Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना (Lata Mangeshkar) कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर गेल्या 11 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे. 


92 वर्षीय लता मंगेशकर यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी डॉक्टरांना त्या पूर्णपणे बरे झाल्याची खात्री करून घ्यायची आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना न्यूमोनिया झाला आहे. याला कोविड न्युमोनिया असं म्हटलं जातं. लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या लता मंगेशकर आयसीयूमध्येच असून पाच डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.


मुंबईच्या एका रिक्षा चालकाने देखील लता दीदींच्या उत्तम स्वास्थ्यसाठी प्रार्थना केली आहे. सत्यवान गीते या रिक्षा चालकाने आपल्या रिक्षा वर लता दीदींचे पोस्टर लावून त्यांच्या उत्तम स्वास्थ्यसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. रिक्षाच्या आत बाहेर त्यांचे पोस्टर लावण्यात आले आहे.तसेच त्यांचीच गाणी रिक्षात लावून त्यांच्या गाण्यांना उजाळा देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. ही रिक्षा पाहण्यासाठी मोठी गर्दी देखील होत आहे.या रिक्षा वरील हे पोस्टर आणि प्रार्थना पाहून प्रवासी देखील लता दीदींसाठी प्रार्थना करीत आहेत.


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना  'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. 


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar : लता दीदींच्या प्रकृतीसाठी रिक्षावाल्याचा देवाकडे धावा


International Flights : वाढत्या कोरोना रुग्णांची धास्ती, नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा लांबणीवर 


Coronavirus In India: देशात गेल्या 24 तासात 2,82,970 नव्या रुग्णांची नोंद, 441 जणांचा मृत्यू


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha