एक्स्प्लोर

Harish Pimpale : अटीतटीच्या लढतीत मुर्तिजापूरमध्ये भाजपचा विजय, आमदार हरीष पिंपळेंनी स्वपक्षातील स्थानिक नेत्यांवर डागली तोफ, म्हणाले...

Harish Pimpale : मुर्तिजापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हर्षल साबळे विजयी झालेत. यानंतर हरीष पिंपळेंनी पक्षातील काही जणांवर आरोप केलेत.

अकोला: अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये आज झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे हर्षल साबळे विजय झाले आहेत. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढाईत त्यांनी वंचितच्या उमेदवाराचा 718 मतांनी पराभव केला. मात्र, या पराभवानंतर भाजपचे आमदार हरीष पिंपळे यांनी हर्षल साबळे यांच्या पराभवासाठी पक्षातीलच काही घरभेद्यांनी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केलाय. 

Harish Pimpale : हरीष पिंपळे काय म्हणाले?

हर्षल साबळे हे आमदार हरीष पिंपळे यांच्या कट्टर समर्थक समजले जातात. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील त्यांच्या विरोधात काम करणाऱ्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षाने निलंबित केलं होतं. यात मावळत्या नगराध्यक्ष मोनाली गावंडे यांचे पती कमलाकर गावंडे यांचाही समावेश होता. निलंबित झालेले चारही पदाधिकारी हे भाजपातील धोत्रे समर्थक समजले जातात. या पार्श्वभूमीवर आमदार हरीष पिंपळे यांनी केलेल्या आरोपांची मोठी चर्चा भाजपा आणि राजकीय वर्तुळात सुरु आहे.  साबळे यांच्या विजयाने घरभेद्यांना त्यांनी जोरदार चपराक लावत मूर्तीजापूरच्या जनतेने चांगलाच धडा शिकवल्याचं आमदार हरीष पिंपळे म्हटलंय. 

भाजपनं  2025 सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीसाठी मतदाराचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं हर्षल साबळे यांना उमेदवारी दिली होती. हर्षल साबळे यांनी पन्ना प्रमुख पदापासून मेहनत करत भाजपमध्ये मुर्तिजापूर शहराध्यक्ष पद मिळवलं होतं. सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण लागल्यानंतर हर्षल साबळे याचं नाव सुचवलं होतं. त्यावेळी हर्षल साबळे यांचंं नाव सूचवल्यानंतर अनेक लोकांनी टीका टिपण्णी केली होती, असं हरीष पिंपळे म्हणाले. 

हर्षल साबळेच्या माध्यमातून भाजपला मूर्तिजापूर शहराच्या विकासासाठी मिळाला आहे. काही भाजपच्या घरका भेदी लंका ढाय अशी लोकं हर्षलच्या विरोधात होती. ती हर्षलच्या विरोधात नव्हती ती हरीष पिंपळेच्या मागं होती, असं आमदार पिंपळे यांनी म्हटलं. मूर्तिजापूरच्या विकासासाठी हर्षल साबळे कमी पडणार नाहीत, असं हरीष पिंपळे यांनी म्हटलं. हा विजय मतदार आणि कार्यकर्त्यांना समर्पित करतो, असंही पिंपळे म्हणाले. 

2024 ला कार्यकर्त्यांनी तिकीट आणून मला विजयी केलं. हर्षल साबळे याला मूर्तिजापूरच्या विकासासाठी साथ देणार असल्याचं हरीष पिंपळेंनी म्हटलं. हर्षल साबळे मूर्तिजापूरच्या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरतील, असं हरीष पिंपळे म्हणाले.  
 

मुर्तिजापूरमध्ये विजयी झालेले भाजपचे नगराघ्यक्ष हर्षल साबळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपमधीलच काही घरभेद्यांनी प्रयत्न केले असा गंभीर आरोप भाजप आमदार हरिष पिंपळे यांचा पक्षातील काही लोकांवर केला आहे. भाजपमधील विरोधी गट यावर काय उत्तर देतो ते पाहावं लागेल.   

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Embed widget