मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election Result 2024) महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. मुंबईत महाविकास आघाडीनं (MVA) वर्चस्व मिळवलं आहे.  दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई (Anil Desai) विजयी झाले. मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकर (Amol Kiritikar) यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. मुंबईतली सर्वात मोठा निकाल म्हणजे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा निकाल होय. काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) जाएंट किलर ठरल्या आहेत. वर्षा गायकवाड यांनी भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांना पराभूत केलं आहे. 


अखेरच्या क्षणी उमेदवारी खेचून आणणाऱ्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांना पराभूत केलं आहे. वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी मिळवल्यानंतर शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती.  यावेळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना खासदार करुन दिल्लीला पाठवणार असल्याचं म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी पहिल्यांदा पंजाला मतदान करणार असल्याचं म्हटलं होतं.  वर्षाताईंना खासदार करुन दिल्लीला पाठवणार आहे. देशात हुकूमशाही येऊ नये, राज्यघटना बदलू नये यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी लढतेय आणि जिंकणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.


सुरुवातीला पिछाडीवर नंतर विजयाला गवसणी


मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरु झाल्यानंतर सुरुवातीला उज्ज्वल निकम यांनी मोठी आघाडी घेतली होती. यावेळी वर्षा गायकवाड पिछाडीवर होत्या. मात्र, मतमोजणीच्या अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली. वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला. 



मुंबईत महाविकास आघाडीला पाच जागा मिळणार


मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी पाच जागांवर महाविकास आघाडीनं यश मिळवलं आहे. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई, ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील, मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकर आणि मुंबई उत्तर मध्य मध्ये वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला. ठाकरेंचे चार उमेदवार मुंबईत आघाडीवर आहेत तर, वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला. तर, मुंबई उत्तर मतदारसंघात भाजपचे पियूष गोयल विजयी झाले आहेत.  


काँग्रेसला आणि मविआला राज्यात मोठं यश


महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं मोठी मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीनं आतापर्यंत 29 जागांवर आघाडी मिळवली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला 12 जागांवर आघाडी मिळाली. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 10, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 7 जागांवर आघाडी आहे. सांगलीतून विशाल पाटील देखील विजयी झाले असून ते महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकतात.


संबंधित बातम्या : 


North Central Mumbai Constituency: उज्ज्वल निकमांची 56 हजारांची लीड तोडली, शेवटच्या फेरीपर्यंत सामना रंगला, पण वर्षा गायकवाडांनी विजय खेचून आणला


South Mumbai Lok Sabha Result 2024 : मुंबादेवीचा आशीर्वाद ठाकरेंनाच; दक्षिण मुंबईचा गड अरविंद सावंतांनी राखला; यामिनी जाधवांचा दारुण पराभव!