Kolhapur Election 2022 Ward 26 Rankala, Saneguruji Vasahat : कोल्हापूर मनपा निवडणूक वॉर्ड 26, काळा, सानेगुरुजी वसाहत : कोल्हापूर महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 26 अर्थात रंकाळा, सानेगुरुजी वसाहत. या 26 नंबर प्रभागात नव्या प्रभागरचनेनुसार रंकाळा, राजोपाध्ये नगर, सानेगुरुजी वसाहत, शालिनी पॅलेस या परिसरातील ठिकाणांचा समावेश होतो.


आरक्षण कसं आहे?
नव्या प्रभागरचनेनुसार कोल्हापूर महापालिकेसाठी एकूण 92 प्रभाग असून त्यापैकी 46 प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रभाग क्रमांक 26 हा सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे.


विद्यमान नगरसेवक 2015 ते 2020 :
मागील निवडणुकीमध्ये या प्रभागातून प्रतिक्षा धिरज पाटील (Congress), आश्विनी अमर रामाने (Congress) आणि  गीता श्रीपती गुरव (BJP) हे नगरसेवक निवडून आले होते.


मागील निवडणुकीमध्ये म्हणजे 2015 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि ताराराणी आघाडी हे पक्ष स्वतंत्र लढले होते.


वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 


या प्रभागात हरिओम नगर परिसर, रंकाळा, राजोपाध्ये नगर, सानेगुरुजी वसाहत, शालिनी पॅलेस या परिसरातील ठिकाणांचा समावेश होतो.


राजकीय स्थिती-  


या ठिकाणी ताराराणी आघाडी म्हणजेच महाडिक कुटुंबीय आणि काँग्रेस म्हणजे सतेज पाटील गटाचे वर्चस्व 50-50 टक्के पाहायला मिळते. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये सतेज पाटील गटाने खूप मजल मारली आहे. त्यामुळे या वॉर्डांमध्ये काँग्रेसचे पारडे काहीसे उजवे आहे. मात्र राज्यसभा निवडणूक झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत संख्याबळ राखण्यास महाडिकांना यश मिळतं का हे पहावे लागणार आहे.


हे देखील वाचा -