एक्स्प्लोर

पर्रिकरांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी पोटनिवडणुकीसाठी 75.25 टक्के मतदान

आपचे वाल्मिकी नाईक आणि काँग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांचे मतदान पणजी मतदारसंघात नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

गोवा : गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी पोटनिवडणुकीसाठी 75.25 टक्के मतदान झाले. यामध्ये 8 हजार 119 पुरुष तर 8,799 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी एकूण 16 हजार 918 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 115 दिव्यांगांपैकी 101 लोकांनी मतदान केले.  सर्वाधिक मतदान 16 नंबर मतदान केंद्रावर 89.86% तर सर्वात कमी मतदान 15 नंबर मतदान केंद्रावर  63.96 टक्के झाले असल्याची माहिती माहिती निवडणूक आयोग कार्यालयाने दिली आहे. पणजी पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी मतदान केंद्र 9 वर मतदान केले. भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी जुंता हाउस मधील 21 नंबरच्या मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी रायबंदर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आपचे वाल्मिकी नाईक आणि काँग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांचे मतदान पणजी मतदारसंघात नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. मतदान केंद्र 9 वरील व्हीव्हीपॅट मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे जवळपास 20 मिनिटे मतदान थांबवावे लागले होते.त्यानंतर मशीन बदलून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरु करण्यात आली. सकाळच्या सत्रात तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी बाहेर पडलेले दिसून आले. 15 नंबर मतदान केंद्रावर 102 वर्षाच्या मारिया नावाच्या महिलेने मतदानाचा हक्क बजावला. अटीतटीच्या लढतीमुळे राज्याबरोबर देशाचे लक्ष पणजी पोटनिवडणुकीकडे लागले आहे. भाजपतर्फे सिद्धार्थ कुंकळ्येकर, काँग्रेसकडून बाबूश मोन्सेरात, गोवा सुरक्षा मंचतर्फे सुभाष वेलिंगकर, आपकडून वाल्मिकी नाईक यांच्या सह दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात असली तरी आपचे वाल्मिकी नाईक आणि गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर किती मते मिळवणार यावर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या निवडणुकीचा निकालदेखील लोकसभेच्या निकालादिवशी 23 मे रोजी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget