एक्स्प्लोर

Karnataka Election 2023 Dates : कर्नाटकात 10 मे रोजी मतदान, 13 मे रोजी निकाल; विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Karnataka Election 2023 Dates : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (29 मार्च) कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार

Karnataka Election 2023 Dates : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज (29 मार्च) कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Assembly Election 2023) घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे. राज्यात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे.

कर्नाटकात 9.17 लाख नवे मतदार : मुख्य निवडणूक आयुक्त 

कर्नाटकात 2018-19 मध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 9.17 लाखांनी वाढली आहे. 1 एप्रिलपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करु शकतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख  - 20 एप्रिल 2023
  • उमेदवारी अर्ज छाननी तारीख - 21 एप्रिल 2023
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख - 24 एप्रिल 2023
  • मतदानाची तारीख -10 मे 2023
  • मतमोजणीची तारीख - 13 मे 2023

कर्नाटक विधानसभा 24 मे रोजी विसर्जित होणार

दरम्यान 2018 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम 27 मार्च रोजी जाहीर झाला होता. यंदा आज म्हणजेच 29 मार्च रोजी तारखा जाहीर झाल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे.

2018 च्या निवडणुकीचा निकाल?

कर्नाटकमध्ये 2018 च्या विधानसभा  निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. भाजपने 224 जागांपैकी 104 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 80 जागा आणि जेडीएसने 37 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या आमदारांनी बंड केलं आणि भाजपमध्ये सामील झाले. कर्नाटकात सध्या भाजपकडे 119 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 75, तर मित्रपक्ष जेडीएसकडे एकूण 28 जागा आहेत.

काँग्रेसकडून 124 उमेदवारांची यादी जाहीर

दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकतीच 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये वरुणा विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच या यादीत बहुतांश जुने चेहरे काँग्रेसने कायम ठेवले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Embed widget