चार-पाच दिवसांपासून लेकाचं तोंड पाहिलं नाही, मुलाच्या आठवणीने मिसेस मुख्यमंत्री व्याकुळ, म्हणाल्या आता...
सध्या श्रीकांत शिंदे त्यांच्या मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेत आहे. फॉर्म भरल्यानंतर आम्ही देखील श्रीकांत शिंदेच्या प्रचारात जोरदार उतरणार आहे, असेही लता शिंदे म्हणाल्या,
मुंबई : श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यावेळेला हॅट्रिक करणार असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) पत्नी लता शिंदे (Lata Shinde) यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. जनतेचा कौल आज त्याच्या पाठीमागे भक्कम आहे असेही त्यावेळी ते म्हणाले. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.
लता शिंदे म्हणाले, लोकसभेसाठी प्रचंड मेहनत करतो. जनतेचा कौल त्याच्यासोबच आहे. चार ते पाच दिवस माझ्या मुलाची भेट होत नाही . एकाच घरात राहत असून देखील आमची भेट होत नाही. मलाच त्याला भेटायला त्याच्या मतदारसंघात जावे लागेल. पण तो ज्या पद्धतीने काम करतो आला आहे किंवा आताही करतोय याचा मला अभिमान आहे.
सध्या श्रीकांत शिंदे त्यांच्या मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेत आहे. फॉर्म भरल्यानंतर आम्ही देखील श्रीकांत शिंदेच्या प्रचारात जोरदार उतरणार आहे. माझा आशिर्वाद त्याच्या पाठीमागे सदैव आहे. श्रीकांत शिंदे यावेळेला हॅट्रिक करणार आहे, असा विश्वास आईने व्यक्त केला.
महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच
कल्याण लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघातून विद्यमान खासदार असून, भाजपकडून देखील याच मतदारसंघावर दावा केला जात होता. त्यामुळे कल्याणमधील उमेदवार ठरत नव्हता. मात्र, आता स्वतः फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेंचं महायुतीचे उमेदवार असणार असल्याही घोषणा करत हा तिढा संपवला आहे.
श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत होणार आहे. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. तर दुसरीकडे वैशाली दरेकर यांचा कोणताही मोठा राजकीय वारसा नाही. त्यामुळे येथे मुख्यमंत्र्यांचे पुत्र विरुद्ध एक सामान्य कार्यकर्ता अशी लढत घडवून आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जाणार आहे. त्यामुळ या जागेवर आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
श्रीकांत शिंदे यांती कारकीर्द
शिवसेनेमधून 2014 साली राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना 5 लाख 59 हजार 723 मतं मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना 2 लाख 15 हजार 380 मतं मिळाली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे 3 लाख 44 हजार इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा पराभव केला होता.
हे ही वाचा :