Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) उमेदवारांच्या यादी जाहीर झाल्यानंतर आता उमदेवारांकडून अर्ज भरण्यात येत आहेत. त्यामुळे मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं असून राजकीय नेत्यांच्या सभाही सुरू झाल्या आहेत. दरम्यान महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असो किंवा महायुती यांच्या उमदेवारांची अंतिम यादी अद्याप स्पष्ट झालेली नाही. तर जाहीर झालेल्या उमेदवारांच्या उमेदवारीवरून काही ठिकाणी नाराजीनाट्य रंगल्याचे दिसून आले आहे. अशातच बंडाचे राजकारण देखील उफाळून आले आहे. असाच काहीसा प्रकार परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघात (Pathri Assembly Constituency) उफाळून आला आहे.


निवडणुक लढवण्यावर ठाम, 29 ऑक्टोबरला शक्ती प्रदर्शन


परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत झालेल्या बंडानंतर महाविकास आघाडीमध्येही बंड कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. काल (ता. 24 ऑक्टोबर)  रात्री काँग्रेसच्या पहिल्या यादीत आमदार सुरेश वरपुडकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. तसेच येत्या 29 ऑक्टोबर रोजी त्यांचे मोठे शक्तिप्रदर्शन ही ते पाथरी येथे करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांच्या या बैठकीमध्ये बोलताना बाबाजानी दुर्राणी यांनी आपण आता अपक्ष निवडणूक लढवणार आहोत आणि निवडून आल्यानंतर आपला पाठिंबा हा महाविकास आघाडीलाच असल्याचं म्हटलंय. त्यामुळे काँग्रेसचे आमदार तथा उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्यासमोर बाबाजानी दुर्राणी यांच बंड शमवण्याचं मोठं आव्हान असणार आहे.


दोनवेळा पाथरीचे उमेदवार असणारे वरपूडकर काँग्रेसकडून उमेदवार


मराठवाड्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. यात परभणीतील सुरेश वरपूडकर यांनी पक्षाशी निष्ठा ठेवत कुठेही न जाण्याचा निर्णय घेतला.  काँग्रेस पक्षातून राजकीय करिअरची सुरुवात केलेल्या वरपूडकरांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत असताना परभणी जिल्ह्यात त्यांचा शब्द अंतिम असायचा, असे सांगितले जाते. अंतर्गत गटबाजीचे कारण देत त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तत्कालीन काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पाथरी विधानसभेची त्यांना उमेदवारीही मिळाली. मात्र, त्यांचा त्यात पराभव झाला होता. २०१९ मध्ये काँग्रेसने दुसऱ्यांदा संधी दिल्यानंतर त्यांना या मतदारसंघात अखेर विजय मिळाला होता.


हे ही वाचा