Goa Election 2022 : आगामी पाच राज्यांच्या निवडणुका जवळ येतील तसे राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस पक्षाने आज आपल्या पाच जणांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने जारी केलेल्या उमेदवारांमध्ये माजी मंत्री मायकल लोबो यांच्या पत्नी डलैला लोबा यांच्या नावाचाही समावेश आहे. डलैला लोबा यांना सियोलिम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. लोबो यांनी भाजपला रामराम करत नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने जारी केलेल्या यादीनुसार, सलीगावमधून केदार नाईक, अल्डोनामधून कार्लोस अल्वारेस फरेरा, प्रियोल येथून दिनेश जल्मी आणि कर्टोरिममधून मोरेनो रिबेलो यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने गोव्यात आतापर्यंत 31 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. 


दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि  ममता बॅनर्जी यांचा तृणमूलही यावेळी आपलं नशीब अजमावणार आहे. स्थानिक पक्षांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे गोव्यात कोणाचं  सरकार येणार? हे 10 मार्च रोजी समजणार आहे. गोव्यात सध्या भाजपचे (BJP) सरकार आहे. गोवा विधानसभेत भाजपचे 25 आमदार असून नुकतेच आमदार कार्लोस अल्मेडिया आणि एलिना सलडाना यांनी राजीनामा दिला आहे.





अपक्ष लढल्यास उत्पल परिकरांना आमचा पाठिंबा - काँग्रेस

पणजी मतदारसंघातून उत्पल परिकरांनी अपक्ष निवडणूक वाढविल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देणार आहेत, मात्र भाजपने मनोहर पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उत्पल परिकर यांना तिकीट नाकारल्यास हा मनोहर परिकर यांचा अपमान असल्याचे राऊत यांनी सांगितले.


महत्वाच्या बातम्या