Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली आणि चर्चा सुरू झाली ती मुख्यमंत्रीपदाची. या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वाधिक आघाडी घेतली आहे ती म्हणजे डीके शिवकुमार यांनी. काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख असलेले डीके शिवकुमार हे आता कनकपुरा मतदारसंघातून सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 


डीके शिवकुमार सध्या कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे नेते आहेत. त्यांच नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असून त्यासाठी त्यांची थेट सिद्धरामय्या यांच्याशी लढत आहे. डीके शिवकुमार हे राजकारणी असण्यासोबतच एक शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. 2006 मध्ये कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी म्हैसूर येथून त्यांनी राज्यशास्त्रातील मास्टर ऑफ आर्ट्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.


Congress CM Candidate DK Shivakumar : कनकपुरा मतदारसंघातून सातव्यांदा आमदार


यावेळीही ते त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ कनकपुरा येथून निवडणूक लढवत होते. पारंपारिक जागा कारण ते येथून ते आता नवव्यांदा आमदार झाले आहेत. कनकपुरा येथे ते भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री असलेले आर अशोक त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. त्यांचा डीके शिवकुमार यांनी पराभव केला.


Who is DK Shivakumar : काँग्रेसचे संकटमोचक


डीके शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात श्रीमंत नेते आहेत. त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्याकडे 840 कोटींहून अधिक संपत्ती आहे. जेव्हा-जेव्हा काँग्रेस पक्षाला निधीची गरज भासते, तेव्हा शिवकुमार तिथे उभे राहतात. म्हणजेच ते पक्षासाठी एकप्रकारे संकटमोचकाची भूमिका बजावत आहेत. मात्र त्यांची सध्या सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे.  निवडणुकीपूर्वी ते 104 दिवस तुरुंगात होते. आता ते जामिनावर बाहेर आले आहेत.


कोण आहेत डीके शिवकुमार?


- कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.
- काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख.
- सात टर्म आमदार.
- 2013 ला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत.
- देशातल्या सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक.
- अहमद पटेलांच्या राज्यसभा विजयात मोठा वाटा.
- 2018 साली सरकार वाचवण्यात मोठी भूमिका.
- संघटन कौशल्यामुळे देशात चर्चेत.
- 2019 भ्रष्टाचारप्रकरणी अटक.
- मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार.


या संबंधित बातम्या वाचा :