Hingoli Lok Sabha Election Result 2024 : हिंगोलीमध्ये मतमोजणीला सुरुवात कऱण्याआधीच ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. हिंगोलीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात थेट सामना होत आहे. आज सकाळी राज्यभरात मतमोजणीला सुरुवात झाली, पण हिंगोलीमध्ये मात्र ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला.
हिंगोलीमध्ये मतमोजणीला सुरवात होण्याआधीच ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय. हिंगोली विधासभेतील खिडकी बूथ क्रमांक 08 खोली क्रमांक 01 मधील ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला आहे. हिंगोली निवडणूक साहयक अधिकारी यांनी ही मशीन ताब्यात घेतली.
ईव्हीएम मशीनमध्ये झालेले मतदान दाखवत आहे. मात्र कुठल्या उमेदवाराला किती मतदान झाले हे दाखवत नाही. सर्व मतमोजणी झाल्यानंतर या मशीन मधील बॅलेट पेपर चे मतदान मोजले जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
हिंगोली मतदारसंघात यंदा 62.54 टक्के मतदान झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश पाटील आणि शिवसेना शिंदे गटाकडून बाबूराव कदम-कोहळीकर यांच्यामध्ये लढत होत आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांना आघाडी मिळण्याची शक्यता आहे. मतदानाचा निकाल (Hingoli Lok Sabha Election Result 2024) आता अवघ्या काही तासांवर असून या लढतीत नक्की कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.
2019 सालचा निवडणूक निकाल - (Hingoli Lok Sabha Constituency 2019 Result)
हेमंत पाटील (शिवसेना) - 5,86,312 मतं - विजयी
सुभाष वानखेडे (काँग्रेस) - 3,08,456 मतं