AAP, Goa CM Face : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज गोव्यात पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला. गोवा विधानसभा निवडणुकीत अमित पालेकर (Amit Palekar) हे आप पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी आज केली.


"अमित पालेकर हे पेशाने वकील आहेत आणि ते भंडारी समाजातून आले असून ते गोव्यातील प्रत्येक समाजातील लोकांना मदत करत आहेत. कोरोना काळात गोव्यातील नागरिकांसाठी त्यांनी सर्वाधिक मदत केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोव्यात ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू झाला असताना अमित पालेकर यांनीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी यावेळी अमित पालेकर यांच्याविषयी दिली. 




केजरीवाल म्हणाले, "गोव्यात भंडारी समाजाच्या लोकांना प्रगतीपासून  वंचित ठेवण्यात आले आहे. या समाजातील लोकांनी रक्त आणि घाम गाळून गोव्याच्या प्रगतीसाठी हातभार लावला आहे. गोव्यातील जनता सध्या विद्यमान पक्षांना कंटाळली आहे. गोव्यातील जनतेला आता परिवर्तन पाहिजे. त्यांच्याकडे आतापर्यंत  पर्याय नव्हता, परंतु,  आता आम आदमी पक्ष गोव्यात आला आहे. येथील जनता अमित पालेकर यांना साथ देईल आणि आम आदमी पक्षाला गोव्यातील लोकांची सेवा करण्याची संधी देईल."


अमित पालेकर हे सामाजिक कार्यात खूप सक्रिय असतात. त्यामुळे केजरीवाल यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून त्यांनी निवड केली आहे. गरजवंतांना मदत करण्यासाठी अमित नेहमीच पुढे असतात. त्यांची आई गेली 10 वर्षे सरपंच आहे. 


दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. 


महत्वाच्या बातम्या