Kolhapur Election 2026 कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं, काँग्रेसची टॅगलाईन, सतेज पाटलांनी मनपासाठीचा प्लॅन सांगितला!
Kolhapur Municipal corporation Election 2026 : कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं! ही टॅगलाईन आज प्रसिद्ध करण्यात आली. काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या हस्ते ही टॅगलाईन प्रसिद्ध करण्यात आली.

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 साठी (Kolhapur Municipal corporation Election 2026) काँग्रेस अखेर मैदानात उतरली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्यावतीने कॅम्पेन टॅगलाईन (Kolhapur congress tagline ) प्रसिद्ध केली आहे. कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं! ही टॅगलाईन आज प्रसिद्ध करण्यात आली. काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या हस्ते ही टॅगलाईन प्रसिद्ध करण्यात आली. पत्रकार परिषद घेऊन सतेज पाटील यांनी काँग्रेस आणि मविआची भूमिका मांडली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तसं' या मजकुराचे असंख्य होर्डिंग्ज सध्या कोल्हापूरमध्ये झळकत आहेत. कोल्हापूर शहरात प्रवेश केल्यापासून ते शहरातील मुख्य चौकांमध्ये भले मोठे होर्डिंग्ज पाहायला मिळत आहेत. या होर्डिंग्जवर कोणत्याही नेत्याचा फोटो नाही किंवा कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता. त्यामुळे हे होर्डिंग्ज कुणी उभा केले, असा प्रश्न आज सकाळपासून कोल्हापुरात चर्चेत होता. अखेर काँग्रेस नेत्यांच्या पत्रकार परिषदेनंतर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
सतेज पाटील काय म्हणाले? (Satej Patil PC)
कोल्हापूर म्हणल तसं कोल्हापूर आम्ही तयार करणार आहोत. कोल्हापूर कसं तर तुम्ही म्हणशीला तसं!! ही टॅगलाईन आम्ही घेऊन आलो आहोत. कोल्हापुरातील नागरिकांकडून आम्ही सूचना मागवून घेणार आहोत. मूळचे कोल्हापूरचे असलेले पण देश-परदेशात राहणाऱ्या नागरिकांकडून देखील अपेक्षा मागून घेणार आहोत, असं सतेज पाटील यांनी सांगितलं.
400 पेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली. वॉर्डचा जाहीरनामा देखील आम्ही सादर करणार आहोत. पुढच्या सहा दिवसात लोकांकडून सूचना मागवून काँग्रेसचा जाहीरनामा लोकांसमोर ठेवणार आहे. कोल्हापूर शहराची वाताहात झाली त्यांना विद्यमान सरकार कारणीभूत आहे. त्यामुळेच आम्ही लोकांच्याकडून अपेक्षा मागून घेतल्या जाणार आहे. तुम्ही म्हणशीला तसं आम्ही कोल्हापूर बनवू ही आमची भूमिका आहे. लंडनवरून देखील मूळचे कोल्हापूरचे असलेल्या नागरिकांचे सूचना सांगणारे फोन आले, असं सतेज पाटील म्हणाले.
गेल्या पंधरा दिवसांपासून महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेसोबत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्यासोबत देखील आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार एकत्रित जाऊन उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
अजित पवारांचा सतेज पाटलांना फोन (Ajit Pawar phone called)
पुण्यामध्ये महापालिकेसाठी अजितदादा यांचा फोन आला होता याबाबत दुमत नाही. मात्र अजितदादांचा फोन कोल्हापूर किंवा इचलकरंजीसाठी आला नाही. पुण्यात महाविकास आघाडी म्हणून देखील आमचा प्लॅन तयार आहे. कोल्हापुरात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा नाही, असा दावा सतेज पाटील यांनी केला.
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तसं' होर्डिंग्ज (Kolhapur tagline )
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तसं' या मजकुराचे असंख्य होर्डिंग्ज सध्या कोल्हापूरमध्ये झळकत आहेत. कोल्हापूर शहरात प्रवेश केल्यापासून ते शहरातील मुख्य चौकांमध्ये भले मोठे होर्डिंग्ज पाहायला मिळत आहेत. या होर्डिंग्जवर कोणत्याही नेत्याचा फोटो नाही किंवा कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही .मात्र कोल्हापूर शहरातील हे होर्डिंग चर्चेचा विषय बनत आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर नवी टॅगलाईन समोर आल्याचं बोललं जातंय... याआधी कोल्हापूरने महाराष्ट्राला अनेक नवीन शब्द आणि टॅगलाईन दिल्या आहेत... त्यामध्ये आता नव्याने आणखी एका टॅगलाईनची भर पडली आहे..
महायुतीची आश्वासने लिम्का बूकमध्ये
महायुतीच्या नेत्यांनी कोल्हापूरसाठी दिलेल्या आश्वासनांची यादी पाहिली तर लिमका बुकमध्ये रेकॉर्ड होईल, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला. नागपूरसाठी वेगळ्या सवलती, रत्नागिरीसाठी वेगळ्या सवलती असतात मात्र कोल्हापूरमध्ये ते होत नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आयटी कंपन्या येत नाहीत.
मी महायुतीच्या नेत्यांना विचारणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळे नियम का? कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती सगळीकडे सारख्या दिल्या पाहिजे.
मुंबईत सर्व जागांवर लढणार (BMC Election 2026)
मुंबईत आम्ही 227 जागा लढण्याची तयारी केली आहे. मुंबईत काही छोट्या घटक पक्षांसोबत चर्चा करण्याचं काम सुरू आहे. मुंबई काँग्रेस आणि वंचित यांच्यामध्ये देखील चर्चा सुरू आहे. मुंबईला विकसित करणे ही काँग्रेसची प्राथमिकता आहे, असं सतेज पाटील यांनी सांगितलं.
कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Mahapalika Election)
● एकूण प्रभागांची संख्या : 20
● निवडून द्यावयाच्या नगरसेवकांची संख्या : 81
● 1 ते 19 प्रभागात प्रत्येक : 4 नगरसेवक
● 20 वा क्रमांक प्रभाग : 5 नगरसेवक
● एकूण मतदारांची संख्या : 4,94,711
● महिला मतदार संख्या : 2,49,000
● पुरुष मतदार संख्या : 2,44,744
Satej Patil PC LIVE : सतेज पाटील पत्रकार परिषद लाईव्ह
संबंधित बातम्या





















