Babar Azam dropped from Pakistan squad for Zimbabwe Tour : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अलीकडेच आपला स्टार खेळाडू बाबर आझमला इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतून वगळले होते. आता पुन्हा एकदा पीसीबीने बाबरला वगळले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या संघात त्याची निवड झालेली नाही. त्याच्या जागी कामरान गुलामला पुन्हा एकदा पाकिस्तान संघात स्थान देण्यात आले आहे.  


पाकिस्तान क्रिकेट संघ निवड समितीने (PCB) आगामी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यांमध्ये पाकिस्तान संघ प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणार आहे. पाकिस्तान संघ 4 ते 18 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे, तर सामने 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान झिम्बाब्वेच्या बुलावायो येथे खेळवले जातील. या संघांचा कर्णधार कोण असेल हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ठरवलेले नाही. हे नंतर जाहीर केले जाईल. पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बाबर आझमला या संघातून वगळण्यात आले आहे.


बाबर आझम, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांसाठी तो परतला, पण झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली. त्याचप्रमाणे मोहम्मद रिझवान हा ऑस्ट्रेलिया सामने आणि झिम्बाब्वे वनडेसाठी उपलब्ध असेल, पण त्याला झिम्बाब्वे ट्वेंटी-20 साठी विश्रांती देण्यात आली आहे. अनकॅप्ड वनडे खेळाडूंमध्ये अमीर जमाल, अराफत मिन्हास, फैसल अक्रम, हसिबुल्लाह, मुहम्मद इरफान यांचा समावेश आहे.


अनेक खेळाडूंना पहिल्यांदाच मिळाली संधी


बाबर आझम व्यतिरिक्त इतर खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, जहांदाद खान आणि सलमान अली आगा यांनी प्रथमच टी-20 संघात संधी मिळाली आहे. कामरान गुलाम, उमर बिन युसूफ आणि सुफियान मोकीम यांचेही राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -
ODI संघ : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफात मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हरिस रौफ, हसिबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी.


टी-20 संघ : अराफत मिन्हास, बाबर आझम, हारिस रौफ, हसिबुल्लाह, जहांदद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, ओमेर बिन युसूफ, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मोकीम, उस्मान खान.


झिम्बाब्वे दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -
ODI संघ : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अहमद डॅनियल, फैसल अक्रम, हरिस रौफ, हसीबुल्लाह, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान, मोहम्मद इरफान खान, सईम अयुब, सलमान अली आगा, शाहनवाज डहानी आणि तय्यब ताहिर


टी-20 संघ : अहमद दानियाल, अराफत मिन्हास, हारिस रौफ, हसिबुल्लाह, जहांदद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, सुफियान मोकीम, तय्यब ताहिर आणि उस्मान खान


हे ही वाचा -


Pakistan Cricket : कर्णधार विना पाकिस्तान जाणार विदेशी दौऱ्यावर; 1-2 नाही तर 4 संघाची केली घोषणा