Gyayak Patni, कारंजा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यादीमधून 9 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे कारंजातील युवा नेते ज्ञानक पाटणी यांनी शनिवारी (दि.27) भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना कारंजा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या नातेवाईक असलेल्या सई डहाके यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यानंतर शरद पवारांनी तरुण तुर्क असलेल्या ज्ञानक पाटणी यांना मैदानात उतरवले आहे. 


कोण आहेत ज्ञायक पाटणी ?


ज्ञायक पाटणी हे कारंजाचे दिवंगत माजी आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुपूत्र आहेत. राजेंद्र पाटणी हे 2004, 2014 आणि 2019 असे तीनदा कारंजाचे आमदार झाले होते. पाटणी आधी शिवसेनेत होते नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ज्ञानक हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे.वडिल आजारी असल्यापासून ज्ञायक राजकारणात सक्रिय झाले होते. वडिलांच्या निधनानंतर कारंजा मतदारसंघात भाजपची धुरा सांभाळली. मात्र, कारंजा मतदारसंघात भाजपने ऐनवेळी दिलीप वळसे पाटील यांच्या नातेवाईक असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील सई डहाके यांना उमेदवारी दिल्याने ज्ञायक यांनी शरद पवार गटात काल प्रवेश केला.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी


1. कारंजा - ज्ञायक पाटणी
2. हिंगणघाट - अतुल वांदिले
3. हिंगणा - रमेश बंग
4. अणुशक्तीनगर - फहाद अहमद
5. चिंचवड - राहुल कलाटे
6. भोसरी - अजित गव्हाणे
7. माजलगाव - मोहन बाजीराव जगताप 
8. परळी - राजेसाहेब देशमुख 
9. मोहोळ - सिद्धी रमेश कदम


मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात देखील शरद पवारांनी मोठी खेळी आहे. शरद पवारांनी परळीमध्ये मराठा कार्ड खेळत राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे वरळीच्या लढतीतही चुरस निर्माण होणार आहे. 


कोण आहेत राजेसाहेब देशमुख ? 


- मागील अनेक वर्षांपासून ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सक्रिय काम करत आहेत 
- स्वर्गीय विमल मुंदडा त्यांचे समर्थक म्हणून ओळखले जायचे 
- जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण सभापती पद भूषविले आहे 
- मागील अनेक वर्षांपासून ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत
- लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पाहायला मिळाला त्यात जरांगे फॅक्टर आघाडीवर होता 
- लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे संघर्ष पाहायला मिळाला
- परळी मतदारसंघ मराठा बहुल आहे त्यामुळे राजेसाहेब देशमुख यांचे वैयक्तिक संबंध आहेत


इतर महत्त्वाच्या बातम्या 


नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार