एक्स्प्लोर

Gujarat Election 2022 : पक्षाविरोधात निवडणूक लढवणाऱ्या तब्बल 12 बंडखोर आमदारांवर भाजपची मोठी कारवाई, सहा वर्षांसाठी निलंबित

Gujarat Election 2022 : राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने आपल्या 12 आमदारांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे.

Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये (Gujarat) पक्षाविरोधात बंड करणाऱ्या आमदारांवर भाजपने (BJP) कारवाई केली आहे. भाजपने आपल्या 12 आमदारांवर ही कारवाई केली आहे. पक्षाने 12 बंडखोर नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने या बंडखोर आमदारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते.

सहा वर्षांसाठी निलंबित
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ एक आठवडा शिल्लक आहे. निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे त्यात नवे नवे ट्विस्ट समोर येत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर येत असून राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने आपल्या 12 नेत्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर. पाटील यांनी या प्रकरणी सांगितले की, पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी आमदारांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

या आमदारांना निलंबित करण्यात आले
ज्या आमदारांवर कारवाई करण्यात आली त्यात दिनूभाई पटेल, मधुभाई श्रीवास्तव, कुलदीप सिंग, बी पागी, धवल सिंग झाला, रामसिंग ठाकोर, मानवजीभाई देसाई, एल ठाकोर, एसएम बंत, जेपी पटेल रमेश झाला आणि अमरशी भाई झाला यांचा समावेश आहे.

भाजपने 42 आमदारांचे तिकीट कापले
विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या 42 आमदारांचे तिकीट नाकारले आहे. भाजपने 160 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत 38 विद्यमान आमदारांना तिकीट मिळालेले नाही. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, पाटील यांच्यासह पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी आगामी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

6 वेळा आमदार मधु श्रीवास्तव यांचे निलंबन
ऑक्टोबरमध्ये कुलदीप राऊलजी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते आणि आता काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी भाजपने आमदार दिनेश पटेल यांना दोन वेळा आणि सहा वेळा आमदार मधू श्रीवास्तव यांना निलंबित केले आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या विधानसभेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी यापूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला होता. भाजपने पंचमहाल जिल्ह्यातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या खातू पागी यांनाही निलंबित केले आहे, तर महिसागरमधील लुनावाडा येथे एसएम खंत आणि जेपी पटेल यांना पक्षाने निलंबित केले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Gujarat Election 2022: भाजपसाठी सोपी नाही गुजरात निवडणूक, काँग्रेसला बसणार धक्का; नव्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget