Hemant Patil on Ashok Chavan : मटण वाटायचं अन् मत घ्यायचं, ही पद्धत अशोक चव्हाणांनीच भाजपात आणली; शिंदेंच्या आमदाराचा टोला
Nanded Election 2026 : भाजप हिंदुत्ववादी पक्ष, शिस्तीचा पक्ष, अश्या पक्षाने मटणाचा प्रचार करणे कितीपत शिस्तीत बसते? असा सावला शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी उपस्थित केलाय.

Nanded: भाजप हिंदुत्ववादी पक्ष, शिस्तीचा पक्ष, अश्या पक्षाने मटणाचा प्रचार करणे कितीपत शिस्तीत बसते? असा सावला शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी उपस्थित केलाय. 'रोज खा मटण आणि कामळावर दाबा बटण' असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले होते. त्यावरून आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसची (Congress) जी परंपरा आहे मटण वाटायचे आणि मतदान घ्यायचे, हीच परंपरा अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये आणलीये. नांदेडची (Nanded Municipal Corporation Election 2026) भाजप काँग्रेसमय झालीये, अशी टिकाही हेमंत पाटील (Hemant Patil on Ashok Chavan) यांनी केलीय.
'खा कोणाचं पण मटण, मात्र दाबा फक्त भाजपच बटण' असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तरोडा भागातील सभेत केलं होतं. महापालिका निवडणुकीचा प्रचार सभा ही तरोडा भागात आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडली. यावेळी त्यांचासमोर अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केलंय. दरम्यान, याच वक्तव्यावरून हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाणांवर तोफ डागली आहे.
Vijay Wadettiwar on Ashok Chavan: अशोक चव्हाणांनी आयुष्यभर काँग्रेसचं मटण खाल्लं, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
दुसरीकडे, अशोक चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्यावर एकेकाळचे अशोक चव्हाण यांचे सहकारी आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसचे मटण खाल्ले आणि आता कमळाचे बटण दाबायला सांगत आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
नेमकं काय म्हणाले होते अशोक चव्हाण?
रोज खा मटन आणि दाबा भाजपचे बटन असं अशोक चव्हाण म्हणाले होते. एकाचं मटन खाऊन दुसऱ्याला मतदान अशी भानगड करु नका, मी काही मटन देणार नाही असं अशोक चव्हाण म्हणाले. तुम्ही सगळ्यांचा अनुभव घेतला. सगळ्यात मोठा नगरसेवक अशोक चव्हाण तुमच्यासमोर उभा आहे. मला आणि माझ्या पक्षाला सत्ता द्या यांचे कान मी पकडू शकतो. तुमची कामे आमच्या नगरसेवकांनी केलीच पाहिजे ही माझी गॅरंटी आहे. असेही अशोक चव्हाण म्हणाले.
यावेळी अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर देखील टीका केली होती. शिवसेनेचे तीन आमदार अनाधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात. एक आमदार अधिकृत उमेदवाराचा प्रचार करतो. नेमकं उमेदवार कोण हेच कळत नाही. आधी आम्हाला शिव्या घालत होते. आता एकमेकांना शिव्या देत आहेत, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली. तीन-तीन चार-चार आमदारांची भूमिका वेगळी असेल आणि असे उमेदवार तुम्ही निवडून दिले तर नांदेडचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही असं अशोक चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:





















