Khatron Ke Khiladi 13: 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke khiladi) हा छोट्या पडद्यावरील धमाकेदार रिअॅलिटी शो आहे. खतरों के खिलाडीचे 13 वे (Season 13) पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. 'जय हो' आणि 'रेस 3' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री 'डेजी शाहा' ही देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच ती या स्पर्धेतील सर्वात जास्त मानधन घेणारी स्पर्धक असल्यांच म्हटलं जात आहे.
वृत्तानुसार, डेजी शाहाने मानधनाच्या बाबतीत शिव ठाकरेलाही मागे टाकले आहे. तर डेजीला शिवच्या दुप्पट मानधन मिळाले असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहे. या अभिनेत्रीला प्रति एपिसोड पंधरा लाख रुपयांचे मानधन मिळणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. तर 'शिव ठाकरे'ला प्रति एपिसोड सहा लाख रुपयांचं मानधन मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच यांच्याशिवाय रोहित रॉयला सात लाख रुपये आणि नायरा बॅनर्जीला सहा लाख रुपयांचे मानधन मिळणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
डेजी शाहा सर्वात जास्त मानधन घेणारी स्पर्धक
खतरों के खिलाडी या कार्यक्रमात डेजी शाहा ही सर्वात जास्त मानधन घेणारी स्पर्धक आहे. तसेच या पर्वासाठी ती खूप उत्सुक असल्याचं तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे डेजीच्या चाहत्यांना देखील या पर्वाची चांगलीच उत्सुकता लागून राहिली असल्याचं म्हटलं जात आहे.
खतरों के खिलाडीचं 13 वं पर्व लवकरच सुरु होणार
खरंतर 'खतरों के खिलाडी'चं 13 (Khatron Ke Khiladi 13) नवं पर्व कधी सुरु होणार ही चर्चा या कार्यक्रमाच्या चाहत्यांमध्ये सध्या सुरु आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच रोहित शेट्टी (Rohit Shetty) सूत्रसंचालन करत असलेला 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमामध्ये सहभागी होणर असल्याची माहिती अनेक कलाकारंनी दिली आहे.' स्प्लिट्सविला 14'चा विजेता सौन्दूस मौफकीर, 'बिग बॉस 16'चा उपविजेता शिव ठाकरे, अर्चना गौतम, रोहित रॉय, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी, अरिजित तनेजा, नायरा बॅनर्जी, डेझी शाह या कलाकारांची नावे या यादीत आहेत.