एक्स्प्लोर

Eknath Shinde : 'हा गुन्हा असेल तर मी हजार वेळा करायला तयार' ऐन निवडणुकीत सीएम एकनाथ शिंदेंकडून नेमकं आव्हान कोणाला?

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ल्यात मंगेश कुडाळकर आणि अंधेरी पूर्व येथे मुरजी पटेल यांच्या सभा घेतल्या. दोघांना पराभूत करणे केवळ अवघडच नाही तर अशक्य असल्याचे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी (MVA) 'महा वसुली आघाडी' असल्याची टीका केली आहे. 'लाडकी बहिण योजने'सह महायुती सरकारच्या इतर कामांची यादी सांगत शिंदे यांनी महायुतीचे सरकार जनहितासाठी काम करत असल्याचा दावा केला. नोव्हेंबरसाठी जाहीर केलेली रक्कम भगिनींच्या खात्यात जमा झाली असून डिसेंबर महिन्याची रक्कमही निवडणुकीनंतर लवकरात लवकर वितरित केली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे यांनी कुर्ल्यात मंगेश कुडाळकर आणि अंधेरी पूर्व येथे मुरजी पटेल यांच्यासाठी सभा घेतल्या. कुडाळकर आणि मुरजी पटेल यांना पराभूत करणे केवळ अवघडच नाही तर अशक्य असल्याचे शिंदे म्हणाले. आपले सरकार मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यात व्यस्त आहे. त्यासाठी गरिबांना परवडणारी घरे दिली जात आहेत. महायुती सरकारच्या काळात मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल झाल्याचा दावा त्यांनी केला.

'असा गुन्हा मी हजारवेळा करेन' 

'लाडकी बहिण योजने'बद्दल माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ही केवळ सोशल मीडियावरील घोषणांवर केंद्रित असलेली योजना नाही. महिलांना आर्थिक मदत करण्याचा सरकारचा मानस आहे. अशा योजना सुरू करणे हा गुन्हा असेल तर मी हजारवेळा असे गुन्हे करायला तयार आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत एकनाथ शिंदे यांनी विचारले की, गरीब शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? फक्त चांदीचा चमचा घेऊन जन्मलेले नेते मुख्यमंत्री होऊ शकतात? 'लाडकी बहिण योजना' हाणून पाडण्यासाठी विरोधक कोर्टात पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "अशा दुष्ट भावांपासून सावध राहण्याची गरज आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी (उद्धव ठाकरे) एक पेनही ठेवला नाही, पण मी दोन पेन ठेवतो. महिला शिक्षण, ज्येष्ठ नागरिक यासाठी दिलेला पैसा जनतेचा आहे आणि त्यावर पहिला अधिकार त्यांचा आहे.

उद्धव ठाकरेंचे सरकार जनतेकडून पैसे उकळायचे

एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार जनतेकडून पैसे उकळायचे. काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, विरोधकांनी जनतेला अशी आश्वासने दिली, जी पूर्ण करण्याचा त्यांचा हेतूही नव्हता. राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकचा उल्लेख करत मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवर खोटी आश्वासने दिल्याचा आरोप केला.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget