Karnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आली असून काँग्रेसने बेळगावमध्येही मुसंडी मारल्याचं दिसून येतंय. बेळगावच्या 18 मतदारसंघाचं चित्र आता स्पष्ट झालं असून काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे 11 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने सात जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा जिंकता आली नाही. 


बेळगावमध्ये कुणाचे किती आमदार? 



  • काँग्रेस- 11

  • भाजप- 7

  • इतर – 0

  • एकूण- 18


1. कागवाडमधून काँग्रेसचे राजू कागे यांचा विजय, भाजपचे श्रीमंत पाटील यांचा पराभव.


2. यमकनमर्डीतून काँग्रेसचे सतीश जारकीहोळ यांचा विजय,भाजपचे बसवराज हुंदरी आणि महाराष्ट्र एकिकरण समितीचे मारुती नाईक यांचा पराभव.


3. बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विजय, भाजपचे नागेश मन्नोळकर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे आर एम चौगले यांचा पराभव.


4. निपाणीमधून भाजपच्या शशिकला जोल्ले यांचा विजय, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उत्तम पाटील पिछाडीवर, म.ए.समितीचे जयराम मिरजकर यांचा पराभव.


5. खानापूरमधून भाजपचे विठ्ठल हलगेकर विजयी, काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर आणि मुरलीधर पाटील यांचा पराभव.


6. बेळगाव दक्षिणमधून भाजपचे अभय पाटील विजयी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडूसकर यांचा पराभव. 


7. अथणीमधून (माजी उपमुख्यमंत्री) काँग्रेसचे लक्ष्मण सवदी यांचा विजय, भाजपचे महेश कुमठोळे यांचा पराभव.


8. गोकाक मतदार संघात भाजपचे रमेश जारकीहोळ यांचा विजय, काँग्रेसचे मानतेश कडाडी यांचा पराभव. 


9. बेळगाव उत्तरमधून काँग्रेसचे राजू शेठ यांचा विजय, भाजपचे डॉ.रवी पाटील आणि म.ए.समितीचे अमर येळ्ळूरकर यांचा पराभव.


10. रायबागमधून भाजपचे दुर्योधन ऐहोळे यांचा विजय, काँग्रेसचे महावीर मोहिते यांचा पराभव.


11. आरभावी मतदारसंघातून भाजपचे भालचंद्र जारकीहोळ यांचा विजय,  अपक्ष उमेदवार भिमप्पा गुंडप्पा गदद आणि काँग्रेसचे अरविंद दळवाई यांचा पराभव आघाडीवर.


12. कित्तूरमध्ये काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांचा विजय, भाजपचे महांतेश दोडगौडर यांचा पराभव.  


13. सौंदत्ती मतदार संघत काँग्रेसचे विश्वास वैद्य यांचा विजय, भाजपचे रत्ना मामनी यांचा पराभव.


14. हुक्केरीमध्ये भाजपचे निखिल काती विजयी, काँग्रेसचे ए. बी. पाटील यांचा पराभव .


15. कुडचीमधून काँग्रेसचे महेंद्र तम्मणवर विजयी, भाजपचे पी राजीव यांचा पराभव.


16. चिक्कोडी- सदलगामधून काँग्रेसचे गणेश हुक्केरी यांचा विजय, भाजपचे रमेश कत्ती यांचा पराभव.


17. बैलहोंगलमधून काँग्रेसचे महांतेश कौजलगी विजयी, भाजपचे जगदीश मेटगुड यांचा पराभव.


18. रामदुर्गमधून काँग्रेसचे अशोक पट्टण यांचा विजय, भाजपचे चिक्करेवण्णा यांचा पराभव .


या संबंधित बातम्या वाचा: