Chandrakant Patil Press Conferance : राज्यातील नगरपंचायत निवडणुकांमध्ये (Nagar Panchayat Result 2022) भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं निवडणूक निकालांनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत. भारतीय जनता पार्टी हा राज्यातील नंबर एकचा प्रश्न आहे, असा दावाही चंद्रकांत पाटलांनी केला आहे. तसेच, एकएकटे लढा मग कोणाची ताकद किती आहे, ते पाहू, असं खुलं आव्हानंही चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीला दिलं आहे. 


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, "राज्यातील नगर पंचायतींचे निकाल जाहीर होत असून त्यातील सात नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर केले जाणार आहेत. त्यापैकी जवळपास 93 नगरपंचायतींचे निकाल आता जाहीर झाले आहेत. या निकालांवरुन पुन्हा एकदा स्पष्ट झालंय की, भारतीय जनता पार्टी हा राज्यातील नंबर एकचा प्रश्न आहे. सदस्य संख्येतही भाजप क्रमांक एकवर आहे. नगरपंचायत पूर्ण जिंकणं यानं हे सिद्ध झालं आहे." पुढे बोलताना एकएकटे लढा मग कोणाची ताकद किती आहे, ते पाहू, असं खुलं आव्हानंही चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीला दिलं आहे. 


"युनियने भाजप समोर येत असाल त्यालाही आम्ही पुरून उरु. हे सगळ्या निवडणुकीत आम्ही दाखवून दिलंय. जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींमध्ये विजयी झालो. उद्या आणखी निकाल आहे. भंडारा गोंदियातील परिस्थिती अशी आहे की, गोंदिया जिल्हा परिषद भाजप सहज जिंकेल असं दिसतंय. भांडाऱ्यात आम्हाला मदत घ्यावी लागेल. तरिही भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेतही भाजपचंच वर्चस्व राहिल.", असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. 


"नाना पटोले आमदार असलेल्या जिल्ह्यात त्यांचा दारुन पराभव झाला आहे. खूप मोठी दाणादाण झालेली आहे. नेहमीप्रमाणे या निवडणुकीत शिवसेना क्रमांक तीन आणि चारसाठी स्वतःचं अस्तित्व टिकवत आहे. अनेक बड्या महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या परिसरात आम्ही जिंकलो. देवगड आणि कुडाळमध्ये सत्ता येण्यासाठी 1 जागा हवीये सत्तेसाठी. कोरोगावमध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची पार्श्वभूमी भाजपची आहे. भाजपसोबत एकत्र आल्यावर शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला.", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 


दरम्यान, शिवसेनेला मोठी खुर्ची मिळाली आहे. त्या मोठ्या खुर्चीवर ते समाधानी आहे. बाकी नेते मरु देत, कार्यकर्ते मरू देत, काय व्हायचंय ते होऊ देत, अशी शिवसेनेची भूमिका आहे, असं  चंद्रकांत पाटील म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :