Dhule Lok Sabha Election Result 2024 : देशासह राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निकाल आज जाहीर होत असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी आठ वाजेपासून राज्यातील विविध मतदान केंद्रांवर मतमोजणीस सुरुवात झाली आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील आठही लोकसभा मतदारसंघांत जिल्ह्याच्या ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. 


धुळे लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamare) यांच्यात लढत होत आहे. आज सकाळपासून मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर थोड्या फार मतांनी कधी बच्छाव तर कधी भामरे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. 


डॉ. शोभा बच्छाव आघाडीवर 


अकराव्या फेरीत काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी मुसंडी मारली असून त्यांनी अकराव्या फेरीत १२ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांची दहाव्या फेरीची आघाडी तोडून ही आघाडी घेतली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये 17 व्या फेरी अखेर काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव 15 हजार मतांनी आघाडीवर आहे.


दरम्यान, दहाव्या फेरीत डॉ. सुभाष भामरे यांना ३ लाख ८६ हजार १९० मते मिळाली होती. तर डॉ. बच्छाव यांना ३ लाख ७४ हजार इतकी मते मिळाली होती. त्यावेळी ही मतांची आघाडी १२ हजारांची होती. त्यांनतर आता अकराव्या फेरीत बच्छाव यांनी ही आघाडी तोडत १२ हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर सहाव्या फेरीत भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना २ लाख १६  हजार ५३१ मते तर काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना २ लाख १ हजार ३९९ मते मिळाली होती. त्यामुळे धुळ्यात अटीतटीची लढत होताना पाहायला मिळत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Nandurbar Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्राचा पहिला निकाल हाती, काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी