एक्स्प्लोर

Goa Election 2022: माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंचा काँग्रेसला धक्का, आगामी गोवा विधानसभा निवडणूक न लढवण्याचा घेतला निर्णय

Goa Election 2022: 87 वर्षाचे प्रतापसिंह राणा हे गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. ते पोरियममधून तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

Goa Election 2022: गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे (Pratapsingh Rane) यांनी आगामी गोवा विधानसभा निवडणूक  (Goa Assembly Election 2022) न लढवण्याचा निर्णय घेतलाय. राणेंचा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसनं त्यांना पोरियम मतदारसंघातून (Poriem Constituency) तिकीट दिलं होतं.  मात्र, याबाबत राणे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पण माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षाला निवडणूक न लढवण्याचा निर्णय कळवला आहे, काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं स्पष्ट केलंय. 

राणेंच्या निकटवर्तीयांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंची सून देविया राणे यांच्याशी थेट लढत टाळण्यासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. देविया राणे पोरियममधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. 87 वर्षाचे प्रतापसिंह राणा हे गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. ते पोरियममधून तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

“प्रतापसिंह राणे यांनी पोरियममधून निवडणूक लढवणार नसल्याचं पक्षाला कळवलंय. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या जागी दुसरा उमेदवार निवडलाय. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पत्नी देविया राणे यांना भाजपनं पोरियममधून उमेदवारी दिली आहे, अशी माहिती काँग्रेसच्या प्रवक्त्यानं दिलीय. प्रतापसिंह राणे पोरियमधून उमेदवारीसाठी काँग्रेसला पत्नी विजया देवी यांचे नाव सुचवू शकतात, अशी चर्चा होती. मात्र, गुरुवारी पक्षाने जाहीर केलेल्या सुधारित यादीत रणजित राणे यांना पोरियमधून काँग्रेसचे उमेदवार घोषित करण्यात आले.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget