एक्स्प्लोर

ऊसाच्या फडातून थेट विधानसभेत.., माळशिरसच्या नवनिर्वाचित आमदाराचा थक्क करणारा प्रवास

आमदार होण्यासाठी राजकीय पार्श्वभूमी हवी, बक्कळ पैसा हवा, हे जरी वास्तव असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी हा समज खोटा ठरवला आहे.

सोलापूर : माळशिरसच्या नवनिर्वाचित आमदाराने ऊसतोड मजुराचा मुलगा ते थेट विधानसभेत आमदार असा थक्क करणारा प्रवास केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांनी माळशिरस मतदारसंघातून विजय मिळवला आहे. आमदार होण्यासाठी राजकीय पार्श्वभूमी हवी, बक्कळ पैसा हवा, हे जरी वास्तव असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी हा समज खोटा ठरवला आहे. फडणवीस आणि मोहिते पाटील यांनी एका सामन्य घरातील तरुणाला विधानसभेवर आमदार म्हणून पाठवले आहे. माळशिरस हा राखीव मतदारसंघ असला तरी हा मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राज्यातली अनेक बडे नेते येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी राम सातपुते या इंजिनियर तरुणाला येथून उमेदवार म्हणून मोहिते पाटील यांच्या ताब्यात दिले. मोहिते पाटलांनी त्या इंजिनियर तरुणाला आमदार बनवले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील सातपुते कुटुंब हे ऊस तोडणीसाठी माळशिरस परिसरात अनेक वर्षांपासून येत आहे. तेवढीच काय ती त्यांची माळशिरसची ओळख. आजही सातपुते कुटुंब अतिशय गरिबीच्या स्थितीत आष्टी तालुक्यात छोट्याशा घरात राहतं. त्याच कुटुंबातील हा मुलगा पुण्यातून इंजिनियर झाला. याचकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात सक्रिय झालेला राम पुढे पूर्णवेळ भाजप आणि संघाचे काम करू लागला. यातूनच भाजपने हा उमदा तरुण हेरला आणि त्याला थेट माळशिरसमधून विधानसभेच्या रिंगणात उतरवले. रामसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माळशिरसमध्ये सभा घेतली तर प्रचाराची जबाबदारी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उचलत या तरुणाला आमदार केले. राम यांच्या आई वडिलांना आमदार म्हणजे काय हे माहीत नसले तरी आपला मुलगा काहीतरी चांगले करतोय हे त्यांना नक्की माहिती आहे, असे राम यांनी सांगितले. तसेच राम यांच्या होणाऱ्या पत्नीदेखील त्यांच्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, माझ्या आईला विधानसभा दाखवायची आहे, अशी इच्छा असल्याचे राम यांनी सांगितले, तर आपल्याला फक्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडावे, अशी त्यांच्या आईची मागणी आहे. पाहा राम सातपुते यांचा थक्क करणारा प्रवास

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget