एक्स्प्लोर

आय लव्ह मिस्टर नरेंद्र मोदी, राहुल गांधींच्या उत्तरानंतर सभागृहात 'मोदी...मोदी...'च्या घोषणा

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी तरुण मतदारांवर प्रत्येकाची नजर आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (5 एप्रिल) पुण्यात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. हडपसरमधील लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

पुणे : "आय लव्ह मिस्टर नरेंद्र मोदी, मला मोदींविषयी राग नाही, पण त्यांना माझ्याविषयी राग आहे," असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला. तसंच मी कामाशी लग्न केलं आहे, असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी तरुण मतदारांवर प्रत्येकाची नजर आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (5 एप्रिल) पुण्यात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. हडपसरमधील लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे शहर युवक काँग्रेस आणि स्वराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. यावेळी अनेक तरुण-तरुणींनी राहुल गांधीना अनेक प्रश्न विचारले, त्याला काँग्रेस अध्यक्षांनी दिलखुलास उत्तरं दिली. नवी दिल्ली: राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भर सभागृहात गळाभेट घेतली! नरेंद्र मोदी खरंच आवडतात! आय लव्ह नरेंद्र मोदी, असं राहुल गांधी बोलताच विद्यार्थ्यांनी गलका करत दाद दिली आणि सभागृहात मोदी...मोदी अशा घोषणा सुरु झाल्या. सूत्रसंचालन करणाऱ्या आरजे मलिष्काने विद्यार्थ्यांना शांत राहण्यास सांगितलं. परंतु राहुल गांधींनी "इट्स फाईन...नो प्रॉब्लेम म्हणत आपलं मत मांडलं. "मला खरंच नरेंद्र मोदी आवडतात. त्यांच्याविषयी माझ्या मनात अजिबातच राग किंवा द्वेष नाही. पण ते माझ्यासारखाच विचार करत नाहीत. त्यांना माझ्याविषयी राग आहे," असं राहुल गांधी म्हणाले. माझं कामाशी लग्न ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक येऊ घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या सुबोध भावेने राहुल गांधींना बायोपिकबद्दल प्रश्न विचारला. तो म्हणाला की, "मला तुमचा  बायोपिक बनवायचा आहे. तो चित्रपट मीच दिग्दर्शित करणार आहे. पण त्यामध्ये हिरोईन कोण असावी, असा प्रश्न माझ्यासमोर आहे." यावर राहुल गांधींनीही खुमासदार उत्तर दिलं. ते म्हणाले की, "दुर्दैवाने मी कामाशी लग्न केलं आहे. " गरिबांना 72 हजार असे देणार! 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार देण्याचं आश्वासन तुम्ही दिलं आहे. पण न्याय योजनेसाठी निधी कुठून येणार, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने राहुल गांधींना विचारला. त्यावर ते म्हणाले की, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या आणि अनिल अंबानींकडून पैसे घेऊन गरिबांना देणार. मध्यमवर्गीयांचा कर वाढवणार नाही. आम्ही पूर्ण हिशेब केला आहे, पैसा कुठून येणार आणि कुठे वाटप करणार. सुरुवातील पायलट प्रोजेक्ट होईल आणि मग तो संपूर्ण देशात लागू होणार. रोजगार रोजगाराबाबत राहुल गांधी म्हणाले की, "आज देशात दर 24 तासात 27 हजार नोकऱ्या जात आहेत. तर दुसरीकडे चीन सातत्याने आपल्या देशात रोजगाराची निर्मिती करत आहे. त्यांच्याकडे 24 तासात 50 हजार नोकऱ्यांची निर्मिती होत आहे. आपल्याकडे शिक्षण, व्यवसायात कौशल्याला महत्त्व दिलं जात नाही. अमेरिकेत कौशल्य महत्त्वाचं समजलं जातं. सुदैवाने आपली तरुणाई सजग आहे, त्यांच्यात क्षमता आहे." VIDEO | गळाभेटीवरुन मोदींची राहुल गांधींना कोपरखळी | नवी दिल्ली | एबीपी माझा पंतप्रधान मोदींवर निशाणा विद्यार्थ्यांशी संवात साधताना काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. नोटाबंदीमुळे जीडीपी 2 टक्के कमी झाला आहे. लाखो नोकऱ्या गेल्या आहेत. हे नुकसान भरुन निघणार नाही. नोटाबंदीनंतर झटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरायला, नवीन उद्योजकांना उभारी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. शिक्षण आणि आरोग्य हे आमच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. शिक्षणावर जीडीपीच्या 6 टक्के खर्च करणार." जाहीरनामा राहुल गांधींनी इथे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधील मुद्दे विद्यार्थ्यांसमोर मांडले. "लोकांशी चर्चा करुनच आम्ही जाहीरनामा तयार केला आहे. यासाठी शेतकरी, महिला, जवान, तरुण, वृद्ध सर्व वर्गातील लोकांशी बातचीत केली, असं राहुल गांधींनी सांगितलं. 60 वर्ष निवृत्त होण्याचं योग्य वय राजकारण्यांना निवृत्त होण्यासाठी वयाची मर्यादा असावी का? असा प्रश्न एका विद्यार्थ्यांना विचारला. यावर राहुल गांधी म्हणाले की, "राजकारण्यांना निवृत्त होण्यासाठी वयाची मर्यादा असावी असं मला खरंच वाटतं." 60 वर्ष हे राजकारणातून निवृत्त होण्याचं योग्य वय असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Raj Thackeray on Delhi CJP Protest: या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
Embed widget