एक्स्प्लोर
केज विधानसभा | मुंदडांचा वारसा पुढे नेणार का? लढतीकडे राज्याचे लक्ष
1962 पासून आतापर्यंत म्हणजे एकूण तेरा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पाच वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसने चार वेळा आणि भाजपने तीन वेळा तर अपक्षाने एक वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. 1990 पासून 2009 पर्यंत या मतदारसंघातून विमल मुंदडा या दोन वेळा भाजपकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस करून सलग पाच वेळा निवडून गेल्या होत्या.
राज्यातील एक महत्वाचा आणि बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. 1962 पासून आतापर्यंत म्हणजे एकूण तेरा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पाच वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसने चार वेळा आणि भाजपने तीन वेळा तर अपक्षाने एक वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. 1990 पासून 2009 पर्यंत या मतदारसंघातून विमल मुंदडा या दोन वेळा भाजपकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस करून सलग पाच वेळा निवडून गेल्या होत्या.
2012 साली डॉक्टर विमल मुंदडा यांचे दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्या नंतर झालेल्या केज विधानसभेच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज साठे यांना निवडणुकीमध्ये उतरवलं आणि या निवडणुकीमध्ये 2012 साली पृथ्वीराज साठे हे मुंदडा गटाकडून केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले.
2012 सालि झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पृथ्वीराज साठे यांना 85 हजार 750 मतं मिळाली तर भाजपाच्या संगीता ठोंबरे यांना 77 हजार 444 मते मिळाली. पेशाने शिक्षिका असलेल्या संगीता ठोंबरे यांच्यासाठी या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ नवीन होता. मात्र त्यांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये 77 हजार मते मिळवली. या दरम्यान विमला मुंदडा यांच्या अकाली मृत्यूनंतर तयार झालेली सहानभूती असतानाही संगीता ठोंबरे यांनी मात्र पृथ्वीराज साठे यांना कडवी झुंज दिली.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी
सलग पाच वेळा आमदारकी घरात असलेल्या मुंदडा कुटुंबीयांसाठी 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून मात्र आमदारकी पासून फारकत घ्यावी लागली. कारण 2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संगीता ठोंबरे या भाजपकडून पुन्हा एकदा उमेदवार म्हणून पुढे आल्या. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडून विमल मुंदडा यांच्या सुनबाई आणि अक्षय मुंदडा यांच्या पत्नी नमिता मुंदडा यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले होते.
2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या संगीता ठोंबरे यांना एक लाख सहा हजार 834 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवख्या उमेदवार असलेल्या नमिता मुंदडा यांना 64113 मतं मिळाली. दुसर्यांदा विधानसभा निवडणूक लढविणार्या संगीता ठोंबरे या केज विधानसभा मतदारसंघातून तब्बल चाळीस हजार मतांनी निवडून आल्या.
केज विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख 55 हजार 278 मतदार आहेत. यात 1 लाख 86 हजार 316 पुरुष तर 1 लाख 68 हजार 962 महिला मतदार आहेत.
विकासकामं प्रलंबित
केज विधानसभा मतदारसंघांमध्ये अंबाजोगाई आणि केज या दोन मोठ्या शहरांचा समावेश होतो, तुलनेने मोठ्या असलेल्या अंबाजोगाई शहरातले प्रश्न मात्र मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण याच मतदारसंघात येते. केज तालुक्यातील धनेगावमध्ये असलेल्या मांजरा धरणाच्या पाण्याचा सगळ्यात जास्त फायदा हा लातूर जिल्ह्याला होतो. या धरणामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांचे प्रश्न तर अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेतच याशिवाय हे धरण जवळ असतानाही या परिसरातील गावांना मात्र पाण्यासाठी कायमच मोठा संघर्ष करावा लागतो. या प्रश्नाविषयी लोकप्रतिनिधी उदासीन पाहायला मिळतात. अंबाजोगाई शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी बुट्टेनाथ साठवण तलावाची मागणी अनेक दिवसांपासून होते आहे. मात्र ही मागणी आणखी प्रलंबितच आहे.
मागच्या अनेक वर्षापासून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी केली जाते मात्र या संदर्भामध्ये ठोस उपाययोजना झालेली नाही.
चौसाळा केज आणि बीडमध्ये विलीन
सन 2009 पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये एकूण सात विधानसभा मतदारसंघ होते. मात्र त्यानंतर विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ कमी झाला. तो मतदारसंघ होता चौसाळा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातील काही गावांचा समावेश केज विधानसभा मतदार संघात करण्यात आला. तर उर्वरित काही गावं ही बीड विधानसभा मतदारसंघात आली. त्यामुळे सात विधानसभा मतदारसंघाचा असलेला बीड जिल्हा हा 2009 नंतर मात्र सहा विधानसभा मतदारसंघाचा झाला.
हाबाडाफेम बाबुराव आडसकर
याच केज विधानसभा मतदारसंघातील एक आमदाराला मात्र लोक आणि राजकीय नेते आणखी विसरले नाहीत ते नाव म्हणजे बाबुराव आडसकर. आपल्या पिळदार मिशांमुळे बाबूराव आडसकर यांची छबी महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाबदार नेत्यांपैकी एक अशी झाली होती. त्याबरोबर आडसकरांनी 1972 मध्ये जनता दलाच्या बापूसाहेब काळदाते यांचा पराभव केला होता आणि ते काँग्रेसकडून 38 हजार 416 मतांनी याच केज विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्या काळातील राजकारणातील चर्चेतील मोठं नाव असलेल्या बापूसाहेब काळदाते यांचा पराभव करणारे आडसकर अशी ख्याती बाबूरावांची राहिली. याच बाबूराव आडसकर यांची ओळख 'हाबाडा' फेम अशीही आहे.
विमल मुंडदांच्या मंत्रिपदाच्या काळातील काही कामे आजही दिमाखात
पाच टर्म आमदार राहिलेल्या विमल मुंदडा या आघाडी सरकारमध्ये दहा वर्ष कॅबिनेट मंत्री होत्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या एकमेव महिला मंत्री होत्या. याच मंत्रिपदाच्या काळात मुंदडा यांनी अंबाजोगाई शहरामध्ये जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असलेली पायाभूत आणि जिल्हा पातळीवरच्या कार्यालयाच्या इमारती उभ्या केल्या. त्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय त्यासोबतच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या कार्यालयांना इमारती आज उभ्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य मंत्री असताना मुंदडा यांनी राज्यातील पहिले स्त्री रुग्णालय याच मतदारसंघातल्या नेकनूर मध्ये सुरू केले आहे.
केजमधून लोकसभेला भाजपला वीस हजार मताधिक्य
केज विधानसभा मतदार संघात प्रीतम मुंडे यांना 1 लाख 16 हजार तर होमपिच असलेल्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना 95 हजार 293 मतं पडली. म्हणजेच लोकसभा निवडणुकीत केज विधानसभा मतदारसंघात भाजपाला वीस हजार मतांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे राखीव असलेल्या केज विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तब्बल एकवीस हजार मतं मिळाली.
जातीय समीकरण
केज विधानसभा मतदारसंघांमध्ये वंजारी समाजाचे मतदान हे निर्णायक असते जवळपास 80 हजार मतदान हे वंजारी समाजाचे आहे. तर एक लाखांपेक्षाही जास्त मतदान हे मराठा समाजाचे आहे. त्या खालोखाल 45 हजार मतदान हे मुस्लीम समाजाचं आहे. यासोबतच 50 हजार मतदान हे इतर मागासवर्गीय समाजाचे आहे.
अशी लढत होण्याची शक्यता
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये केज विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसऱ्यांदा नमिता मुंदडा या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील भाजपकडून संगीता ठोंबरे यांच्याच नावाची चर्चा पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी सुद्धा बहुजन वंचित आघाडीकडे तिकिटासाठी मागणी केली आहे. म्हणून आगामी विधानसभेसाठी नमिता मुंदडा, संगीता ठोंबरे आणि पृथ्वीराज साठे यांच्यामध्येच लढत होईल अशी शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement