Karnataka Election 2023: येत्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या कर्नाटकच्या विधानसभेसाठी बुधवारी मतदान होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून मतदार आपल्याकडे कसे आकर्षित होतील यावर भर देण्यात येतोय. कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या कुणाकडे द्यायच्या हे लिंगायत आणि वोक्कलिगा या समाजाचे मतदार ठरवतात हा आतापर्यंतचा इतिहास. पण त्याचसोबत कर्नाटकातील काही मतदासंघ असे आहेत की त्या ठिकाणी आमदार कोण होणार हे मराठी भाषिक मतदार ठरवतात. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात आणि त्यानंतर कारवार, बिदर, भालकी, धारवाड, हुबळी या जिल्ह्यातल्या मराठी मतदारांचा कौल महत्त्वाचं ठरतोय.
Marathi People In Karnataka : 865 मराठी गावात 42 लाख मराठी लोकसंख्या
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात असून कर्नाटकात जबरदस्तीने डांबण्यात आलेल्या 865 मराठी गावांवर महाराष्ट्राने आपला दावा सांगितला आहे. सीमाप्रश्न निर्माण झाला त्यावेळी या गावांतील लोकसंख्या ही 25 लाख इतकी असल्याचं सांगितलं जात होतं. आता या 865 मराठी गावांची लोकसंख्या ही 40 ते 42 लाख इतकी असल्याचं सांगितलं जातंय. यामध्येही संपूर्ण कर्नाटकातून जवळपास 30 लाख मराठी भाषिक मतदान करतील असा अंदाज आहे.
इतर भागांच्या तुलनेत बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांचे वर्चस्व असल्याचं दिसून येतंय. बेळगाव जिल्ह्यात एकूण 18 मतदारसंघ असून बहुतांश ठिकाणचे आमदार हे मराठी भाषिक मतदार ठरवतात. त्यामध्ये बेळगाव ग्रामीण, बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, खानापूर, निपाणी, यमकनमर्डी, चिक्कोडी, हुकेरी, कागवाड आणि अथनी जिल्ह्यामध्ये मराठी भाषकांचे प्राबल्य असून त्यांचा कौल हा निर्णायक ठरतो.
बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, खानापूर, कागवाड आणि निपाणी या मतदारसंघातील आमदार कोण हे मराठी भाषिक मतदार ठरवतात. या मतदारसंघात सुमारे 60 ते 70 टक्के मतदार हे मराठी भाषिक आहेत. त्यामुळे या ठिकाचे सर्वपक्षीय उमेदवारही मराठीच असतात. त्यानंतर यमकनमर्डी, बेळगाव उत्तर, चिक्कोडी, रायबाग, हुक्केरी या ठिकाणी मराठी मतं ही निर्णायक ठरतात.
Belgaum Election : कोणत्या मतदारसंघात किती मराठी मतदार?
- बेळगाव दक्षिण : सुमारे दीड लाख (एकूण अडीच लाख)
- बेळगाव उत्तर : सुमारे 80 हजार (एकूण सव्वा दोन लाख)
- बेळगाव ग्रामीण : सुमारे सव्वा लाख (एकूण अडीच लाख)
- खानापूर: सुमारे दीड लाख ( एकूण सव्वा दोन लाख)
- निपाणी : सुमारे सव्वा लाख (एकूण अडीच लाख)
- यमकनमर्डी: सुमारे 50 हजार (एकूण सव्वा दोन लाख)
या व्यतिरिक्त भालकी आणि कारवार हे मतदारसंघ मराठी भाषिकांचे असल्याचं सांगण्यात येतंय. कारवार जिल्ह्यात चार मतदारसंघात आमदार कोण हे मराठी भाषिक मतदार ठरवतात. तर बिदर जिल्ह्यातील चार, गुलबर्गा जिल्ह्यात चार मतदारसंघावर मराठी भाषिकांचे वर्चस्व आहे. हावेरी, हसन या जिल्ह्यांत आणि बंगळुरुमध्येही मराठी भाषिक मतदार निर्णायक ठरतात.
सीमा भागातील मराठी मतांचं प्राबल्य असणारे महत्त्वाचे मतदारसंघ
1. खानापूर
- डॉ. अंजली निंबाळकर- काँग्रेस
- मुरलीधर पाटील- म.ए.समिती
- विठ्ठल हलगेकर- भाजप
2. बेळगाव दक्षिण
- रमाकांत कोंडुस्कर- म.ए.समिती
- अभय पाटील- भाजप
3. बेळगाव उत्तर
- असिफ उर्फ राजू शेठ- काँग्रेस
- डॉ. रवी पाटील- भाजप
- अमर येळ्ळूरकर- म.ए.समिती
4. बेळगाव ग्रामीण
- लक्ष्मी हेब्बाळकर- काँग्रेस
- नागेश मन्नोळकर- भाजप
- आर एम चौगले- म.ए.समिती
5. यमकनर्डी
- सतीश जारकोहोळी- काँग्रेस
- बसवराज हुंदरी - भाजप
- मारुती नाईक- म.ए.समिती
6. निपाणी
- शशिकला जोल्ले- भाजप
- काकासाहेब पाटील- काँग्रेस
- उत्तम पाटील- राष्ट्रवादी
- जयराम मिरजकर- म.ए.समिती
7. कागवाड
- श्रीमंत पाटील- भाजप
- राजू कागे- काँग्रेस
8. आरभावी
- भालचंद्र जारकिहोळ- भाजप
- अरविंद दळवाई- काँग्रेस
9. अथणी
- लक्ष्मण सवदी (माजी उपमुख्यमंत्री) भाजप बंडखोर -काँग्रेस
- महेश कुमठोळे- भाजप
10. रायबाग
- दुर्योधन ऐहोळे (भाजप)
- महावीर मोहिते (काँग्रेस)
- प्रदीपकुमार माळगी (धजद)
11. कुडची
- पी. राजीव - (भाजप)
- महेंद्र तम्मण्णावर - (काँग्रेस)
- आनंद माळगी - (धजद)
12. हुक्केरी
- निखिल कती (भाजप)
- ए. बी. पाटील (काँग्रेस)
- बसवराज पाटील (धजद)
13. कागवाड
- श्रीमंत पाटील (भाजप)
- राजू उर्फ भरमगौडा कागे (काँग्रेस)
- मुल्ला रझाक दस्तगीरसाब (आप)
- मल्लिकार्जुन गुंजीगावी (धजद)
14. कित्तूर
- महांतेश दोडगौडर (भाजप)
- बाबासाहेब पाटील (काँग्रेस)
- अश्विनी पुजेर (धजद)
15. रामदुर्ग
- चिक्करेवण्णा (भाजप)
- अशोक पट्टण (काँग्रेस)
- प्रकाश मुधोळ (धजद)
- सुनंदा हडपद (बसप)
16. सौंदत्ती यल्लम्मा
- रत्ना मामणी (भाजप)
- विश्वास वैद्य (काँग्रेस)
- सौरभ चोप्रा (धजद)
17. चिक्कोडी-सदलगा
- गणेश हुक्केरी (काँग्रेस)
- रमेश कत्ती (भाजप)
- अर्जुन माने (बसप)
18. गोकाक
- रमेश जारकीहोळी (भाजप)
- डॉ. महांतेश कडाडी (काँग्रेस)
- जगदीश सी. के. (सोशॅलिस्ट पार्टी)
- जे. एम. करेप्पगोळ (आप)
ही बातमी वाचा: