एक्स्प्लोर

Chandgad Vidhan Sabha : चंदगडमध्ये पंचरंगी लढत असली, तरी विजय आपलाच होणार; तगड्या उमेदवाराने शड्डू ठोकला!

Chandgad Vidhan Sabha : जनसुराज्य शक्ती पक्षाची मोठी वोट बँक चंदगड विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी दिल्यामुळे या ठिकाणच्या लढतीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.

कोल्हापूर : कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात यावेळी पंचरंगी लढत होणार आहे. विशेष म्हणजे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनस्वराज्य शक्ती पक्षाने या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राजेश पाटील यांच्या विरोधात मानसिंग खोराटे यांना उमेदवारी दिली आहे.

पंचरंगी लढत असली तरी आपलाच विजय होणार

जनसुराज्य शक्ती पक्षाची मोठी वोट बँक चंदगड विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे जनसुराज्य पक्षाचे या मतदारसंघात उमेदवारी दिल्यामुळे या ठिकाणच्या लढतीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. दौलत सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चंदगड विधानसभा मतदारसंघात केलेले काम आणि जनसुराज्य शक्ती सारख्या पक्षाची साथ यामुळे पंचरंगी लढत असली तरी आपलाच विजय निश्चित असल्याचा विश्वास मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला. 

चंदगडमध्ये शिवाजी पाटलांच्या बंडखोरीने महायुतीत उभी फूट

चंदगडमध्ये महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे. भाजप नेते शिवाजी पाटील यांनीही शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून रिंगणात असलेल्या आमदार राजेश पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राजेश पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून नंदाताई बाभुळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदाताई बाभुळकर यांच्या उमेदवारीने सुद्धा महाविकास आघाडीमध्ये यापूर्वीच वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आता या वादामध्ये आता कोण बाजी मारणार याचे उत्तर 23 नोव्हेंबर रोजीच मिळणार आहे. 

महायुतीत बंडखोरी होणार

दरम्यान, सध्या राजेश पाटील चंदगड विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राजेश पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. 2019 च्या निवडणुकीत शिवाजी पाटील यांनी 51 हजार 173 मतं, तर विनायक उर्फ विरगोंदा पाटील यांनी वंचित बहुजन आघाडी मार्फत 43 हजार 973 मते घेतली होती. चंदगड मतदारसंघात राजेश पाटील, डॉ.नंदा कुपेकर, मानसिंग खोराटे, विनायक तथा आप्पे पाटील, शिवाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. चंदगडची जागा महायुतीच्या अजित पवार राष्ट्रवादीकडे गेल्याने भाजप नेते शिवाजी पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. माजी मंत्री भरमू सुब्रराव पाटील यांनी शिवाजी पाटील यांची पाठराखण केली आहे. संग्रामसिंह कुपेकर यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीत बंडखोरी होणार हे निश्चित आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget