसाहेब दानवे- 1600 मतांनी आघाडी

  • यामिनी जाधव - शिंदे शिवसेना

  • प्रतापराव जाधव - बुलढाणा 2328 मतांची आघाडी

  • गोवल पाडवी - काँग्रेस 32 हजार मताने आघाडी

  • सुनिल तटकरे - राष्ट्रवादी 5400 मतांनी आघाडी

Mumbai North Central Result LIVE: मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उज्वल निकम 2 हजार 697 मतांनी आघाडीवर

Mumbai North Central Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना पहिल्या फेरीत 8 हजार 093 मतं मिळाली आहे. तर, वर्षा गायकवाड यांना 5396 मतं मिळाली आहेत. 


उज्वल निकम : 8093


वर्षा गायकवाड : 5396


उज्वल निकम यांची आघाडी 2 हजार 697 मतांनी

LS Election Results 2024: दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई; शेवाळे 6881 मतांनी आघाडीवर

Mumbai Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: दक्षिण मध्य मुंबईत शिंदेंचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंचे अनिल देसाई यांच्याविरोधात हायव्होल्टेज सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून राहुल शेवाळेंनी आघाडी कायम ठेवली आहे. आता सध्या तिसऱ्या फेरीअखेर दक्षिण मध्य मुंंबईतून राहुल शेवाळे 6881 मतांनी आघाडीवर आहे. 



  • राहुल शेवाळे : 19518 मतं

  • अनिल देसाई : 12637 मतं

  • नोटा : 614 मतं

LS Election Results 2024: यवतमाळ-वाशिम मतदार संघ महाविकास आघाडीचे संजय देशमुख 12358 आघाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: यवतमाळ पहिली आणि दुसरी फेरी यवतमाळ वाशिम मतदार संघ महाविकास आघाडीचे संजय देशमुख 12358 आघाडीवर

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: पहिल्या कलांनुसार कोण किती मतांनी आघाडीवर?

  • नरेश म्हस्के 3824

  • राहुल शेवाळे 5616

  • श्रीरंग बारणे 3395

  • श्रीकांत शिंदे 2093

  • यामिनी जाधव - 739

  • राजश्री पाटील - 24

  • प्रतापराव जाधव - 528

  • अनंत गिते 4468

  • नितीन गडकरी 11 हजार 

LS Election Results 2024: दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळेंची मोठी आघाडी! अनिल देसाई 5616 मतांनी पिछाडीवर

Mumbai South Lok Sabha Constituency Election Result 2024: दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळेंनी मोठी आघाडी घेतली असून अनिल देसाई पिछाडीवर आहेत. 


राहुल शेवाळे : 6722 मतं
अनिल देसाई : 1106 मतं


अनिल देसाई 5616 मतांनी पिछाडीवर

Nashik Lok Sabha Elections Result 2024 :  सिन्नरच्या बूथ क्रमांक 7 वर मतमोजणी थांबवली

- सिन्नरच्या बूथ क्रमांक 7 वर मतमोजणी थांबवली


- ठाकरे गटाकडून मतदान अधिकाऱ्यांकडे तक्रार


- EVM ची बॅटरी कमीच होत नसल्याचा ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांचा आरोप.

Maharashtra Election Results 2024 Live: पहिल्या फेरीचे कल, कोण कोण आघाडीवर?

Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: पहिल्या फेरीचे कल, कोण कोण आघाडीवर?



  • सुप्रिया सुळे - बारामती

  • अमोल कोल्हे - शिरुर

  • रवींद्र धंगेकर - पुणे

  • शाहू महाराज - कोल्हापूर 

  • सत्यजीत पाटील - हातकणंगले 

  • राजाभाऊ वाजे - नाशिक

  • राहुल शेवाळे - दक्षिण मध्य मुंबई

  • यामिनी जाधव - दक्षिण मुंबई

Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: बीड लोकसभा निवडणूक 2024: बजरंग सोनवणे 1359 मतांनी आघाडीवर

बीड लोकसभा निवडणूक 2024


बीड लोकसभा 


फेरी क्रमांक 1


पंकजा मुंडे : 20396


बजरंग सोनवणे : 21755


आघाडी : 1359 (बजरंग सोनवणे)

LS Election Results 2024 LIVE : बारामतीत सुप्रिया सुळे 6991 मतांनी आघाडीवर

Baramati Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: बारामतीतील हायव्होल्टेज लढतीत अटीतटीचा सामना दिसून येत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये पुढे असलेल्या सुनेत्रा पवारांना मागे टाकत, सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीअखेर सुप्रिया सुळे 6991 मतांनी  पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. 

LS Election Results 2024: मुंबईत ठाकरेंच्या उमेदवारांचाच डंका, सातत्यानं आघाडी टिकवून

Maharashtra Election Results 2024 Live: मुंबईतील आतापर्यंतच्या कलांमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांचाच डंका पाहायला मिळत आहे. आतापर्यंत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांनी, तर वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकरांनी आघाडी टिकवून ठेवली आहे. तर ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा यांना मागे टाकत संजय दीना पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: ठाण्यात नरेश मस्केंची राजन विचारेंविरोधात आघाडी; 613 मतांनी घेतली आघाडी

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: ठाणे लोकसभा मतदारसंघातून मोठी अपडेट समोर आली आहे. ठाण्यात ठाकरेंचे राजन विचारे विरुद्ध शिंदेंचे नरेश मस्के यांच्यात लढत झाली होती. नरेश मस्के यांनी 613 मतांनी आघाडी घेतली आहे. 

Lok Sabha Elections Results 2024 Live Updates: महाराष्ट्रा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?

Lok Sabha Elections Results 2024 Live Updates: राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. पाहुयात आतापर्यंत कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? 



  • जळगाव लोकसभा: करन पवार  महा विकास 14477, भाजपच्या स्मिता वाघ 29702 मतांनी आघाडीवर 

  • ठाण्यातून शिंदे गटाचे नरेश म्हस्के आघाडीवर

  • शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे दुसऱ्या फेरी अखेर 9000 मतांनी आघाडीवर 

  • नंदुरबार : पहिल्या फेरीत काँग्रेस गोवाल पाडवी 18500 मतांनी आघाडीवर

  • नाशिकमधून पहिल्या फेरीअखेर ठाकरे गटाचे राजभाऊ वाजे आघाडीवर

  • सांगली - पहिल्या फेरीत अंदाजे 7000 मतांनी विशाल पाटील आघाडीवर

  • माढा : धैर्यशील मोहिते पाठील 5068 मतनी आघाडीवर

  • अकोल्यात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील 2500 मतांनी आघाडीवर. भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर

  • बेळगाव लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर ४९६३ मतांनी आघाडीवर.काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर पिछाडीवर

Shirur Lok Sabha Election result 2024 : शिरुरच्या लढतीत पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे 6 हजार आघाडीवर, तर शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता. गेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे हे आढळराव पाटलांचा (Shivajirao Adhalrao patil) पराभव केला होता. यंदाही ते यशाची पुनरावृत्ती करणार असल्याचे चित्र पहिल्याफेरी अखेर दिसत आहे.  हे चित्र सकाळी 9 पर्यंतचे आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: पहिले कल हाती, ठाकरे गटाची जोरदार मुसंडी; मुंबईतून कोण कोण आघाडीवर?

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबई: लोकसभा 2024 निवडणूकीची (Mumbai Lok Sabha Election Result 2024 ) मतमोजणी सुरु झाली असून मुंबईतील पहिले कल हाती आले आहे. मतमोजणीच्या पहिल्या कलानूसार दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील, उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर, उत्तर मुंबईतून पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आघाडीवर  आहेत. पहिल्या कलानूसार मुंबईत ठाकरे गटाने मुसंडी मारल्याचे दिसत आहे. मुंबईतील 6 पैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आणि 2 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Lok Sabha Elections Results 2024 Live: मतमोजणीला सुरवात होण्या अगोदरच मशीनमध्ये बिघाड

Lok Sabha Elections Results 2024 Live Updates: मतमोजणीला सुरवात होण्या अगोदरच मशीनमध्ये बिघाड झाला आहे. 


हिंगोली विधासभेतील बूथ क्रमांक 8 खोली क्रमांक 1 मधील मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळतंय. 


निवडणूक साहाय्यक अधिकारी यांनी मशीन ताब्यात आहे. 


मशीन झालेले मतदान दाखवत आहे मात्र कुठल्या उमेदवाराला किती मतदान झाले हे दाखवत नाही 


सर्व मतमोजणी झाल्या नंतर या मशीन मधील बॅलेट पेपर चे मतदान मोजले जाणार आहेत

Lok Sabha Election Results LIVE: जानकर यांना मतमोजणीं सुरु होण्याआधीच कार्यकर्त्यांकडून विजयी म्हणुन अभिनंदन

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: परभणी लोकसभा मतदारसंघातून मी विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच दिल्ली जाणार आहे राज्यातील एक्झिट पोल जरी माझ्या आणि महायुतीच्या विरोधात असले तरीसुद्धा मी तर विजय होणारच शिवाय महायुतीच्याही 41 जागा येणार असल्याचा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केलाय  तसेच कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये विजयाचा उत्सव शांतपणे साजरा करावा असा आवाहनही त्यांनी केले महत्त्वाचे म्हणजे जाणकारांना मतमोजणी सुरू होण्या आधीच कार्यकर्त्यांकडून विजयाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: कोल्हापूर : पहिल्या फेरीत शाहू महाराज 1036 मतांनी आघाडीवर

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: कोल्हापूर : पहिल्या फेरीत शाहू महाराज 1036 मतांनी आघाडीवर

Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: आज देशातील लोकसभा निवडणुकांचा निकाल, पाहा एका क्लिकवर...

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: देशातील लोकसभा जागांचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Shirur lok Sabha Election Result LIVE: पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे 6116 मतांनी आघाडीवर

Pune Shirur lok Sabha Election Result LIVE: पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे यांना 6116 मतांची आघाडी महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवरती आहेत. शिरुरचा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपासूनच चर्चेत होता. अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानानंतर शिरुरची लढत प्रतिष्ठेची बनली होती. 

LS Election Results 2024: लोकसभेच्या मतमोजणीचे सुरुवातेच कल हाती, क्षणोक्षणीचे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates


एबीपी माझा लाईव्ह टीव्ही लिंक : https://marathi.abplive.com/live-tv 


एबीपी माझा युट्यूब लाईव्ह लिंक : https://www.youtube.com/watch?v=BO0a1ukrPtQ

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: पहिले कल हाती, ठाकरे गटाची जोरदार मुसंडी; मुंबईतून कोण कोण आघाडीवर?

मुंबई: लोकसभा 2024 निवडणूकीची (Mumbai Lok Sabha Election Result 2024 ) मतमोजणी सुरु झाली असून मुंबईतील पहिले कल हाती आले आहे. मतमोजणीच्या पहिल्या कलानूसार दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील, उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर, उत्तर मुंबईतून पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आघाडीवर  आहेत.


वाचा सविस्तर वृत्त

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: राज्यात आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीचा सामना; कोण पुढे, कोण मागे?

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: राज्यात आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीचा सामना; कोण पुढे, कोण मागे? 



  • सांगलीतून पोस्टल मतदानात भाजप उमेदवार संजय काका पाटील आघाडीवर

  • मिहिर कोटेच्या ईशान्य मुंबई मधून आघाडीवर

  • जळगाव लोकसभा पोस्टल मत करण पवार 277 मतांनी पुढे पहिल्या फेरीत करण पवार आघाडीवर 

  • टपाली मतमोजणीत रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे यांची आघाडी

  • शिरुरमध्ये अमोल कोल्हे 6 हजार मतांनी आघाडीवर 

  • अमरावतीत नवनीत राणा आघाडीवर 

  • माढ्यात भाजपचे रणजित निंबाळकर आघाडीवर

  • सोलापुरातून प्रणिती शिंदे आघाडीवर

  • हातकणंगले लोकसभा मतदार संघ : सत्यजित आबा पाटील आघाडीवर, महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर

Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपनं स्वबळावर 200 पारचा आकडा गाठलाय

Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपनं स्वबळावर 200 पारचा आकडा गाठला आहे. तर महाराष्ट्रात 17 जागांवर महायुतीनं आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी 13 जागांवर आघाडीवर आहे. 

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: राज्यात अटीतटीचा सामना, आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीला समसमान जागांवर आघाडी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: राज्यात अटीतटीचा सामना आतापर्यंतच्या कलांनुसार महायुती आणि महाविकास आघाडीला समसमान जागांवर आघाडीवर. मुंबईतील पहिल्या कलांमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी मुसंडी मारली आहे. तर नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर आहेत. बारामतीत सुप्रिया सुळेंना पिछाडीवर टाकत सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतली आहे. 

Latur Lok Sabha Result : लातूरमध्ये मतमोजणीला सुरुवात, 29 फेऱ्यांत होणार मतमोजणी

Latur Lok Sabha Election Result Counting : लातूर लोकसभा मतदारसंघ संघ


एकूण 1237355 मतांची मोजणी होणार आहे


मतमोजणीच्या 29 फेऱ्या होणार आहेत


28 उमेदवार रिंगणात आहेत


84 टेबलवर त मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे.


पोस्टल मतदान 5761 आहे, या मतांची मोजणी सुरू झाली आहे

Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: मुंबईचे पहिले कल हाती, सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीची बाजी

Mumbai Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: मुंबईचे पहिले कल हाती आले असून सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. 



  • अरविंद सावंत - द. मुंबई (आघाडीवर)

  • अमोल किर्तीकर - वायव्य मुंबई (आघाडीवर)

  • पियूष गोयल - उत्तर मुंबई (आघाडीवर)

  • राहुल शेवाळे - द.मध्य मुंबई (आघाडीवर)

  • वर्षा गायकवाड - उत्तर मध्य मुंबई (आघाडीवर)

  • संजय दिना पाटील - ईशान्य मुंबई (आघाडीवर)

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: पहिले कल हाती, मुंबईतून कोण कोण आघाडीवर?

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: मुंबईचे पहिले कल हाती आले आहेत. पोस्ट मतमोजणीमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी मोठी आघाडी घेतली आहे. पोस्टल मतदानात ठाकरेंचे तीन शिलेदार आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.



  • अरविंद सावंत - द. मुंबई

  • अमोल किर्तीकर - वायव्य मुंबई

  • पियूष गोयल - उत्तर मुंबई

  • राहुल शेवाळे - द.मध्य मुंबई

  • वर्षा गायकवाड - उत्तर मध्य मुंबई

  • संजय दिना पाटील - ईशान्य मुंबई

Maharashtra Election Results 2024 Live: पोस्टल मतदानात ठाकरेंचे तीन शिलेदार आघाडीवर

Mumbai Election Results 2024 Live: मुंबईचे पहिले कल हाती आले आहेत. पोस्ट मतमोजणीमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी मोठी आघाडी घेतली आहे. पोस्टल मतदानात ठाकरेंचे तीन शिलेदार आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. तर भाजपचे पियूष गोयल आणि दक्षिण मध्य मुंबईतून शिंदेंच्या राहुल शेवाळेंनी मोठी आघाडी घेतली आहे. तर उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर, दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत. ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटीलही आघाडीवर आहेत. 

Maharashtra Lok Sabha Election Results LIVE: मुंबईतून ठाकरेंच्या दोन शिलेदारांची मजल, पोस्टल मतदानात घेतली मोठी आघाडी

Mumbai Lok Sabha Election Results 2024: मुंबईतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या कलांकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. मुंबईतून भाजपचे पियुष गोयल, दक्षिण मध्य मुंबईतून शिंदे गटाचे राहुल शेवाळे, उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर, दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत. 

Dindori Lok Sabha Elections Result 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात 

Lok Sabha Elections Result 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता सध्या पोस्टल मतदानाची मोजणी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण 4300 पोस्टल मतदान आहे. यामध्ये आता पहिले पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मधील मतमोजणीला सुरुवात होईल. पोस्टल मतांमध्ये आता नेमकी कोणाला आघाडी मिळते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

LS Election Results 2024: मंडीमधून कंगना रनौत पिछाडीवर


Kangana Ranaut : लोकसभेच्या रिंगणात उतरलेली अभिनेत्री कंगना रनौत सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. 


Maharashtra Lok Sabha Elections Results 2024 Live Live Updates: बारामतीतून सुप्रिया सुळे, तर छ. संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे आघाडीवर

Maharashtra Election Results 2024 Live: मतमोजणीला सुरुवात होताच पहिल्या पाच मिनिटांतील पहिले कल हाती आले आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे, तर छ. संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत. तर नागपुरातून नितीन गडकरी, पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे शिरुरमधून अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. 

Maharahtra Lok Sabha Elections Result 2024 : नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या विजयासाठी महायज्ञ

Lok Sabha Elections Result 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी नाशिकमध्ये महायज्ञ करण्यात येत आहे. तपोवन परिसरात ब्रह्मवृद, पुरोहितच्या माध्यमातून मंत्रोच्चार गजरात हा महायज्ञ केला जात आहे. 

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 LIVE: शिरुर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतदानाची मोजणी सुरू

Shirur Lok Sabha Election 2024 :  शिरुर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पोस्टल मतदानाची मोजणी सुरु झाली आहे. 


पोस्टल मतमोजणी नंतर EVM मशिन मत मोजणी सुरु होणार आहे. 


112 टेबलांवर 149 फेऱ्यांमध्ये मतमोजणी सुरू

Mumbai Lok Sabha Election 2024: उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल आघाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेट आणि गृह मतदान केलेल्या मतांची मोजणी केली जाणार आहे. 

Mumbai Lok Sabha Election 2024: उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल आघाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेट आणि गृह मतदान केलेल्या मतांची मोजणी केली जाणार आहे. 

कोल्हापूर, हातकणंगले, शिरुर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

  • कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

  • शिरुर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात

  • पोस्टल मतदानाची मोजणी सुरु

  • पोस्टल मतमोजणी नंतर EVM मशिन मत मोजणी सुरु होणार

  • 112 टेबलांवर  149 फे-यांमध्ये मतमोजणी सुरु

Mumbai Lok Sabha Elections 2024 Results: ईशान्य मुंबईसाठी 4432 पोस्टल मतदान

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: मुंबईतील मतमोजणीचा पहिला कल हाती. ईशान्य मुंबईसाठी 4432 पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार आहे. 

Mumbai Lok Sabha Election 2024 Results LIVE: मुंबईत आठ वाजता पोस्टल बॅलेट मोजणीला सुरुवात होईल, त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी सुरू होणार

Mumbai Lok Sabha Election 2024 Results LIVE: मुंबईत आठ वाजता पोस्टल बॅलेट मोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर 8.30 वाजता ईव्हीएम वरील मतमोजणीला सुरुवात होईल. जोपर्यंत पोस्टल संपत नाही तोपर्यंत मोजणी सुरु राहील.

Shirdi Lok Sabha Elections Result 2024 : भाऊसाहेब वाकचौरे साई दरबारी 

Shirdi Lok Sabha Elections Result 2024 : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे साई दरबारी दाखल झाले आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब वाकचौरे यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आहे. आता ते अहमदनगरला मतमोजणी केंद्राकडे रवाना होणार आहेत. 

Latur Lok Sabha Election Result Update : लातूरमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात

Latur Lok Sabha Election Result : लातूरमध्ये 5564 पोस्टल मत मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आता लातूरमध्ये अवघ्या काही मिनिटांत लातूरमधील पहिला निकाल येणार.

Chhatrapati Sambhaji Nagar Result LIVE: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्रावर गोंधळ

Chhatrapati Sambhaji Nagar Result LIVE Updates: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय. कॉलिंग एजंट यांना प्रवेश देत नसल्यानं गोंधळ झाल्याची माहिती मिळत आहे. कार्यकर्ते आतमध्ये जाण्यास आग्रही आहेत, मात्र पोलिसांकडून त्यांना आतमध्ये सोडण्यास नकार देण्यात आला आहे. 

Mahadev Jankar On Parbhani Election Result LIVE : विजयाचं प्रमाणपत्र घेऊनच दिल्लीला जाणार : महादेव जानकर

Parbhani Lok Sabha Election Result : परभणीतून मी विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच दिल्लीत जाणार


कार्यकर्त्यांनी गावागावात शांततेने विजयोउत्सव साजरा करावा


माझ्यासह राज्यातील एक्झिट पोल जरी विरोधात असले तरी प्रत्यक्ष मी जिंकणार अन महायुतीच्या 41 जागा येणार


महादेव जानकर यांना मतमोजणीं सुरु होण्याआधीच कार्यकर्त्यांकडून विजयी म्हणुन अभिनंदन 

Nashik Lok Sabha Elections Result 2024 : नाशिकमधून मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, हेमंत गोडसेंना विश्वास

Nashik Lok Sabha Elections Result 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी घरातील देवघराचे दर्शन केले. हेमंत गोडसेंच्या पत्नी व कुटुंबियांनी त्यांचे औक्षण केले असून ते थोड्याच वेळात नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 

Mumbai North East Lok Sabha Election Results 2024 : पोस्टल मतदान मोजणीला काही वेळातच सुरूवात 

पोस्टल मतदान मोजणीला काही वेळातच होणार सुरूवात. एकूण ४४३२ पोस्टल मतदान. पोस्टल मतमोजणीतून येणार उमेदवारांचा पहिला कल . भाजपकडून मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्यात थेट लढत

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 LIVE: मतमोजणीला सुरुवात, पुढच्या काही क्षणांत लोकसभेचा पहिला कल हाती येणार

Lok Sabha Elections 2024 Results Vote Counting Live Updates: मतमोजणीला पुढच्या काही क्षणांत लोकसभेचा पहिला कल येणार हाती. राज्यासह देशभरातील निकाल सर्वात आधी एबीपी माझावर...

Ravindra Dhangekar:  पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर कसबा गणपती मंदिरात

Ravindra Dhangekar:  पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात दर्शनासाठी पोहचले आहेत.

Mumbai Lok Sabha Election Resukt LIVE: उत्तर, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य मतदार संघाच्या स्ट्राँग रूम उघडल्या, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

Mumbai Lok Sabha Election Resukt LIVE: उत्तर, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य मतदार संघाच्या स्ट्राँग रूम उघडण्यात आल्या आहेत. थोड्याच वेळात पोस्टल मत मोजणीला सुरवात होणार आहे. थोड्याचं वेळात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 

Dhule Lok Sabha Elections Result 2024 :धुळ्यातून सुभाष भामरे एक लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार, भाजप कार्यकर्त्यांना विश्वास

Dhule Lok Sabha Elections Result 2024 : धुळ्यात मतमोजणी केंद्रावर कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाष भामरे एक लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासोबतच जल्लोषाची देखील तयारी पूर्ण झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Mumbai Lok Sabha Elections LIVE: मुंबईत कशी होणार मतमोजणी?

Mumbai Lok Sabha Elections LIVE: मुंबई : मुंबईत कशी होणार मतमोजणी? 


मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ


विधानसभा  मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. यामध्ये  वरळी विधानसभा मतदारसंघ 18, शिवडी -१९, भायखळा - 19, मलबार हिल-20, मुंबादेवी - 16, कुलाबा - 20 अशा फेऱ्या होणार आहेत. 


मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ


अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघ-19, चेंबूर- 21, धारावी-19, शीव-कोळीवाडा -19, वडाळा-18, माहिम 18,अशा फेऱ्या असतील.


सैनिक मतदारांच्या मतपत्रिका छाननीसाठी स्थापित ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर प्रणालीवर माहिती भरण्यासाठी स्थापित कक्ष, सर्व मतमोजणी कक्षातील फेरीनिहाय, उमेदवारनिहाय आकडेवारीची सारणी तयार करण्यासाठी स्थापित टॅब्युलेशन कक्ष आदी विविध कक्षात अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर ईव्हीएम आणि सांविधानिक व असांविधानिक लिफाफे सील करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके गठीत करण्यात आली आहेत. प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत.


मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.

Mumbai Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

Mumbai Lok Sabha Election Result 2024 LIVE: मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे होणार आहे. यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.


 या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.


मा. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून  मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून जी.एस प्रियदर्शी (आय.ए.एस.) व राम प्रकाश (एस.सी.एस.) तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून राजीव रंजन (आय.ए.एस) व नवाब दीन (एस.सी.एस.)यांची नियुक्ती केली आहे. 


मतदान केंद्रावरील आवश्यक त्या सोयीसुविधा आणि उपाययोजना बाबत मुंबई शहर  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांचा सातत्याने आढावा सुरू आहे.


मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील (ईव्हीएम) प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक  सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.


तसेच टपाली मतमोजणीसाठी एका लोकसभा मतदारसंघासाठी 14 टेबल आणि सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. सकाळी 8 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.

