Raj Thackeray :  आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024) राज्यात रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्षातील काही जागांसाठीच्या निवडणुका या अत्यंत प्रतिष्ठेच्या असणार आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीमच्या मैदानातून उतरवलं आहे. त्यातच याच मतदारसंघाकडून शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांकडूनही उमेदवार देण्यात आलाय. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. 


याचसगळ्या दरम्यान राज ठाकरे यांना नुकतच कुणाल विजयाकर यांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या आणि एकमेव निवडणुकीचा किस्सा सांगितला आहे. विशेष म्हणजे कुणाल विजयाकर हे राज ठाकरेंचे कॉलेजमधले मित्र आणि या दोघांनीच एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक लढवली होती. 


'आयुष्यात फक्त एकदाच निवडणूक लढवली'


या मुलाखतीदरम्यान अमित ठाकरेही राज ठाकरेंसोबत होते. त्यावेळी राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना हा किस्सा सांगताना म्हटलं की,' माझ्या आयुष्यात मी कधीच निवडणूक लढवली नव्हती, फक्त एकदाच निवडणूक लढवली.ते पण कॉलेजमध्ये , क्लास रिप्रेझेंटेटिव्हसाठी आणि त्यामध्ये जे दोन एकमेकांसमोर उमेदवार होते, ते म्हणजे हा आणि मी होतो.. त्यावर कुणाल विजयाकर यांनी मिश्लिकपणे म्हटलं की, म्हणजे राजने जी एकमेव निवडणूक लढवली ती काँग्रेस किंवा भाजपविरोधात नव्हती तर ती माझ्याविरोधात होती. त्या निवडणुकीत राज जिंकलाही होता.'      


माहिमच्या मतदारसंघाकडे साऱ्यांचं लक्ष


राज्यातील महत्त्वाच्या लढतींपैकी माहिमची लढत आहे. आदित्य ठाकरेंनी जेव्हा 2019 मध्ये पहिल्यांदा वरळीतून निवडणूक लढवली त्यावेळी राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंविरोधात कोणताही उमेदवार दिला नव्हता.पण आता अमित ठाकरे जेव्हा माहिमच्या मैदानात उतरले आहेत, त्यावेळी ठाकरे गटाकडून मात्र महेश सावंत यांना रिंगणात उतरवण्यात आलंय. तसेच दुसरीकडे महायुतीकडून शिंदे गटाने सदा सरवणकरांना ही उमेदवारी दिली आहे. म्हणून आता अमित ठाकरेंसाठी राज ठाकरे काय रणनिती आखणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागून राहिली आहे. 






ही बातमी वाचा : 


Dilip Prabhavalkar : दिलीप प्रभावळकरांच्या 'पत्रापत्री'चा रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये प्रयोग, म्हणाले, 'त्या दिवसाचा प्रयोग...'