एक्स्प्लोर

Kishor Jorgewar : महायुतीला धक्के सुरुच, एकनाथ शिंदे समर्थक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार तुतारी हाती घेण्याच्या तयारीत?

Kishor Jorgewar : चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर :  केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 29  ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळं राजकीय नेत्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत अनेक नेते प्रवेश करत आहेत. समरजीतसिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आता चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार देखील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करुन तुतारीवर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. 

कोण आहेत किशोर जोरगेवार? 

चंद्रपूर हा विधानसभा मतदारसंघ अनूसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे.  किशोर जोरगेवार हे 2019 मध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करत विजयी झाले होते.  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला होता. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन होत असताना किशोर जोरगेवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. 2019 ला किशोर जोरगेवार यांनी भाजप उमेदवाराला पराभूत केलं होतं. यावेळी महायुतीच्या जागा वाटपात ही जागा कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याचदरम्यान किशोर जोरगेवार यांची नवी भूमिका समोर आली आहे. 

तर तुतारीवर लढण्यास तयार? 

महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चंद्रपूर हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला जातो यावर किशोर जोरगेवार यांची पुढील राजकीय दिशा ठरणार आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला चंद्रपूरची जागा मिळाली तर या ठिकाणावरुन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे संकेत किशोर जोरगेवार यांनी दिले आहेत. त्यामुळं आणखी एक आमदार मविआकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम:

निवडणुकीचं नोटिफिकेशन:  22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 

अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 

मतदान  :20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी :  23 नोव्हेंबर  2024
निवडणूक प्रक्रिया समाप्त:  25 नोव्हेंबर  2024

इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget