पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या यादी जाहीर झाल्यानंतर आता उमदेवारांकडून अर्ज भरण्यात येत आहेत. त्यामुळे, मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं असून राजकीय नेत्यांच्या सभाही सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर अजित पवारांनी (Ajit pawar) जोरदार हल्लाबोल केलाय. इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज भरताना आल्यानंतर अजित पवारांनी थेट हर्षवर्धन पाटील (Harshvardhan patil) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्यापेक्षा आपले संबंध अधिक जवळचे असल्याचे सांगितले. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.


मी जिल्हा सांभाळत होतो, सत्तेत असताना तुम्हाला फक्त इंदापूर सांभाळू शकला नाही. कर्मयोगी कारखाना जर दुसऱ्याच्या ताब्यात नाही गेला, तर त्या कारखान्याची वाटोळे आहे. त्यात, आपल्याला लक्ष घालावे लागेल. उजनीच्या बॅकवॉटरमध्ये एक मोठा प्रकल्प करतो आहे. मी तर कलेक्टरशी बोललोय, मी मंजूरही केले असून फक्त टेंडर काढायचं बाकी आहे, असे म्हणत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.  


इंदापूरला पाणी कुठून आणायचं कसं आणायचं त्याची जबाबदारी माझी. माझं आणि देवेंद्रांचं बोलणं झालंय. काँग्रेसवाल्यांनी जेवढी तरतूद केली नाही, तेवढी आम्ही अल्पसंख्याक लोकांसाठी तरतूद केलीय. लोकांच्या भुलथापांना बळी पडू नका, हे खोटं बोलतात महाराष्ट्रचं गुजरातला गेल्याचं सांगतात. पण, महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिला क्रमांकावर आहे. लाडकी बहीण योजना बंद केल्याचे सांगतात, पण तसा स्टे दाखवा, असे म्हणत फेक नेरेटीव्हवरुन अजित पवारांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. अमित शहा यांच्याकडे मी गेल्यावर काम होईल, का हा बाबा गेल्यावर काम होईल? असे म्हणत अमित शाह यांच्याशी आपली जवळीक असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले. तसेच, अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का? असा खोचक सवालही अजित पवारांनी विचारत हर्षवर्धन पाटील यांना लक्ष्य केलंय. इथं आलो तर मित्र पक्षाच्या लोकांना बसायला जागा नाही, पुढच्या वेळी यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका, रात्री बाराला तरी गरज लागली तरी मला सांगा, असे म्हणत अजित पवारांनी इंदापूरकरांना सोबत राहण्याचे आवाहन केलंय.


10 टक्के जागा अल्पसंख्यांक उमेदवारांना देणार


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची पहिली 38 आणि आज 7 जणांची यादी जाहीर झाली आहे. आणखी नावांची यादी जाहीर होणार आहे. याचा पत्ता कट आणि त्याला उमेदवारी असे काही लिहू नका. काही जागांबाबत आमची दिल्लीत चर्चा सुरू आहे. महायुतीत 288 पैकी 11 जागा कुणी लढायचं हे ठरवायचं बाकी आहे. बाकी सगळं ठरलं आहे. आम्ही एकत्र असलो तरी आम्ही विचारधारा सोडली नाही. माझ्यातील 10 टक्के जागा अल्पसंख्याक उमेदवारांना देणार आहे. आम्हाला सगळ्यांना सोबत घ्यायचं आहे. महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी आमच्या सोबत काम करणार आहे, असंही यावेळी अजित पवारांनी म्हटलं आहे. 


हेही वाचा


पुण्यात टेम्पोत सोनं,कुठून आलं-कुठे निघालं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती; IT विभागाचे अधिकारीही दाखल