Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये 29 जुलैपासून सुरु होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी (Commonwealth Games 2022) भारत सज्ज झाला असून आता भारताने आपल्या हॉकी संघाचीही घोषणा केली आहे. यावेळी कर्णधार म्हणून मनप्रीत सिंह (Manpreet Singh) भूमिका निभावणार असून हरमनप्रीत सिंह (Harmanpreet Singh) उपकर्णधार असणार आहे. भारतीय संघ स्पर्धेत पूल बीमध्ये इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना या देशासोबत असणार आहे. यावेळी 31 जुलै रोजी भारत पहिला सामना घाना विरुद्ध खेळून स्पर्धेची सुरुवात करेल. 



स्पर्धेसाठी 18 सदस्यीय संघाचा कर्णधार मनप्रीत असणार असून त्याच्याच नेतृत्त्वाखाली भारताने यंदा ऑलिम्पिक पदक मिळवलं. टोक्यो ओलिम्पिक 2020 (Tokyo 2022) स्पर्धेत जवळपास 40 वर्षानंतर पदकावर नाव कोरलं. कांस्य पदक मिळवलेला भारत आता या कॉमनवेल्थमध्येही अप्रतिम कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. यावेळी उपकर्णधार असणारा हरमनप्रीत सिंह एफआयएच प्रो लीगमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू असल्याने त्याच्याकडूनही संघाला अधिक अपेक्षा असणार आहेत. कॉमनवेल्थ गेम्सबद्दल बोलताना संघाचे मुख्य कोच ग्राहम रीड म्हणाले, "आम्ही कॉमनवेल्थ गेम्ससाठी एक दमदार संघ घेऊन चाललो आहोत. या सर्व खेळाडूंकडे महत्त्वाच्या सामन्यात चागंल्या खेळाचा अनुभव आहे."


कॉमनवेल्थसाठी भारतीय हॉकी टीम :


गोलकीपर : पीआर श्रीजेश आणि कृष्ण बहादुर पाठक.


डिफेंडर : वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, जुगराज सिंह आणि जरमनप्रीत सिंह.


मिडफील्डर: मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंह, आकाशदीप सिंह आणि नीलकांत शर्मा.


फॉरवर्ड : मनदीप सिंह, गुरजंत सिंह, ललित कुमार उपाध्याय आणि अभिषेक.


हे देखील वाचा-