एक्स्प्लोर

लोकसभा लढवण्यास प्रिया दत्त तयार, पूनम महाजनांकडून पराभवाचा वचपा काढणार?

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. 2014 मध्ये हातातून निसटलेली खासदारकीची जागा पुन्हा बळकावत पराभवाचा वचपा काढण्याची संधी प्रिया दत्त यांना आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका काँग्रेससाठी 'करो या मरो'ची लढत ठरणार आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यास अनुत्सुक असलेल्या दिग्गज नेत्यांना काँग्रेसकडून पुन्हा मैदानात उतरवण्याची तयारी सुरु आहे. मिलिंद देवरांपाठोपाठ काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचीही मनधरणी करण्यात यश आल्याची माहिती आहे. प्रिया दत्त पुन्हा एकदा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी मुंबईत सभा घेत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. यावेळी प्रिया दत्तही व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यानंतरच प्रिया दत्त निवडणुका लढवण्यास राजी झाल्याचं वृत्त येत आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनिल दत्त यांची कन्या. सुनिल दत्त यांच्या मृत्यूनंतर 2009 मध्ये प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबईच्याच जागेवरुन खासदारकी मिळवली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या पूनम महाजनांकडून पराभवाचा धक्का बसला होता. सुरुवातीला प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 'आता माझी मुलं आहेत. नुसतं निवडणूक जिंकून होणार नाही. पाच वर्ष काम केलं पाहिजे, नाहीतर ते अन्यायकारक ठरेल. म्हणून मी आता निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, मात्र पक्ष जी जबादारी देईल, ती मी पार पाडेन', असं प्रिया दत्त म्हणाल्या होत्या. आता मात्र 2014 मध्ये हातातून निसटलेली खासदारकीची जागा पुन्हा बळकावत पराभवाचा वचपा काढण्याची संधी प्रिया दत्त यांना आहे. अभिनेत्री नगमा, कृपाशंकर सिंह यानीही उत्तर मध्य मुंबई मतदारसंघावर दावा सांगितला होता. मुंबईत काँग्रेसकडून कोणकोण रिंगणात उतरण्याची चिन्ह? उत्तर पश्चिम मुंबई - मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड किंवा भालचंद्र मुणगेकर उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Embed widget