एक्स्प्लोर

Karnataka Election : कर्नाटकात भाजपला पहिला धक्का, तिकीट नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा पक्षाचा राजीनामा

Karnataka Assembly Election 2023 : बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. 

बंगळुरु : कर्नाटक विधानसभेसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि पक्षाला पहिला मोठा धक्का बसला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांनी भाजपच्या विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पारंपरिक मतदारसंघ अथणी या ठिकाणाहून सवदी यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललं आहे. सवदी यांचा राजीनामा हा बेळगाव भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. सवदी यांच्या जागी भाजपने महेश कुमठल्ली यांना तिकीट दिलं आहे.

लक्ष्मण सवदी हे भाजपचे जेष्ठ नेते असून ते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शुक्रवारी सकाळी बंगळुरु पक्ष कार्यालयात जाऊन ते प्रदेश उपाध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. दुपारी ते विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरत्ती यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा सादर करतील.

भाजपच्या विविध नेत्यानी सातत्याने आपला अपमान केला आणि अनेक वर्षांपासून आपण तो सहन करत असल्याचं लक्ष्मण सवदी म्हणाले. विधानसभा निवडणुकीत पक्षाने आपल्याला तिकीट दिले नाही म्हणून भाजप सोडतोय असं काही नाही असं स्पष्ट करत ते म्हणाले की, मी यापुढे अपमान सहन करू शकत नाही म्हणून मी राजीनामा देत आहे.

आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना लक्ष्मण सवदी म्हणाले की, "मी आतापर्यंत शांतपणे सर्व अपमान सहन केले, कारण मला भाजपबद्दल खूप आदर आहे. मी भाजपला माझी आई मानत असून  एक दिवस आई आपल्या मुलाचे सांत्वन करेल असं मला आशा होती. पण तसं काही झालं नाही. मी पक्ष सोडत नाही तर मला तो सोडायला भाग पाडलं जात आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे."

विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी आपला पराभव करण्याचा कट रचला होता. भाजपकडे 126 मते आहेत. पण काही नेत्यांनी जनता दल (धर्मनिरपेक्ष) उमेदवाराशी हातमिळवणी केली आणि काही आमदारांचे क्रॉस व्होटिंग केले असा आरोप लक्ष्मण सवदी यांनी केला. 

काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच याबाबत इशारा दिला होता, असं सवदी म्हणाले. ते म्हणाले की काँग्रेस नेत्यांनी मतदान टाळले म्हणून मी परिषद निवडणुकीत जिंकलो.

नुकत्याच झालेल्या विजय संकल्प यात्रेच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपला अपमान केल्याचा आरोप लक्ष्मण सवदी यांनी केला. 

2018 साली विधानसभेला पराभूत 

लक्ष्मण सवदी यांचा अथनी या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार महेश कुमठल्ली यांनी पराभव केला होता. त्यानंतर महेश कुमठल्ली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Embed widget