Maharashtra Lok Sabha Elections Result 2024 : दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंना विजयाचा विश्वास

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी लोकसभेच्या निकालाआधी आईचे दर्शन घेतले. तसेच गावातील ग्रामदैवतेचे दर्शन घेतले. यावेळी कुटुंबीयांनी भास्कर भगरे यांचे औक्षण केले. शेतीसह अनेक प्रश्न भाजप खासदारांच्या काळात सुटले नाही. त्यामुळे जनतेने मला मतदान केल्याने मी नक्की निवडून येणार असल्याचा विश्वास भास्कर भगरे यांनी व्यक्त केला. 

Satara Lok Sabha Election 2024 Result LIVE : सातारा लोकसभा मतमोजणीच्या ठिकाणी श्वान पथक दाखल

Satara Lok Sabha Election Result LIVE : सातारा : सातारा लोकसभा मतमोजणी ठिकाणी श्वान पथक दाखल झालं आहे. स्ट्राँग गार्ड आणि मतमोजणी ठिकाणाची सातारा बीडीएस पथकही दाखल झालं आहे. श्वान आझादच्या साह्यानं तपासणी सुरू आहे. 

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: नारायण राणेंनी घेतलं गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपतीचं दर्शन

Maharashtra lok sabha election results 2024:  रत्नागिरी: केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी सपत्नीक राणे बापाच्या चरणी नतमस्तक झाले.

Sangli Lok Sabha Results LIVE: सांगलीत विशाल पाटील मतमोजणी केंद्रावर दाखल, विशाल पाटील मतमोजणीसाठी सपत्नीक मतदान केंद्रावर दाखल

Sangli Lok Sabha Election Results 2024 LIVE : अपक्ष उमेदवार विशाल पाटील मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. मतमोजणी केंद्रावर विशाल पाटील यांच्या गाडीची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. विशाल पाटील हे सांगलीत अपक्ष उमेदवार आहेत. विशाल पाटील मतमोजणीसाठी सपत्नीक मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. मतमोजणी केंद्रावर येण्यापूर्वी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या गाडीची तपासणी करण्यात आली आहे. 

Maharashtra lok sabha election results 2024: निकालाआधी मिहीर कोटेचा काय म्हणाले?

Lok Sabha Elections Results 2024 Live: मुंबईकरांनी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील महायुतीच्या सहाही जागा आम्ही जिंकू, अशी प्रतिक्रिया ईशान्य मुंबई लोकसभेचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी दिली आहे.

Maval Lok Sabha Election Result 2024 LIVE: जनता आमच्या बाजूनं निकाल देईल; मावळचे उमेदवार संजोग वाघेरेंना विश्वास

Maval Lok Sabha Election Result 2024 LIVE: काही मिनिटांत निकाल येण्यास सुरुवात होणार आहे, दुपारी तीन पर्यंत खासदारकिच चित्र स्पष्ट होईल, अशातच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे मात्र काहीसे तणावमुक्त असून जनता आमच्या बाजूनं निकाल देईल, असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे. 

Mumbai Lok Sabha Election Results 2024: चुनाभट्टीतील नागरिकांना विजयाबाबत काय वाटतं?

Mumbai Lok Sabha Election Results 2024 LIVE: चुनाभट्टी परिसरात सकाळ सकाळी लाफ्टर क्लबकरता जमा झालेल्या लोकांसोबत एबीपी माझानं संवाद साधला आहे. एकमुखानं नरेंद्र मोदींच्या विकासाकरता मतदान केलंय, देशात जी विकासकाम झालीत आणि सुरू आहेत, त्याकरता मोदींनाच पसंती असल्याचं यावेळी सर्वांनी सांगितलं. 

Lok Sabha Elections Results 2024 Live: पालघरमध्ये निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार

Maharashtra lok sabha election results 2024: पालघरमध्ये निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार असल्याचं दिसून येत आहे.  पत्रकारांसाठी तयार केलेला पत्रकार कक्ष पूर्णपणे पडदे लावून बंदिस्त असल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

Lok Sabha Election Surat Result 2024 : मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर, मतमोजणीआधीच भाजपने 'सुरत' जिंकलं

Lok Sabha Election Surat Result 2024 LIVE : लोकसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. अवघ्या काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. हा अंदाज खरा ठरणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच भाजपने खातं खोललं आहे. भाजपने गुजरातमधील सुरत (SuratLok Sabha Election Result) या जागेवरून विजय मिळवला आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Pune Lok Sabha Result 2024: मला कोथरुडमध्ये पडणारी मतं पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल, निकालापूर्वी रवींद्र धंगेकरांचं सूचक वक्तव्य, पुण्यात चमत्कार होणार?

Pune Lok Sabha Result 2024: पुणे : देशभरात निवडणूक निकालाची उत्सुकता लागली असून, पुणे जिल्ह्यात निकाल नेमका कोणाच्या पारड्यात जातो, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. दुसरीकडे मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, थोड्याच वेळात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी अडीचपर्यंत निकाल हाती येणार आहे. पुणे लोकसभेची निवडणूक (Pune Lok sabha Election Result) अत्यंत चुरशीची असल्याने अंतिम फेरीनंतरच निकालाचे चित्र स्पष्ट होईल.


पुणे लोकसभेच्या निकालाआधी महायुती आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. पुण्यातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना विजयाची खात्री आहे. लढणारा माणसाचा विजय होत असतो, हा माझा अभ्यास आहे. गेले दोन-तीन महिने मी पुणे शहरात काम करतोय आणि गेल्या 30 वर्षांपासून पुणेकरांसोबत माझी नाळ जुळलेली आहे. त्यामुळे मला निवडणुकीची आजपर्यंत भीती वाटली नाही, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Nagpur Lok Sabha Result 2024 LIVE: नागपुरात गडकरींच्या विजयाचा विश्वास; जागोजागी गडकरींचे होर्डिंग्स

Nagpur Lok Sabha Election Result 2024 LIVE: मतमोजणीला थोड्याच वेळात सुरू होत आहे. तत्पूर्वी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये गडकरींच्या विजयाचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या विजयानंतर गुलाल उधळण्यासाठी गुलाल तयार ठेवा, अशा आशयाचे होर्डींग शहरात लागलेय. महाल परिसरात गुलाल तयार ठेवा असे गडकरींच्या विजयानंतर जल्लोषाच्या तयारच्या दृष्टीनं होर्डिंग लागले आहे.

Yavatmal Lok Sabha Election Results: यवतमाळमध्ये राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख; लोकसभेचं तख्त कोण राखणार?

Yavatmal Lok Sabha Election Results 2024 LIVE: यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी लवकरच मतमोजणीला शासकीय धान्य गोडाऊन याठिकाणी सुरुवात होणार असून सर्व अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणी स्थळावर पोहचले आहे. 30 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार असून प्रत्येक मतदारसंघासाठी 14 असे 6 मतदारसंघासाठी 84 टेबल या ठिकाणी लावण्यात आले आहेत. या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख तर महायुतीकडून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या राजश्री पाटील उमेदवार आहे. सेना विरुद्ध सेना या लढतीत नेमकी कोण बाजी मारणार? हे लवकर स्पष्ट होणार आहे.  

Maharashtra lok sabha election results 2024: मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये मतमोजणीला सुरुवात

Lok Sabha Elections Results 2024 Live:  मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये उत्तर मध्य, उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.  या तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत आहे. उत्तर मध्य मुंबईत भाजपचे उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात लढत आहे. उत्तर पश्चिमेत ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत आहे. मुंबई उत्तर मध्ये भाजपचे पियुष गोयल आणि महाविकास आघाडीचे भूषण पाटील यांच्यात लढत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर हजारो सरकारी कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मतमोजणी केंद्रावर राजकीय पक्षांचे नेमलेले प्रतिनिधी येण्यास देखील सुरुवात झालेली आहे. 

Pankaja Munde and Bajrang Sonawane: बीडच्या मैदानात बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे, कोण बाजी मारणार?

Beed Lok Sabha Election Results 2024 : बीड : भाजप उमेदवार पंकजा मुंडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि वंचितचे अशोक हिंगे यांच्यासह एकूण 41उमेदवार या निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी शासकीय तंत्र निकेतन, खंडेश्वरी मंदिराजवळ नाथापूर रोड बीड येथे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. सदरची मतमोजणी ही विधानसभा मतदारसंघ निहाय होणार आहे. मतदारसंघ निहाय 6 मतमोजणी कक्ष असणार आहेत. प्रत्येक मतमोजणी कक्षामध्ये 14 टेबल्सवर मतमोजणी होणार आहे.


आष्टी विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या सर्वाधिक 32फेऱ्या होणार आहेत. केज विधानसभा मतदार संघात 30, गेवराई 29,माजलगाव आणि बीड मधे प्रत्येकी 27 तर परळीत 25फेऱ्यात मतमोजणी होईल.बिड लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात 41उमेदवार होते. 41उमेदवार आणि नोटा असे 42 मते प्रत्येक मतदान यंत्रात मोजले जाणार असल्याने मतमोजणीस वेळ लागणार आहे. टपाली मतपत्रिका मोजणीसाठी स्वंतत्र टपाली मतपत्रिका  मतमोजणी कक्ष असून तिथेही 10 प्रतिनिधीची नेमणूक करण्याबाबत सुचना देण्यात आलेली आहे. 


प्रत्येक ईव्हिएम मशिन्स मधील मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया मतमोजणी प्रतिनिधी यांच्या समोर होणार असल्याने यात पारदर्शकता असून त्यामध्ये कुठलाही फेरबदल निवडणूक निर्णय अधिकारी करू शकत नाहीत. सदरील मतमोजणी प्रक्रिया करता. भारत निवडणूक आयोगाने 02 मतमोजणी निरीक्षक यांची नियुक्ती केली असून त्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी प्रत्येक मतमोजणी कक्षामध्ये 16 सुक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतमोजणी टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि केंद्र शासनाच्या सेवेतील एक सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

Raver Lok Sabha Election Results 2024: यंदाची निवडणूक जनतेनं हातात घेतली, आपण एक लाखाच्या मताधिक्यानं निवडून येणार : श्रीराम पाटील

Raver Lok Sabha Election 2024: रावेर : रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतमोजणीपूर्वी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, आपण एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला. 

Ramtek Lok Sabha Election Results 2024: मला विजयचा विश्वास : श्यामकुमार बर्वे

Ramtek Lok Sabha Election Result: रामटेकचे काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे हे सकाळी सहा वाजताच मतमोजणी केंद्रावर पोहचले आणि मतमोजणी सुरू होण्या पूर्वीच्या प्रक्रियेवर ते बारीक लक्ष ठेवून आहेत. 


मतमोजणी सुरू होण्यापूर्वी रामटेकचे काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मला विजयचा विश्वास आहे, म्हणून मी मतमोजणी केंद्रावर पोहचलो, ज्यांना  पराभवाची भीती आहे ते उमेदवार मतमोजणी केंद्रावर पोहोचलेच नाही, असे म्हणत त्यांनी शिवसेना उमेदवार राजू पारवे यांना बर्वे यांनी टोमणा मारला आहे. 

Lok Sabha Elections Results 2024 Live: निकालााधी रवींद्र धंगेकर काय म्हणाले?

Maharashtra lok sabha election results 2024: पुणेकरांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. तसेच एक्झिट पोल्सनूसार महायुती आणि भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी होत आहेत, असं दिसून येत आहे. यावर देखील रवींद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्झिट पोल्स एक अंदाज आहेत, निकाल नाही. मुरलीधर मोहोळ यांनी गुलाल मागवला आहे, त्यांचे खासदार म्हणून अनेक ठिकाणी बॅनर लागलेले आहेत, असं विचारल्यास त्याच बॅनरवर माझे फोटो लागलेले दिसतील, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली. फक्त दोन फेऱ्या होऊद्या, मग समजेल. तसेच कोथरुडमधून मला किती मतं पडेल, यावरुन भाजप आणि पत्रकारांना आश्चर्य वाटेल, असं सूचक विधानही रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे. 

Dharashiv Lok Sabha Election Result 2024 : विजयाचा विश्वास! मतमोजणीपूर्वीच ओमराजे निंबाळकर यांचा विजयरथ तयार 
Dharashiv Lok Sabha Election Result 2024 : धाराशीवमध्ये ओमराजे निंबाळकरांना विजयाचा विश्वास. मतमोजणीपूर्वीच ओमराजे निंबाळकर यांचा विजयरथ तयार ठेवण्यात आला आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास आहे. ओमराजे निंबाळकर निवडून आल्यानंतर याच विजय रथातून त्यांची मिरवणूक होणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. यापूर्वी निंबाळकर यांच्या विजयाचे देखील बॅनर लावण्यात आले आहेत. 


Mumbai Lok Sabha Election Result 2024 : पक्षफुटीनंतर मुंबईकरांचा कौल कोणत्या शिवसेनेच्या बाजूनं?

Mumbai Lok Sabha Election Result 2024 : मुंबई : महाराष्ट्रानं (Maharashtra Politics) गेल्या दोन वर्षांच न भूतो न भविष्यती अनेक राजकीय भूकंपांचा (Maharashtra Politicle Crisis) सामना केला आहे. तसेच, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) यांच्यातील फुटीनंतरची पहिली सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यातल्या त्यात मुंबईतील मतदारसंघांवर सर्वांच्याच नजरा खिळल्यात. मुंबईतील अनेक जागांवर शिवसैनिक एकमेकांविरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates: मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 निकाल जाहीर झाले. महाराष्ट्रातील निकालांनी सर्व देशालाच अवाक् केलंय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. निकालांनुसार, अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे, गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला मोठा दणका बसला आहे. तर, महाराष्ट्रभरात महाविकास आघाडीचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात 23 जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा केवळ 9 जागांवर विजय मिळवता आला आहे.  


महाराष्ट्रात मविआनं महायुतीला धोबीपछा़ड केलंय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर यश मिळालंय. तर सांगलीत अपक्ष विशाल पाटलांचा विजय झालाय. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेनं मतदानातून सडेतोड उत्तर दिल्याचं बघायला मिळतंय. 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय.. यंदा राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी केली. तर मुंबईत ठाकरेच किंग ठरले आहेत. 


महाराष्ट्रातील यंदाची लोकसभा निवडणूक इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांपेक्षा उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. दुसरीकडे देशात 400 पारचा नारा देणारा भाजपचा विजय रथ मात्र, 300 च्या आतच थांबला. 


आता पंतप्रधान मोदींनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला असून सतरावी लोकसभा विसर्जित झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच मोदींनी सत्तास्थापनेचा दावा केला असून लवकरच शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून रणिनीत आखली जात आहे. 


महाराष्ट्रासाठी यंदाची निवडणूक तशी फारच वेगळी होती. गेली दोन वर्ष महाराष्ट्रानं अनेक राजकीय भूकंपांचा सामना केला आहे. अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीमुळे देखील यंदाची निवडणूक फार वेगळी ठरली. यंदा राज्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजेच, शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा लढती पाहायला मिळाल्या.  


देशासह राज्यातील सर्व लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. अनेक मतदारसंघात दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे, तर अनेक ठिकाणी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. 


परफेक्ट आणि फास्ट निकाल तुम्हाला  'एबीपी माझा'वर पाहायला मिळतील. पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.